राज्यात क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा तेलंगणाचे आमदार यांनी याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी कबरीच्या देखभालीवर झालेल्या खर्चाची सविस्तर माहिती मागितली आहे. त्याचबरोबर कबरीवर होणारा खर्च तत्काळ थांबवण्याची मागणी देखील केली आहे. Tiger Raja Singh on Aurangzeb Kabar
Read More
Revanth Reddy तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंती रेड्डी पत्रकारांप्रती खालच्या भाषेचा वापर करत त्यांचा अनादर करत आहेत. समाज माध्यमांवर काही पत्रकारांनी रेवंती रेड्डी यांना धारेवर धरले. त्यावरून आता रेवंती रेड्डी यांचा तिळपापड झाल्याने त्यांनी पत्रकारांना खालच्या भाषेचा दर्जा दाखवला आहे. जर अशा टीका टीप्पणी केल्यास तुम्हाला नग्न अवस्थेत परेड करण्यास सांगेन. टीका करणे हा एक भाग असतो पण कौटुंबिक अपमान सहन करणार नाही.
Telangana Thalli तेलंगणा येथे राज्यत्वाच्या आंदोलनादरम्यान देवीच्या पुतळ्याचा रंग बदलण्यात आल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. तेलंगणा थल्लीच्या सचिवालयात देवीच्या एका नवीन पुतळ्याचे आनावर करण्यात आले आहे. याआधी असलेली तेलंगणा थल्ली देवी ही हिंदू सणांशी संस्कृती जपणारी आहे. तर संबंधित नवीन पुतळ्यात त्यांनी तेलंगणाची असलेली मुख्य ओळख लपवण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी ९ डिसेंबर २०२४ रोजी तेलंगणा सचिवालयाबाहेर हा पुतळा बसवण्यात आला असल्याचे सांगितले. काँग्रेस सरकारचे प्रमुख रेवंत रेड्डी यांच्या हस्ते या पुतळ्याचे
हैदराबाद : छत्तीसगढ-तेलंगण सीमा भागात मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी ( Naxalites ) यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
Telangana तील पेड्डापल्ली जिल्ह्यात माता पोचम्म थल्लीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये कालीचे अवतार मानल्या जाणाऱ्या माता पोचम्माच्या मूर्तीची विटंबना केल्याबद्दल हिंदू समाजात संताप असून ही घटना बुधवारी ६ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली आहे.
Hanuman temple तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील शमशाबाद येथील हनुमान मंदिराची तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना आहे. या घटनेप्रसंगी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली आहे.
केरळमधील मंत्री चक्क ‘यू-टर्न’ आणि ‘स्पीड बंप’चे उद्घाटन करत आहेत. यावरून केरळमधील विकास प्रकल्पांच्या दयनीय अवस्थेचा अंदाज लावला जाऊ शकतो. केरळचा एक राज्यमंत्री थेट ‘यू-टर्न’चे उद्घाटन करण्यासाठी येतो, यावरून आता तेथील मंत्र्यांना करण्यासारखे काहीच उरलेले नाहीये. केरळ सरकारसाठी आता फक्त ‘यू-टर्न’ आणि ‘स्पीड ब्रेकर’चे उद्घाटन इतकाच कार्यक्रम बाकी आहे. त्यामुळे ‘इंडी’ आघाडी नुसती ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ असून, हा तर निष्क्रियतेचा डावा ‘यु-टर्न’च!
काही अज्ञात हल्लेखोरांनी भूलक्ष्मी मंदिरातील देवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याची घटना सोमवारी रात्री भाग्यनगरच्या राक्षसपुरम परिसरात घडली. संतोष नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण असून याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी मंदिरात मोठा जमाव जमला आणि हल्ल्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. (bhoolaxmi temple goddess news)
हिंदू समुदायाच्या धार्मिक हक्क आणि भावनांवर झालेले परिणाम पाहता लोधी मल्ल्या उत्सवावरील बंदी तात्काळ उठवण्याची मागणी विश्व हिंदू परिषद, तेलंगणाने केली आहे. दरवर्षी हजारो भाविकांना आकर्षित करणारा हा उत्सव पारंपारिकपणे एकादशीच्या दिवसापासून तीन दिवस चालतो. यावर्षी, हा उत्सव १७ जुलै रोजी सुरू होत आहे. (VHP Telangana)
"आपल्या मातृभूमिच्या रक्षणासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यामुळे आपण हिंदू असल्याचे आज गर्वाने सांगू शकतोय. औरंगजेबाच्या अत्याचाराविरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढले नसते, छत्रपती संभाजी महाराज समाजरक्षणाच्या उद्देशाने लढले नसते, तर आज आपण हिंदू म्हणून असतो का, हा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे की, जगावे तर शिवाजी महाराजांसारखे मरावे तर संभाजी राजांसारखे.", असे प्रतिपादन तेलंगणा भाजपचे फायरब्रॅण्ड आमदार टायगर राजा सिंग ठाकुर (Tiger Raja in Nashik) या
‘बाप दाखव नाहीतर श्रद्धा घाल’ अशी एक म्हण आहे. म्हणजे पुरावा असेल तर दाखव, नाहीतर तसे नाही, हे मान्य कर. पण, कम्युनिस्ट, तथाकथित पुरोगामी, काँग्रेस, फुटीरतावादी ही एक अशी जमात आहे, जी पुरावे दाखवत नाही; मात्र बोंबाबोंब जोरात करतात. अशा तथ्यहीन व भ्रमित करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे समाजात द्वेष, तेढ निर्माण होते व काही वेळा कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण होतात. रोहित वेमुलाच्या प्रकरणातही असेच काही घडले.
रोहित वेमुला याच्या आत्महत्येचा वापर एएसए, एसएफआय या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना, डावे पक्ष, डावे कथित विचारवंत, काँग्रेस नेते राहुल गांधी आदींना आपला अजेंडा पुढे रेटण्यासाठी केला. वेमुला याच्या आत्महत्येला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार त्याचप्रमाणे रा. स्व. संघ आणि हिंदुत्ववादी जबाबदार असल्याचाही दावा या इकोसिस्टीमकडून अजूनही करण्यात येतो. अहवालात मात्र वेमुला हा आपल्यास संघटनेवर नाराज होता, नमूद केले आहे. त्यामुळे या इकोसिस्टीमला तडाखा बसला आहे.
दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या हत्येस मोदी सरकार जबाबदार आहे, असा प्रचार करून आपली पोळी भाजणार्या पुरोगामी कंपूचा बुरखा अखेर फाटला आहे. रोहित वेमुला याचे जातप्रमाणपत्र बनावट होते, असे तेलंगणा पोलिसांनी तेलंगणा उच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. बनावट प्रमाणपत्रामुळे मिळालेल्या पदव्या रद्द होऊ शकतात, याची त्याला भीती होती तसेच डाव्या विद्यार्थी संघटनांचाही त्याला राग होता.
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचा एक डीपफेक व्हीडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अनेकावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गुजरातमधून काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष अजेंचा घेऊन अमित शहांचे डिपफेक विडीयो वायरल केले जात असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
लांगुलचालन आणि घराणेशाहीमध्ये बुडलेले इंडिया आघाडीचे नेते आता माझ्या कुटुंबास लक्ष्य करत आहेत. मात्र, १४० कोटी भारतवासी हेच माझे कुटुंब आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तेलंगणा येथे केले.त्याचप्रमाणे राज्यातील सत्ताधारी द्रमुक सरकार केवळ घराणेशाहीचाच विचार करत असून राज्यातील जनतेच्या विकासाशी त्यांना कर्तव्य नसल्याचीही टिका पंतप्रधानांनी केली.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचाराच्या तयारीला लागले आहे. यातच तेलंगणात एका निवडणूक रॅलीला संबोधित करत असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा संयम सुटला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शुक्रवारी तेलंगणा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुस्लिम आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली.
तेलंगणातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. परंतू, प्रचारादरम्यानचा एक धक्कादायक व्हिडीओ पुढे आला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी प्रचार करत असताना एका महिलेने भाजप नेते टी राजा सिंह यांची हत्या करणार असल्याचे म्हटले आहे.
विधानसभा निवडणूका जवळ आल्या असून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीकाटिपण्णी होत आहे. यातच आता बीआरएस नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचा मुलगा आणि मंत्री केटी रामाराव यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी राहूल गांधींना 'राष्ट्रीय पप्पू' म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा सोमवारी जाहीर केल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर, मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर, तर छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे सर्व राज्यांची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
द केरला स्टोरी चित्रपटाला तुफान यश मिळत असताना अभिनेत्री अदा शर्माला मात्र ट्विटरच्या माध्यमातून काही धमक्या मिळत होत्या. त्यानंतर तिचा अपघात झाल्याची बातमी खुद्द अदा हिने आपल्या ट्विटर हँड्लर वरून दिली आहे. दरम्यान अपघात झाला असला तरी आपण सुखरूप असल्याचे वृत्त दादाने जाहीर केले आहे तसेच चाहत्यांनी चिंता करू नये, चित्रपटाची संपूर्ण टीम सुखरूप असून मी स्वतःही व्यवस्थित असल्याचे तिने यावेळी सांगितले.
तेलंगणातील हैद्राबाद येथे "कलाभिषेक परिवार" ही संस्था गेले २५ वर्षे कार्यरत आहे. आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून एक खास कार्यक्रम आयोजित केला आहे. मराठीतील ज्येष्ठ कवी,लेखक प्राचार्य सूर्यकान्त वैद्य यांचा 'सायंतन' हा कवितासंग्रह आणि त्यांच्या कवितांची समीक्षा आणि आस्वाद घेणारा 'अंतर्वेध' या २ ग्रंथांचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे.
तेलंगण काँग्रेसचे अध्यक्ष ए रेवांत रेड्डी यांनी येथील जनतेला आश्वासन देताना म्हटले की, “आम्ही सत्तेत आल्यास राज्यातील 100 मतदारसंघांमध्ये राम मंदिर उभारण्यावर विचार करू. प्रत्येक मंदिर उभारण्यासाठी 10 कोटींचा निधी दिला जाईल,” असेही रेड्डी म्हणाले आहेत.
जनाधार नसणे तसेच ठोस भूमिकेचा अभाव असलेले आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी उठाठेव करत असतात. त्यातूनच काँग्रेस आणि डाव्या पक्षातून शकले झालेले पक्ष मुठभर लोकांना लाभाचे आमिष दाखवून महाराष्ट्रात घुसखोरी करू लागले. कांशीराम-मायावती यांचा बसपा, लालूंचा राजद, केजरीवाल यांचा आप, ओवेसींचा ‘एमआयएम’ आणि आता ‘तेलंगण राष्ट्र समिती’ नावाने परिचित नाव बदललेला ‘भारत राष्ट्र समिती’ हे पक्ष महाराष्ट्रात स्पेस शोधण्यासाठी उतावीळ झाले आहेत.
तेलंगणमध्ये सत्ताधारी पक्षाच्या दमनशाहीचा भाजप कार्यकर्ते सामना करत आहेत. मात्र, या संघर्षातून भाजप तेथे सरकार स्थापन करेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सोमवारी राष्ट्रीय कार्यकारिणीत व्यक्त केला. भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीस सोमवारपासून नवी दिल्ली येथे प्रारंभ झाला. बैठकीच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी संबोधित केले. त्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, “यंदाच्
हिंदूंच्या मंदिरांवर होणारे हल्ले, हिंदुत्ववाद्यांच्या होणार्या हत्या आणि तामिळनाडूमध्ये द्रविडी राजकारणाच्या आड हिंदू समाजाच्या हितांवर घालण्यात येणारा घाला; याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तामिळनाडू यामध्ये केंद्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तामिळनाडूमध्ये पसरलेले ‘पीएफआय’चे जाळे असो किंवा दिवाळीच्या आदल्या दिवशी कोईम्बतूरमध्ये मंदिरासमोर झालेला स्फोट असो, यातून तामिळनाडूस हिंदूहित किंवा राष्ट्रहिताच्या विरोधातील नवी प्रयोगशाळा बनविण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका प्रबळ होण्यास वाव आहे.
केसीआर यांचा मनसुबा काहीही असला, तरी पुढील दोनेक वर्षांत भारत राष्ट्र समिती सात राज्यांत आपला विस्तार करू शकेल, असे मानणे भाबडेपणाचे. पक्षाचे नाव बदलून पक्षाचे भाग्य बदलता आले असते तर नेतृत्व, संघटन, कार्यक्रम यांना अर्थच राहिला नसता. केसीआर यांनी याची जाणीव ठेवणे गरजेचे. दसर्याला नव्या राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली म्हणून आपसूक तो पक्ष ‘सीमोल्लंघन’ करू शकेल, अशी केसीआर यांची अपेक्षा असेल, तर त्यांचा भ्रमनिरास होण्याचा संभव अधिक!
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) पक्षाच्या एका आमदाराचा मुलगा हैद्राबादच्या जुबली हिल्स येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप करण्यात येतोय. भाजप आमदार एम. रघुनंदन राव यांनी पत्रकार परिषदेत काही फोटोमध्ये एआयएमआयएमच्या आमदाराच्या मुलाचा या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुढील महिन्यात २ व ३ जुलै रोजी तेलंगाणामधील हैदराबाद येथे होणार असल्याचे समजते.
"खुलदाबादमध्ये अनेक महापुरुषांच्या दर्गा आहेत. त्याचप्रमाणे औरंगजेबाचीही आहे. इथे कोणीही आलं तरी ते औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घ्यायला अवश्य जातात. त्यामुळे यातून वेगळा अर्थ काढायची काही गरज नाही.", असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे म्हणणे आहे. एमआयएम तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी गुरुवारी (दि. १२ मे) खुलदाबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कंबरीचे दर्शन घेण्यासाठी गेले असता त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
तेलंगणामधील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून दोन राजकीय गटांमध्ये हाणामारी झाली
तेलंगण सरकार ठाकरे सरकारच्या पावलावर पाऊल ठेवूनच पुढे चालल्याचे दिसते. गेल्याच महिन्यात चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यांचाच वाण चंद्रशेखर राव यांना लागल्याने त्यांच्या सरकारने तेलंगण विधानसभेतील भाजप आमदारांचे निलंबन केले. पण, यामुळे भाजप अधिकाधिक लोकप्रिय होईल.
‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’बद्दल छापलेल्या खोट्यारड्या लेखांवरून ‘द वायर’च्या ‘लायर’पणावर शिक्कामोर्तब केलेय ते तेलंगणातील जिल्हा न्यायालयाने! निर्लज्जपणाचा आणि खोटारडेपणाचा कळस गाठणार्या पत्रकारितेबद्दल ‘द वायर’ला तेलंगणमधील जिल्हा न्यायालयाने केवळ लाथाडलेच नाही, तर तिची औकात दाखवून देत खोटारडे लेख हटवण्याचे निर्देशही दिले.
कागदोपत्री तिसरी आघाडी होणे जरी शक्य दिसत असले, तरी ती अस्तित्वात येणे व सत्तारूढ होणे अवघड दिसते. यामागे अनेक कारणं आहेत. एक म्हणजे समजा तिसर्या आघाडीतील घटक पक्षांना मतदारांनी पुरेसे खासदार जिंकून दिले तरी पंतप्रधानपदी कोणी बसावे, हा सर्वात मोठा अडथळा ठरणार आहे. आजच असे दिसत आहे की, ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांनासुद्धा पंतप्रधानपदाची आकांक्षा आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिसर्या आघाडीची विश्वासार्हता.
‘महाराष्ट्र आणि तेलंगण भाऊ भाऊ’, अशी नवी घोषणाही आकाराला आणण्याचे काम जे करीत आहेत ते कालउत्तर भारतीय आणि परवा कन्नड लोकांच्या विरोधात होते. एका भेटीत किती विसंगती असाव्यात त्याचा हा नमुना आहे. भाऊ भाऊ असले, तर बजबजपुरीने राज्य चालविण्यात राव आणि ठाकरे भाऊ भाऊ असू शकतात.
रविवार, दि. २० फेब्रुवारी रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात तब्बल साडेचार तासांची चर्चा झाली. केंद्रात असणाऱ्या भाजप सरकारविरोधात आघाडी तयार करण्यासाठी ही बैठक नेमण्यात आली होती, असे सांगण्यात येत आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, "केसीआर-ठाकरे भाऊ भाऊ, मिळेल ते मिळून खाऊ", असं म्हणत शिवसेनेसह मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
देशापुढे असलेल्या समस्यांमुळे देशातील परिस्थिती बिघडत आहे. या समस्यांवर कशाप्रकारे मार्ग काढता येईल या विषयावरच आमची चर्चा झाली" अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी के चंद्रशेखर राव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दिली
मागील दोन भागांमध्ये आपण आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील काही मंदिरे, त्यांचा संक्षिप्त इतिहास, मंदिरांची स्थापत्त्य शैली यांची धावती ओळख करुन घेतली. तेव्हा, आजच्या ‘दर्शन’च्या या शेवटच्या भागात माहिती करुन घेऊया श्री क्षेत्र पीठापुरम आणि परिसरातील मंदिरांविषयी...
तेलंगण भाजप प्रदेशाध्यक्षांना अटक करण्याची घटना नुकतीच घडली. तेलंगण पोलिसांनी केसीआर सरकारच्या दबावाखाली ही कारवाई केली असल्याचा आरोप भाजप अध्यक्षांनी केला आहे.
तेलंगणा ग्रे हाउंड्स आणि छत्तीसगड पोलिसांची संयुक्त कामगिरी
घटनेने जे धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार दिले आहेत, त्यांची पायमल्ली तेलंगणमधील सेंट मेरी स्कूलप्रमाणे देशातील अनेक मिशनरी शाळांकडून अगदी बेमालुमपणे होत असते. याविरुद्ध हिंदू समाजाने आवाज उठविण्याची गरज आहे. संघटितपणे त्याविरुद्ध आवाज उठविला गेला, तर आणि तरच अशा अन्यायकारक पद्धतीस पायबंद बसेल.
३ नोव्हेंबर रोजी केंद्राने दिवाळीच्या पूर्वसंध्येला कर कपातीची घोषणा केली होती ज्यात पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपयांनी आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपयांनी कपात करण्यात आली होती. या घोषणेनंतर, २५ राज्ये, बहुतेक त्यापैकी एनडीए सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी मूल्यवर्धित कर (व्हॅट) कपात केली आहे.गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, त्रिपुरा, गोवा, उत्तराखंड, मणिपूर, आसाम, बिहार आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांनी केंद्राच्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काही तासांनी व्हॅट कपातीची
केंद्र सरकारने सप्टेंबर रोजी १०,६८३ कोटीच्या अर्थसंकल्पीय कापड क्षेत्रासाठी उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) मंजूर केले आहे. ही योजना मानवनिर्मित फायबर (एमएमएफ) परिधान, एमएमएफ फॅब्रिक्स आणि तांत्रिक वस्त्रांच्या १० विभाग/उत्पादनांसाठी आहे.अधिकृत निवेदनानुसार, वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी प्रोत्साहन रचना एमएमएफ परिधान, एमएमएफ फॅब्रिक्स आणि १० विभाग किंवा तांत्रिक वस्त्रांच्या उत्पादनांमध्ये नवीन क्षमतेच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केली गेली आहे.
भैंसामध्ये एकाएकी दुचाकीस्वार आणि पादचार्यातील वादामुळे हिंदू-मुस्लीम हिंसाचार पसरण्याची स्थिती का उद्भवली? दंगल माजवण्याची हिंमत संबंधितांकडे कुठून आली? असे प्रश्न उपस्थित होतात आणि त्याचे उत्तर वर्तमानात नव्हे, तर तेलंगण सरकार आणि तेलंगण पोलिसांकडून मुस्लीम पंथियांना दिल्या जाणार्या विशेष वागणुकीतून मिळते.
पुदुच्चेरीतून काँग्रेस सरकार पडल्यानंतर दक्षिण भारतातून काँग्रेसचा पुरता सफाया झाल्याचे दिसते. एकेकाळी दक्षिण भारत काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि जवळपास प्रत्येक राज्यात काँग्रेस सत्तेत असे. पण, आज परिस्थिती पूर्णपणे पालटली असून तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि आता पुदुच्चेरीतही काँग्रेसचे नामोनिशाण शिल्लक न राहिल्याचे जाणवते. सन २०१४ मध्ये देशातील तमाम मतदारांनी काँग्रेसला केंद्रीय सत्तेतून पिटाळून लावले आणि काँग्रेसच्या प्रत्यक्ष र्हासाला सुरुवात झाली.
हैदराबादची जनता या महापालिका निवडणुकीत ओवेसी यांच्या एमआयएम आणि तेलंगण राष्ट्र समिती यांच्यात जी ‘छुपी युती’ झाली आहे, त्या युतीस कसा धडा शिकवते ते आता पाहायचे!
मुस्लीम तुष्टीकरणापायी वीरांचा, हुतात्म्यांचा इतिहास पुसून टाकण्याचे काम के. चंद्रशेखर राव करत आहेत. कारण, ‘हैदराबाद मुक्ती संग्रामा’त भारतमातेच्या अनेक सुपुत्रांचे रक्त सांडले, अनेकांनी आपले आयुष्य अर्पण केले. पण, त्या बलिदानींना कृतज्ञतेने आठवून त्यांचा सन्मान करण्यापेक्षा के. चंद्रशेखर राव खुर्चीसाठी मुस्लीम मतांची काळजी करताना दिसतात.
सध्या महाराष्ट्रातच नव्हे, तर तेलंगणसारख्या इतर राज्यामध्ये देखील विद्यापीठाच्या परीक्षा घ्याव्यात की घेऊ नये, यावरून गदारोळ, गोंधळ सुरू आहे. महाराष्ट्रात तर या गोंधळाला राज्यपाल, विद्यापीठाचे कुलपती विरुद्ध राज्य सरकार असा राजकारणी रंग लाभला आहे. या निमित्ताने एकूणच आपल्या देशातील शालेय, विद्यापीठीय, परीक्षा पद्धतीची चर्चा करण्याची, एकूण व्यवस्थेचे विश्लेषण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
२६ते २९ जून दरम्यान तीनही राज्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेणार
: कोरोना विषाणूमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा परिणाम मदरशांवरही जाणवू लागला आहे. तेलंगणातील ४ हजार मदरशांमध्ये रमजान काळात मिळणारे दान आणि देणगी स्वरुपातील रक्कम येणे बंद झाले आहे. त्यामुळे अशा ६० हजार मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न उभा राहिला आहे.