ज्यादिवशी आपल्या शंभुराजांनी आत्मबलिदान दिले, तो दिवस होता फाल्गुन अमावस्या. २०२५ या वर्षी २९ मार्च हा दिवशी तो दिवस आला आहे. त्यानिमित्ताने बलिदान मास सुरु झाला आहे. या बलिदान मास मध्ये काय करता येईल? तो शिवभक्तांनी कसा पाळावा? वाचा सविस्तर Dharmaveer Balidan Maas 2025
Read More
(Chhaava Movie Trailer) चित्रपटप्रेमींना प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा दमदार ट्रेलर बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी संध्याकाळी प्रदर्शित झाला. इतिहासकार शिवाजी सावंत यांच्या छावा या प्रसिद्ध मराठी कादंबरीवर आधारित लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलसह, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर अश्या तगड्या कलाकारांची वर्णी लागली आहे.
"छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते स्वराज्य टिकवायची जबाबदारी आता आपली आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी १०० % टक्के मतदान करा!", असे आवाहन समस्त हिंदू बांधवांना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे महत्त्व जाणून घेता त्यांनी एका व्हिडिओद्वारे मतदारांना हे आवाहन केले आहे. Govinddev Giri Maharaj appeal for voting
रामाच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द विवेकधिष्ठित असल्याने तो निश्चियात्मक असतो. तो शब्द फिरवण्याची वेळ कधी रामावर येत नाही. म्हणून रामाला ‘एकवचनी’ म्हणून ओळखतात. कोणत्याही परिस्थितीत राम आपल्या वचनावरून मागे फिरत नाही.
चिन्मय विश्वविद्यापीठात दि. १९ फेब्रुवारी, २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जयंतजींचे सुरेख अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. ‘आजादी का अमृत महोत्सव’ या घोषणेला अनुसरत जयंतजींनी विषय निवडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्य’ संकल्पनेचा अनेकांगी उहापोह केला.
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, राज्याभिषेक करवून घेतला, अखंड हिंदुस्थानाला राजा मिळाला या प्रेरणादायी इतिहासामुळेच पुढे कित्येक वर्षे राजा नसतानाही रयतेने धैर्याने संकटाचा मुकाबला केला. आताच्या शतकातही कित्येकांच्या आयुष्यात उमेद निर्माण करणाऱ्या या सुवर्णक्षणाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथी प्रमाणे २ जून २०२३ रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला.
हिंदवी स्वराज्य उभे करताना छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची. ज्यांना फक्त एकच गोष्ट ठाऊक होती ती म्हणजे आपण ‘फकस्त लढायचं, आपल्या राजासाठी अन स्वराज्यासाठी’. इतिहास नेहमीच शौर्याने, पराक्रमाने, तर कधी कधी अनेक षडयंत्रांनी भरलेला असतो. ऐतिहासिक काळातील महान व्यक्तिरेखांवर बेतलेले सिनेमे अलीकडच्या काळात आले आणि त्याला उदंड लोकाश्रयही मिळाला. याच यादीत एका चित्रपटाचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे.
महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक संचालनालय आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे महादजी शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिल्ली विजयोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवाजी महाराजांच्या याच राजमुद्रेच्या अष्टकोनी आकारात आता भारतीय नौदलाचे नवे चिन्ह तयार करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांच्या या राजमुद्रेच्या निर्मितीमागे खूप मोठा विचार होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्यापूर्वी वडील शहाजी राजेंचा यात मोठा विचार होता
दि. १५ फेब्रुवारी, १९११ या दिवशी इंग्रजांनी लेफ्टनंट कर्नल पॉवेल याच्या अधिपत्याखाली ‘इंडियन सिग्नल सर्व्हिस’ची स्थापना केली. पुढे पथकाचं नाव ‘इंडियन सिग्नल कोअर’ असं झालं. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धात; तसंच स्वातंत्र्यानंतर १९४७-४८, १९६२, १९६५, १९७१ आणि १९९९ अशा सर्व युद्धांमध्ये ‘सिग्नल कोअर’ने उत्कृष्ट कामगिरी बजावून ‘स्विफ्ट अॅण्ड अॅलर्ट’ हे आपल्या पथकाचं घोषवाक्य सार्थ ठरवलं आहे.
अटक ते कटक' हिंदवी साम्राज्य स्थापनेचे स्वप्न महादजी शिंदे यांनी साकारले 'अटक ते कटक' असे हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बीज छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवले होते. त्यापासून प्रेरणा घेऊन बलाढ्य असे मराठा साम्राज्य स्थापन करण्यात महादजी शिंदे यांनी सर्वस्व अर्पण केले, असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठिततर्फे दिल्ली येथील नव्या महाराष्ट्र सदनात 'दिल्ली विजयोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्
समर्थवाङ्मयातून प्रकट झालेले आणि स्वामींच्या शिष्यांनी समर्थांचे जे गुणविशेष प्रसंगानुरूप सांगितले, त्यावरून समर्थांच्या व्यक्तिमत्त्वाचा तसेच त्यांच्या चरित्राचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखांतून करीत आहोत.
हिंदू संस्कृतीवरील आक्रमण रोखून लोकांना संस्कृतीरक्षणासाठी तयार करणे, हिंदवी स्वराज्यासाठी लोकांना अनुकूल करून घेणे, लोकांच्या मनात रामराज्याची प्रेरणा निर्माण करणे, लोकांना धीर धरा, असे सांगून म्लेंच्छांच्या धाडीची भीती घालवणे, बलोपासनेचे धडे देऊन लोकांमध्ये धैर्य उत्पन्न करणे, लोकांना खरे अध्यात्म व भक्तिरहस्य सांगून त्यांना दांभिक गोसाव्यांपासून सोडवणे, हिंदूंमधील दैवतांचा गल्बला बाजूला सारून लोकांना रामोपासनेला आणि हनुमानाच्या उपासनेला लावणे, अशी अनेक समाजोपयोगी आत्मोद्धाराची कामे स्वत: सूत्रधार होऊन त्
१९२६ सालच्या फेब्रुवारी महिन्यातल्या एका उदासवाण्या दिवशी लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरलेल्या कृष्णकांत अत्रीला इंग्रजी भाषेचा गंधही नव्हता. तेव्हापासून आतापर्यंत ही वाटचाल स्वतः पंडित कृष्णकांतनाही आश्चर्यकारक, पण आनंददायी वाटते.
नाशिकमधील तपाचरणाच्या काळात स्वामींनी हिंदवी स्वराज्याचे, हिंदवी संस्कृती रक्षणाचे स्वप्न पाहिले होते. पुढे बारा वर्षांनी तीर्थाटनाहून परत महाराष्ट्रभूमीत आल्यावर स्वामींनी धार्मिक पातळीवर समाजसंघटनाच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली.
अखेरीस शिवाजी महाराज माहुलीला आले असताना त्यांची एका समर्थशिष्याशी गाठ पडली आणि त्या शिष्याने रामदास स्वामींकडून शिवाजी महाराजांसाठी आणलेले एक पत्र त्यांना दिले. त्या पत्रातून समर्थांनी शिवाजी महाराजांचे अप्रतिम वर्णन केले आहे. त्या पत्रानंतर आजतागायत सुमारे ३५० वर्षांमध्ये अनेक अभ्यासकांनी, प्रतिभावंतांनी, कवींनी, शाहिरांनी शिवाजी महाराजांचे वर्णन केले आहे
समर्थ रामदास स्वामी व शिवराय या दोघांनाही माणसाच्या अंगच्या दैवी संपदेची चांगली जाण होती.