अमरावती : भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य केले. त्यांनी केलेल्या अद्भुत कार्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा मिळाली आहे. भाऊसाहेबांनी दीनदलित, शेतकरी, शेतमजूर यांच्या शाश्वत विकासासाठी राबवलेल्या संकल्पनेवरच शासनाची वाटचाल सुरु राहील, अशी ग्वाही देतानाच या महान, दूरदर्शी व द्रष्ट्या नेत्याला आदरांजली म्हणून त्यांचे १२५ वे जयंती वर्ष शासनाच्यावतीने साजरे करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
Read More
भारतीय शेतीच्या विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केले आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत अटारी पुणे कार्यालयाचे उद्घाटन नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते ऑनलाइन पद्धतीने बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महानिदेशक (कृषि विस्तार) डॉ. व्ही. पी. चहल, महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाट