भारतातील सरीसृप शास्त्रज्ञांनी किंग कोब्राच्या मूळ प्रजातीचे विभाजन करुन या सापाच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे (western ghat king cobra). 'टॅक्सोनाॅमी' म्हणजेच वर्गीकरणशास्त्राच्या अभ्यासानंतर पश्चिम घाटात आढळणाऱ्या किंग कोब्रा सापाचे नाविन्य ओळखून संशोधकांनी या प्रजातीचे नामकरण 'आॅफिओफॅगस कलिंगा' असे केले आहे (western ghat king cobra). शिवशंकराच्या गळ्यातील सापाला कानडी भाषेत 'कलिंगा' म्हणतात. त्यावरुन या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. (western ghat king cobra)
Read More
“जैवविविधता आणि वातावरणीय बदलांचा विचार करून पश्चिम घाट पर्यावरण संवदेनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना निर्गमित करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून केंद्र सरकारकडे सुधारित अहवाल पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तत्पूर्वी संबंधित भागातील लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल”, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.
तमिळनाडूतून तीन नव्या पालींचा शोध लावण्यात आला आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी अशा तीन दुर्मिळ पालींचा शोध लावला आहे. जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत त्यांचा यासंबंधीतील शोध निबंध प्रकाशित झाला आहे.
कालच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस जैविक संसाधनांच्या संरक्षणासाठी आणि जागतिक जैवविविधतेविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.महाराष्ट्राला लाभलेल्या निसर्गसंपन्न सह्याद्रीची जैवविविधता ही समृद्ध आहे परंतु त्याचे रक्षण होणे ही तितकेच गरजेचे आहे. याचाच आढावा घेणारा हा लेख.
पश्चिम घाटातील वनांमधून वृक्षचर विंचवांच्या दोन नव्या जाती व एका पूर्वसंशोधीत जातीची वैधता पुनर्स्थापित करण्यात आली आहे.यापैकी नव्या जाती केरळमधील वायनाड आणि कर्नाटकमधील साकलेश्पुर येथे आढळून आल्या आहेत तर वैधता पुनर्स्थापित करण्यात आलेली जात कर्नाटकच्या सुंकेरी येथे आढळून आली आहे. पुण्यतील इनसर्च एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्स या वन्यजीव संशोधन संस्थेच्या संशोधक चमुच्या प्रयत्नाने याबद्दलचा शोधनिबंध 'यन जर्नल ऑफ टॅक्सोनॉमी' या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
गोड्या पाण्यामधील दुर्लक्षित जैवविविधता अधोरेखित करणारे एक संशोधन समोर आले आहे. पश्चिम घाटामधून गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या खेकड्यांच्या पाच नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. यामधील चार प्रजाती या महाराष्ट्रातील सह्याद्रीमधील प्रदेशनिष्ठ असून एक प्रजात ही गोवा आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी आढळते.
गोव्यातून पालीच्या नव्या एका प्रजातीचा शोध लागला आहे. यानिमित्ताने प्रथमच उत्तर पश्चिम घाटामध्ये 'हेमीफिलोडॅक्टिलस' कुळातील पाल आढळून आली आहे. नव्याने शोधलेली पाल ही गोव्यातील केवळ दोन भागांमध्येच आढळत असल्याने ती दुर्मीळ असून तिच्या संरक्षणाची गरज आहे.
सह्याद्रीच्या खोऱ्यातील जैवविविधतेची खाण असणाऱ्या आंबोली गावातून गोगलगायीची नवी पोटजात आणि प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. या पोटजातीला ‘वरदिया’ असे नाव देण्यात आले असून प्रजातीचे नामकरण ‘वरदिया आंबोलिएन्सिस’ असे करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे आंबोलीतून शोधण्यात आलेली ही २१ वी नवीन जीव प्रजात आहे.
ईशान्य भारतामध्ये आढळणाऱ्या चतुराची प्रथमच पश्चिम घाटामधून नोंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामध्ये हा चतुर आढळून आला आहे. याशिवाय केरळमधील अधिवास असणारी टाचणीदेखील सिंधुदुर्गात सापडल्याने जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या चतुर आणि टाचणींच्या यादीमध्ये भर पडली आहे
भारतीय समाजात पालींविषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. त्यांचे संशोधनही दुर्लक्षित राहिले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये देशात पालींविषयी अभ्यास करणारी तरुण संशोधकांची फळी तयार झाली असून संशोधक अक्षय खांडेकर त्यामधील एक प्रतिनिधी आहेत. ते ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’मध्ये कार्यरत असून आजवर साधारण पालींच्या 35 नव्या प्रजातींचा शोध त्यांनी लावला आहे. पालींच्या विश्वातील अनेक अज्ञात प्रश्नांची उत्तरे देणारी खांडेकर यांची ही मुलाखत...
सह्याद्रीमधून बांबूच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. बांबूंच्या 'मेस' आणि 'मणगा' या दोन प्रजातींना आजतागायत वनस्पतीशास्त्रानुसार 'स्टुडोक्सिटेननथेरा स्टाॅक्सि' या नावानेच ओळखले जात होते. मात्र, संशोधनाअंती या दोन्ही प्रजात वनस्पतीशास्त्रीय दृष्ट्या वेगवेगळ्या असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे 'मेस' या बांबू प्रजातीचे नामकरण आता 'स्टुडोक्सिटेननथेरा माधवी' असे करण्यात आले आहे.
सह्याद्री मधील एका 'संवर्धन राखीव वनक्षेत्रा'मध्ये (काॅन्झर्वेशन रिझर्व्ह) वाघाचे दर्शन घडले आहे. वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये बुधवारी या वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले. सह्याद्रीमधील वनक्षेत्रांना 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'चा दर्जा दिल्यानंतर प्रथमच या भागामध्ये वाघाच्या अस्तित्वाचा छायाचित्रित पुरावा मिळाला आहे. ज्यामुळे व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित झाल्याचेही दिसून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावात एका लांडग्यांने शुक्रवारी धुमाकूळ घातला. यामध्ये त्याने १३लोकांवर हल्ला करून त्यांचा चावा घेतला. दोन कुत्र्यांना ठार केले आणि ३ म्हशींवर हल्ला केला. दरम्यान वन विभ
भारतातील फुलपाखरांच्या प्रजातींमध्ये नव्या फुलपाखराची भर पडली आहे. पश्चिम घाटामधील केरळच्या अगस्तमलाई डोंगररांगांमधून 'नाकाडूबा' कुळातील नव्या प्रजातीच्या फुलपाखराचे संशोधन उलगडले आहे. महत्त्वाचे म्हणजे इतिहासात प्रथमच पश्चिम घाटामधून संपूर्णपणे भारतीय संशोधकांच्या चमूने फुलपाखराच्या एखाद्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.
एका नौदल अधिकार्याचे चेन्नईमधून अपहरण करून त्याला पालघरमध्ये जिवंत जाळण्यात आले आहे. जखमी अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरज कुमार दुबे असे या अधिकार्याचे नाव असून पैशांच्या व्यवहारातून हत्या केल्याचा वडिलांनी आरोप केला आहे.
पश्चिम घाटामधील हरणटोळ सापांवर संशोधन
नव्याने उलगडलेली प्रजाती महाराष्ट्रात प्रदेशनिष्ठ
एका म्हशीची शिकार, दोन म्हशी जखमी
गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती
two new spider species discover from kerala
गेली ८ ते १० वर्षे उत्तमप्रकारे पर्यावरणविषयक काम करणाऱ्या जुई पेठे यांची विशेष मुलाखत...
दिडशे वर्षांनंतर 'द्रविडोगेको' पोटजातीमधील पालींचा शोध
ईशान्य भारतामधून सापाची एक नवी पोटजात (जिनस) आणि प्रजातीचा उलगडा करण्यामध्ये उभयसृपशास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. भारताच्या उभयसृपशास्त्रात (हर्पेटोलाॅजी) महत्वाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ मालकोम ए. स्मिथ यांच्या नावे या नव्या पोटजातीचे नामकरण 'स्मिथोफिस' असे करण्यात आले आहे.
‘महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळा’च्यावतीने सुमारे २८४ प्रजातींच्या फुलपाखरांना मराठीत नावे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठी नावांची ही संभाव्य यादी मंडळाने जाहीर केली असून, सर्वसामान्य आणि तज्ज्ञ मंडळींच्या सूचनांसाठी ती खुली करण्यात आली आहे. या सूचनांनंतर फुलपाखरांचे अधिकृतपणे मराठीत बारसे होणार आहे.