महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त सात आमदारांनी मंगळवारी शपथ घेतली. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या सात आमदारांनी सदस्यत्वाची शपथ दिली.
Read More
राज्यपाल नियुक्त सात आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यासाठी उबाठा गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तातडीने सुनावणीही पार पडली. परंतू, न्यायालयाने या आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.