मुंबई : ८०च्या दशकात ‘बोफोर्स’ घोटाळ्यामुळे देशातील राजकारण ढवळून निघाले होते. १९८०च्या दशकात भारतीय लष्करासाठी खरेदी केलेल्या ‘बोफोर्स’ तोफांच्या व्यवहारामध्ये १ हजार, ४३७ कोटींच्या एकूण व्यवहारात ६४ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप काँग्रेस ( Congress ) पक्षावर आहे. आता या घोटाळ्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेतील गुप्तहेर मायकल हर्शमन याची चौकशी करण्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या माध्यमातून कायदेशीर सूचना पाठविण्यात येणार आहे.
Read More
‘बिईंग द चेंज’मध्ये स्व-पल्याडचा विचार करणार्या व्यक्ती आहेत, त्यांनी महात्म्यांचे ‘सत्याचे प्रयोग’ केवळ वाचून ठेवले नाहीत तर ते प्रत्यक्षात आणले म्हणून त्यांची नोंद घ्यावी लागते.
१९५७ साली मॅक्लिनची दुसरी कादंबरी आली-‘गन्स ऑफ नेव्हरोन.’ नेव्हरोन नावाच्या ग्रीक बेटावर जर्मनांनी दोन महाभयंकर तोफा तैनात केलेल्या असतात. काही धाडसी कमांडो जीवाची बाजी लावून त्या तोफा उडवून देतात. ही थरार कादंबरी वाचून लोक इतके वेडे झाले की, पहिल्या सहा महिन्यांत तिच्या चार लाख प्रती संपल्या.
घाटकोपर येथील ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये असणार्या तब्बल १६४ वर्षे जुन्या तरीही भरभक्कम असणार्या दोन पोलादी तोफांना नवी झळाळी देत, त्या पुनःस्थापित करण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच घाटकोपर पूर्व परिसरातील टिळक पथावर असणार्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये निसर्गाशी जवळीक साधण्यासोबतच ऐतिहासिक ठेवाही अनुभवता येणार आहे.
नागपूरमध्ये सापडल्या ब्रिटिशकालीन तोफा