राज्यात काही जनजाती क्षेत्रं अशी आहेत, ज्याठिकाणी उघडपणे हिंदुत्वाचा जागर होताना दिसतोे. सनातन परंपरेनुसार सण-उत्सव जनजाती बांधवांकडून साजरे होत आहेत. जव्हार तालुक्यातील कौलाळे गावात ‘कौलाळेश्वर शिवमंदिर’ आहे, जे परिसरातील १२ पाड्यातील जनजातींच्या श्रमदानातून उभे राहिले आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त या पांडवकालीन शिवमंदिराचा घेतलेला आढावा... Kaulaleshwar Shiv Mandir Jawhar
Read More
चिकू महोत्सवामुळे ग्रामीण पर्यटनाचा विकास होणार आहे, असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.
देशातील सर्वांत मोठे बंदर वाढवणमध्ये उभारण्यात येणार आहे. या बंदराशी राज्यातील अधिकाधिक जिल्हे जोडण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे नियोजन सुरूये. त्यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईनंतर नाशिक हे महाराष्ट्राचे तिसरे औद्योगिक केंद्र आहे. नाशिक शहराचे मुख्य औद्योगिक शहर मुंबई आणि पुणे पासून केवळ २०० किमी अंतरावर आहे. नाशिकमध्ये अनेक सरकारी कंपन्या तसेच उपक्रम आहेत.
“महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याचे नाव ‘वाढवण बंदर प्रकल्पा’मुळे जगाच्या नकाशावर येणार आहे. या बंदरांची ( Vadhvan Port ) ओळख देशातीलच नव्हे, तर जगातील टॉप टेन बंदर अशी असेल. हा प्रकल्प पालघर आणि कोकण किनारपट्टीला विकासाच्या मुख्य प्रवाहात तर आणेलच. मात्र, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्याने वाढेल,” असा विश्वास जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना व्यक्त केला.
पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करा, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील केशव सांस्कृतिक मंडळच्या सहकाऱ्याने आयरे गावातील (ता. जव्हार) श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण सोहळा गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी संपन्न झाला. बंगळूरचे बालयोगी महंत श्रीगणेशदासजी (उदासीन) यांच्या शुभहस्ते हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदिरात करण्यात आली. Aayare Village Hanuman Mandir
Hinduism पालघर जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर हे चार विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातींसाठी राखीव, तर नालासोपारा आणि वसई हे खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि प्रचारादरम्यानही पालघर जिल्ह्यात विविध घटना घडल्या. त्यामुळे या पालघर जिल्ह्यातील या सहा जागांवर नेमके कोण जिंकून येणार, याबाबत चुरस आणि उत्सुकताही होती.
मुंबई : पालघर जिल्ह्याचा चेहरामोहरा खऱ्या अर्थाने महायुती सरकारने बदलला. येत्या काळात पालघर-डहाणू राज्याचे विकास इंजिन म्हणून नावारुपास येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी केले.
यंदाच्या वर्षी गणरायाचे आगमन ०७ सप्टेंबर रोजी होणार असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे ४२०० गट आरक्षणासह एकूण ४९५३ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झालेले आहेत. हे पाहता उद्या ३ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
वाढवण बंदरामुळे पुढची ५० वर्षे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहणार, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
वाढवण बंदरावर संपुर्ण जगाचं लक्ष असून या बंदरामुळे महाराष्ट्राचं आर्थिक चित्र बदलणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
वाढवण प्रकल्प हा बंदर वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा खासगी क्षेत्रातील भागीदारांच्या सक्रिय सहभागासह संयुक्त उपक्रम आहे. हे बंदर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या बंदराचा पहिला टप्पा 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. हे बंदर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि पारगमन वेळ आणि खर्च कमी करेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असेल. या
पूजापाठ करून घरी निघालेल्या एका पुजारीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना शनिवार, दि. १७ ऑगस्ट रोजी कांदिवलीत घडली. लालजीपाडा परिसरात चार जणांनी मिळून या पुजारीवर आणि त्याच्या मेहुण्यावर लाकडी बांबूने व चाकूने वार केल्याचे रविवारी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतून उघडकीस आले आहे. (Kandivali Sadhu News)
पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत सावरा हे ७६ हजार ९०९ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात उबाठा गटाच्या भारती कामडी या मैदानात होत्या. दरम्यान, भारती कामडी या सध्या पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात शंभर ओपन फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. ठाणे, बोईसर आणि विरार बुलेट ट्रेन स्थानकांवर प्रगतीपथावर, नदीवरील पूल आणि डोंगरावरील बोगद्यांची तयारी सुरू असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे.
महायूतीचा पालघरचा उमेदवार जाहीर झाला असून ही जागा भाजपकडे गेली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजपने डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे. हेमंत सावरा हे माजी मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांचे पुत्र आहेत. दरम्यान, याठिकाणी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालघरच्या जागेबाबत महत्वपूर्ण खुलासा केला आहे. पालघरच्या जागेबाबत भाजप निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी बुधवारी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री छगन भुजबळदेखील उपस्थित होते.
चार वर्षांपूर्वी एप्रिल महिन्यात पालघर येथे जमावाकडून झालेल्या मारहाणीत दोन साधूंचे प्राण गेले होते. तसाच काहीसा प्रकार नाशिक येथे घडला, परंतु सुदैवाने साधू हत्याकांडची पुनरावृत्ती टळली. 'अखिल भारतीय संत समिति, धर्म समाज'चे महाराष्ट्र प्रमुख महंत पिठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. (Aniketshastri Maharaj)
'सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर' येथे बियाणे महोत्सवाचे (देशी वाण) आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवार, दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात हा महोत्सव संपन्न होणार आहे. एकमेकां बीज देऊ ही धरा जिवंत ठेऊ... हे ब्रीद हाती घेऊन देशी वाणांची बियाणी टिकावीत, त्यांची देवाण-घेवाण व्हावी, बियाणांचे संवर्धन व्हावे आणि त्यांचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने हा महोत्सव संपन्न होत आहे.
देऊळ म्हणजे श्रद्धास्थान. त्यात देवीचे मंदिर म्हणजे ती केवळ भाविकांना आश्वस्त करत नाही, केवळ संरक्षण हे तिचं कर्तव्य नाही. ती शक्ती प्रदान करते. ऊर्जा देते, प्रेरणा देते. सर्व भाविकांवर आपली मधाळ मायाळू नजर नियमित राहावी म्हणून ती उंच डोंगरावर वसलेली असते. नवदुर्गांच्या मालिकेतील आजची चौथी देवी श्री वज्रेश्वरी माता. विरार पूर्वेला वज्रेश्वरी या गावात तिचे मंदिर आहे. मंदिर पुरातन आहे. गावाचे नाव तिला न मिळता, तिच्या नावाने गाव वसवले गेले. यावरूनच तिच्या प्राचीनतेची साक्ष मिळते. तिच्या हातात वज्र असल्याने तिल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षं व विश्वहिंदू परिषदेला ६० वर्षं पूर्ण होत आहेत. या दुग्धशर्करा योगाच्या निमित्ताने बजरंगदल आयोजित ‘शिवशौर्य यात्रे’चे पालघर जिल्ह्यातील मनोर येथे आगमन झाले. स्वागतासाठी नागरिकांनी रस्त्यावर दुतर्फा गर्दी केली होती.
निरनिराळे आकार, आकर्षक रंग आणि मुख्यत: पावसाळ्यात उगवणाऱ्या बुरशींमधील ( fungus ) एक आगळीवेगळी प्रजात पालघर जिल्ह्यात आढळून आली आहे. जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्याला तब्बल चार ते पाच किलो वजनाची 'मॅक्रोसायब' या कुळातील अळंबी ( fungus ) सापडली. महत्त्वाचे म्हणजे भारतामधून प्रथमच या कुळातील बुरशीची ( fungus ) नोंद करण्यात आली आहे.
आषाढीवारीचा महिमा संपूर्ण मराठी संस्कृतीला ज्ञात आहे. वारकरी आणि माळकरी वयोमानानुसार वारीला जाऊ शकत नाहीत तेव्हा यांच्यासाठी पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात प्रतिवारीचे आयोजन साहित्य जल्लोष प्रतिष्ठानने केले आहे. वसईतील विठ्ठल भक्तांनी या वारीत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. आषाढी एकादशी निमित्त गुरूवार दि.२९ जून २०२३ रोजी, सायं. ४.०० वा. वसई बस डेपो ते भंडारी नाट्यगृह, पारनाका, वसई या मार्गावर 'वारकरी दिंडी' आयोजित केली आहे. त्यानंतर वसईतील पुरातन विठ्ठल मंदिरात
प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मेहनतीच्या जोरावर अनेक आयुष्य उभी करणार्या अर्धशिक्षित निराधार पण खंबीर स्त्रीविषयी. ही कहाणी आहे जया पाटील हिची...
वाडा : तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या कुडूस ग्रामपंचायती कडून विविध विकास कामांचा शुभारंभ आज (२८ मे) रोजी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात करण्यात आला. कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत काॅक्रिटी रस्ते, पाईप गटार बांधणे, पेव्हर ब्लॉक बसवणे, अशा स्वरुपातील १२ विकासकामांची उद्घाटने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
‘युपीएससी’मध्ये महाराष्ट्राचा झेंडा देशात फडकवणार्या ठाण्याच्या श्रीनगरमधील कश्मिरा संख्ये या डॉक्टर तरुणीची ही यशोगाथा...
खानिवडे : आदिवासी भागातील अशिक्षितपणाचा फायदा घेत ख्रिश्चन मिशनर्यांकडून होणार्या धर्मांतराची चर्चा पालघर जिल्ह्यात नेहमी होत असून, सध्या दुर्गम आदिवासी भागात ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या भागात आता ख्रिश्चन धर्माची सर्वच पूजा-अर्चा करत असल्याचे बोलले जात आहे. ख्रिश्चन धर्मीयांप्रमाणे हे आदिवासी बांधव लग्न व अन्य सण-उत्सव कार्य करत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. म्हणूनच ख्रिश्चन धर्माची पूजा-अर्चा करणार्या कुटुंबांविरोधात, वावर-वांगणी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव के
वसई तालुक्यातील ‘सेवा विवेक प्रकल्पा’वर प्रायोगिक तत्वावर लागवड करण्यात आलेल्या स्ट्रॉबेरी शेतीमुळे हे वसई आहे की, महाबळेश्वर असा आभास निर्माण होत आहे, तर आमच्या भागात स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते म्हणून प्रायोगिक शेती पाहण्यास आलेल्या शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत .
मन की बात कार्यक्रमाला संबोधित करताना काल "मन की बात"चा या वर्षातील शेवटचा म्हणजेच, ९६ वा एपिसोड होता. प्रंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रातील पालघर जिल्हातील वनवासी समाजातील कुशल बांबू कारागीर लोकांकडून बांबू हस्तकला पासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तूची माहिती दिली. बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या बॉक्स, खुर्ची, चहादाणी, टोकेरी आणि ट्रे सोबत विविध गोष्टींची प्रशंसा केली तसेच त्यांनी बनवलेल्या वस्तू आज खूप लोकप्रिय झाल्या आहेत यामुळे वनवासी महिलांना रोजगार सोबतच मानसन्मान मिळत असल्याचे प्रंतप्रधानांनी सांगित
पालघर जिल्ह्यातील वनवासी महिलांसाठी ‘सेवा विवेक’ या सामाजिक संस्थेमार्फत नुकतेच ‘संविधान साक्षरता वर्गा’चे आयोजन करण्यात आले होते. पालघर तालुक्यातील बोट या गावातील बांबूपासून हस्तकलेत प्रावीण्य मिळवलेल्या वनवासी महिलांना प्रमुख पाहुणे ‘सेवा विवेक’चे मार्गदर्शक, ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थे’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत, लेखक रमेश पतंगे यांनी ‘संविधान साक्षरता मोहिमे’अंतर्गत संविधानाचे महत्त्व व फायदे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी राजकुमारी गुप्ता (समाजसेविका) आणि प्रगती भोईर (प्रशिक्षण व विकास अधिकारी, ‘
पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदराच्या सर्वंकष विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. तसेच पालघर येथे वादळवारा निवारा केंद्रही शीघ्र गतीने उभारावे असे निर्देशही त्यांनी प्रशासनास दिले आहेत. सातपाटी बंदरातील मच्छिमारांच्या समस्यांसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत नोंद असणाऱ्या 'इंडियन स्किमर' (indian skimmer) म्हणजेच 'पाणचिरा' या पक्ष्याचे रविवारी पालघरमध्ये दर्शन झाले. पक्षीनिरीक्षकांना हा दुर्मीळ हिवाळी पाहुणा नांदगाव किनाऱ्यावर दिसला. मुंबई महानगर प्रदेशात 'पाणचिरा' (indian skimmer)पक्ष्याच्या फार कमी नोंदी असून अधिवास नष्टतेमुळे या पक्ष्याला संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. (indian skimmer)
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात तीन बाजूनी समुद्राने वेढलेला भुईकोट किल्ला आहे. आमची वसई तर्फे या किल्ल्यावर दिवाळीच्या पूर्वसंध्येला ७१०० दिवे लावून दीपोत्सव साजरा केला गेला. तसेच आकाशकंदीलही सोडण्यात आले. या दीपोत्सवात वसईकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
समाजातील विषमता दूर करण्यासाठी व समाज सबलीकरणासाठी वैयक्तिक पातळीवर प्रत्येकजण काही ना काही कार्य करत असतो. अशातच येऊ घातलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून वनवासी विभागातील गरजू बांधवांसाठी हिंदू सेवा संघ, महाराष्ट्र या संस्थेने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या संस्थेमार्फत ज्यांच्या घरी गणपती बसतात अशांसाठी एक विशिष्ट 'दानपेटी' तयार करण्यात आहे. या दानपेटीत जमा होणारा निधी वनवासी विभागातील गरजूंच्या भवितव्यासाठी वापरला जाणार आहे.
वसई-विरार महापालिका आणि पालघर पट्ट्यातील विविध नगर पंचायतीमधील एकूण ५० नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे
फडणवीस-शिंदे सरकार येताच ठाकरे सरकारमध्ये रखडलेल्या अनेक गोष्टी धडाडीने कार्यान्वीत व्हायला सुरुवात झाली. अशातच गेली अडीच वर्ष वर्क फ्रॉम होम करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी (दि. १५ जुलै) भायखळा मध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचले. शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामटेकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत चौकशी करण्यासाठी शिवसेनेच्या शाखेत ते हजर होते. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांना घडलेल्या प्रसंगावरून ठाकरेंनी सुनवले खरे मात्र त्यांच
प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर रेल्वे क्रमांक १२४७१/१२४७२ आणि रेल्वे क्रमांक २०४८४/२०४८३ या दोन गाडयांना पालघर स्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. तसेच रेल्वे क्रमांक १९४१७ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद एक्सप्रेसच्या वेळा संजन स्थानकावर सुधारण्यात आल्या आहेत.
मुंबई व मुंबईच्या उपनगरात तसेच ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कट्टर शिवसैनिकांनी मालवणीत सरकार सत्तेत रहावं म्हणून दुवा मागितली आहे. नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी तब्बल ५० आमदारांचे आम्हाला समर्थन असल्याचा दावा केला आहे. ठाकरे सरकारचा पाठींबा काढून घेण्याचा इशाराही शिंदे गटाने दिला असून तसे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातील वनवासी भागांमध्ये सामाजिक, शैक्षणिक व रोजगारनिर्मितीसाठी कार्य करणार्या ‘सेवा विवेक’च्या वनवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक बांबूच्या आकर्षक राख्यांचे विमोचन राष्ट्रपतींच्या हस्ते नुकतेच पुणे येथील राजभवनात करण्यात आले.
मुंबईतील भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील पाच दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारी दि. २४ रोजी सकाळी, मुंबईच्या अनेक भागात हलक्या पावसाने हजेरी लावली.
अॅड. परमानंद ओझा यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या निषेधार्थ वसईतील रिक्षाचालकांनी एकत्र येत होर्डींग बसवले आहेत.
पालघर साधू हत्याकांडात घटनास्थळी आठ जणांच्या हातात शस्त्र असल्याचे किंवा हत्येला प्रवृत्त केल्याचे फुटेज सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
रोजगार हमी योजनेवर काम करणारे बहुसंख्य मजूर हे आदिवासीबहुल जिल्ह्यातील तसेच मागास भागातील असून शासनाच्या विरोधात या मजुरांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. तरी ऐन सणाच्या वेळी मजुरांची मजुरी थकीत ठेवण्याच्या कारणाची उच्चस्तरावर चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी
पालघरचे शिवसेना खासदार यांना मोठा दणका मिळाला आहे. जमीन विकास प्रकरणी दिलेला चेक बाउन्स झाल्याच्या प्रकरणात त्यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे
प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात वनवासी संस्कृतीचा इतिहास ६ बाय ४५ फुटांच्या चित्रातून दिसणार
जगभरात वर्चस्व गाजवण्यासाठी आटापिटा करणार्या व त्यासाठी इतर औषधशास्त्रांना कमी लेखण्याचे काम करणार्या औषधशास्त्राच्या जगात होमियोपॅथीलाही त्याचे चटके सहन करावेच लागत आहेत. देशभरातूनही होमियोपॅथीला राजकीय पाठबळ मिळत नाही. परंतु, यामुळे होमियोपॅथीक औषधशास्त्र मागे पडलेले नाही, कोट्यवधी लोक होमियोपॅथीक उपचार घेऊन बरे होत आहेत.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर किमान ओबीसी उमेदवार द्यावा, असे आवाहन सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेने ओबीसी उमेदवाराला डावलून खासदार गावित यांच्या मुलाला उमेदवारी दिली होती. एकनाथ शिंदे आणि खासदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. मात्र, भाजपनेही या वेळी ताकद लावत जोरदार प्रचार केला. भाजपच्या प्रचारामुळे खासदारांचे पुत्र थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. वणई १८ येथून काँग्रेसच्या वर्षा धनंजय वायडा विजयी झाल्या. भाजपा उमेदवार पंकज दिनेश कोरे दुसऱ्या स्थानी आहेत.
पालघरच्या वाडा तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थीती निर्माण झाली आहे. महापुरात कित्येक शेतकऱ्यांचे शेतबांध वाहून गेले आहेत. शेतबांधाना खांडी पडल्या आहेत. भात लागवड केलेल्या शेतजमीनीत मातीचा थर साचून भात लागवडीचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यातील पूरस्थितीत मदतीसाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून सर्व प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत सर्व तैनात असलेल्या यंत्रणा सध्या युध्दपातळीवर काम करत आहेत. रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या प्रत्येकी दोन अशी एकूण चार पथके रवाना होत आहेत. तर ठाणे येथे तीन व पालघर येथे एक टीम पोहचली आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ मदतीसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले