नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नसलेल्या हजारो नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहिले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार निवडणूक आयोगाकडून यादीत नाव नसलेल्या मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परिणामी कल्याण पश्चिमेतील हजारो मतदारांच्या नाव नोंदणीचा मार्ग पुन्हा मोकळा झाला असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे.
Read More
ढगफुटी सदृश पाऊस दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नागपुरात पडला. या चार तासात तब्बल ११० मिलीमीटर पाऊस झाल्याने पूर परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शनिवारी सकाळी नागपुरला गेले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी नागपुरला जाणार असल्याची माहिती स्वत: फडणवीसांनी दिली.
मुंबईतील मालाडच्या मढ (सिल्वर बीच) किनाऱ्यावर वाहून आलेल्या दुर्मिळ 'लॉगरहेड' कासवावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या दुर्मिळ मादी कासवाला ऐरोलीच्या 'किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रा'त आणण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. बुधवार दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी मढ किनाऱ्यावर स्थानिक मच्छीमारांना हे दुर्मिळ कासव आढळून आले. अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे स्थानिक पोलिसांना कळवून नंतर हे कासव कांदळवन कक्षाच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. या वरील 'बारनॅकल्स'च्या प्रजातींची ओळख पटवून या कासवाचा भ्रमणमार
भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्ग-३ साठी आठ डब्यांची पहिली प्रोटोटाईप ट्रेन अखेर चाचण्यांसाठी सुसज्ज करण्यात आली आहे. बॅटरी-ऑपरेटेड रेल्वे-कम-रोड शंटरने ही पहिली 8-डब्याची प्रोटोटाइप ट्रेन यशस्वीरित्या सारीपुत नगर येथे तयार केली आहे. आता या ट्रेनची सारीपूत नगर ते मरोळ मरोशी अशी चाचणी येत्या दि. १५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
मी स्वतः नेहरू नगर, कुर्ला (पू) चा आहे. आणि माझी आणि माझ्या बरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की हा वाद आता पुरे. सीने सृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेते सुमित राघवन यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुंबई मेट्रो ३ लवकरात लवकर सुरू व्हावी ही सामान्य मुंबईकरांची इच्छा आहे.
सागरी कासव विणीच्या किनाऱ्यांवरील 'सुरू'ची झाडे काढून टाकण्याबरोबरच त्याची लागवड न करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'ने (मॅंग्रोव्ह सेल) सामाजिक वनीकरण विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राने प्रसिद्ध केलेल्या 'समुद्री कासव कृती आराखड्यात' यासंदर्भातील तरतूद मांडण्यात आली.
समुद्री कासव कृती आरखाड्याच्या माध्यमातून सूचना
लॉकडाऊन शिथिल केल्याने ही रुग्णसंख्या वाढली का ?
कोरोना, भिवंडी, कोरोना मास्क, Corona, Bhiwandi, Thane, Corona mask
प्रत्येक घराला इंटरनेटशी जोडण्यासाठी केंद्र सरकारतर्फे संकल्प केला जाणार असून सीम कार्ड घेण्याइतके ब्रॉडबॅण्ड सेवा घेणे सोपे होणार आहे.
जेष्ठ समाजसेविका तसेच भाजपच्या माजी कल्याण जिल्हा सरचिटणीस ज्योती पाटकर यांचे सोमवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. मुक्त बालिका आश्रम विरंगुळा केंद्र यासाठी त्यांनी सातत्याने काम केले होते. भाजपच्या माजी जिल्हा सरचिटणीस म्हणून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केले आहे.
विजय मल्ल्याची बँक खाती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू
भाजप-शिवसेनेची युती झाल्याने शिवसेनेचे खासदारकीसाठीचे इच्छुक निर्धास्त झाले असले तरी आता खासदारकीच्या तिकिटावरून शिवसेनेत घमासान सुरू झाले आहे. गुरुवारी दुपारी हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटावरून शिवसेनेच्या दोन आमदारांमध्येच तीव्र वाद झाल्याचे समजते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोरच ही बाचाबाची घडली. मात्र स्वतः ठाकरेंनीच यामध्ये हस्तक्षेप केल्याने पुढील वाद शमल्याचे समजते.
मुंब्रा आणि औरंगाबादूहन एटीएसने अटक केलेले नऊ संशयितांना इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर संबंधितांना मुंबई एटीएसच्या ताब्यात देण्यात आले असून चौकशी सुरू आहे