भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एनएचएसआरसीएलच्या माध्यमातून रेल्वे अहोरात्र काम करत आहे. नुकताच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील NH-48 वर २१० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे.
Read More
भारतातील मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आत्तापर्यंत ६६ हजार ३२६ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण किंमत १ लाख आठ हजार कोटी रुपये इतकी असल्याने प्रकल्पाने सप्टेंबर महिन्यापर्यंत ६१. ४० टक्के इतकी आर्थिक प्रगती साध्य केली आहे. प्रकल्पाच्या एकूण किंमतीमध्ये जमीन अधिग्रहण, बांधकाम आणि रुळांच्या कामांसह इतर खर्चाचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटा दरम्यान २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीच्या इंटरमीडिएट बोगद्याचे (एडीआयटी) खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात शंभर ओपन फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. ठाणे, बोईसर आणि विरार बुलेट ट्रेन स्थानकांवर प्रगतीपथावर, नदीवरील पूल आणि डोंगरावरील बोगद्यांची तयारी सुरू असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे.
भारतातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील शेकडो तरुण तांत्रिक प्रशिक्षण घेऊन रोजगारक्षम झाले असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. महाराष्ट्रातील १३२ प्रकल्पबाधित तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले असून हे तरुण आज प्रकल्प स्थळांवर कार्यरत आहेत.