म्युच्युअल फंड - एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन )
Read More
मार्च २०२० आर्थिक वर्ष सरले आणि गुंतवणूक विश्वाचे मागील वर्षाचा आढावा घेणारे अहवाल आता येऊ लागलेत. म्युच्युअल फंड क्षेत्राशी निगडित आकडेवारीचा आपण येथे आढावा घेऊ.
गृहकर्ज घेतल्यानंतर पहिला तणाव म्हणजे, आपल्याला काही झाल्यास कर्जाचे हप्ते कसे फेडले जातील, गृहनिर्माण कर्ज कंपनी घराचा ताबा घेऊन आपल्या कुटुंबावर आपत्ती ओढवेल का ही भीती निर्माण होते. भीती घालवण्याकरिता ताबडतोब गृहकर्जरकमेच्या साधारण दुपटीपेक्षा जास्त रकमेचा मुदतीचा विमा घ्यावा.
गेल्या २ वर्षात शेयर बाजारातील मोजके समभाग सोडले तर एकंदर बाजार खूप अस्थिर आणि खालच्या पातळीवर राहिला. बाजार अतिशय अस्थिर आणि खालच्या पातळीवर असताना म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक कशी कामगिरी करतात ते पाहणे महत्वाचे ठरते. गुंतवणूकदारांनाही अशा कालावधी मध्ये योग्य योजनांची निवड करणे कठीण होऊन जाते. बाजारातील काही पतमानांकन संस्था आणि संशोधन संस्था निरनिराळे मापदंड वापरून योजनांची क्रमवारी नियमित जाहीर करीत असतात. क्रिसिल ह्या पतमानांकन करणाऱ्या संस्थेची डिसेंबर महिना अखेरची क्रमवारी जाहीर झाली. समभाग सं