धारावी रिडेव्हल्पमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल ) धारावीच्या पुनर्विकासासाठी कटीबद्ध आहे. सगळ्या पात्र झोपडपट्टी धारकांना धारावीतच ३५० चौरस फुटाची पुर्णपणे मोफत घरे दिली जाणार आहे. जी मुंबईतील इतर कुठल्याही भागातील एसआरएच्या घरांपेक्षा १७ % मोठी आहे.
Read More
'धारावी बचाओ आंदोलना'त (डीबीए) सहभागी नेत्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शताब्दीनगरच्या (जे क्लस्टर) रहिवास्यांवर अजून एक पावसाळा जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी सर्व्हेक्षणाला विरोध केल्यामुळे म्हाडाच्या तयार इमारतीत पुनर्वसनापासून या नागरिकांना वंचित राहावे लागणार आहे, अशी खंत धारावी पुनर्विकास प्राधिकरणातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.