अभिनेता भरत जाधव यांनी नुकतेच नाट्यगृहांतील दुरावस्थेवर आसूड ओढले आणि त्यानंतर प्रेक्षकांची माफी मागत पुन्हा रत्नागिरीत प्रयोग ठेवणार नसल्याची माफी मागितली. त्यानंतर, नाट्यगृहाच्या सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान जिगीषा निर्मित चारचौघी या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या नाट्यगृहाचे कौतुक करताना अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडीओ केला आहे.
Read More