भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. मात्र, आता त्याच ट्रम्प यांनी आपण केवळ तणाव निवळण्यासाठी मदत केली, असे म्हटल्याने, भारताची कूटनीतिक शक्ती अधोरेखित होण्याबरोबरच विरोधकही तोंडावर आपटले आहेत.
Read More
अमेरिकेचे माजी पेंटागॉन अधिकारी मायकल रुबिन यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, भारताने लष्करी आणि राजनैतिक दोन्ही स्तरांवर अतिशय यशस्वी कामगिरी केली. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “भारताने फक्त शस्त्रानेच नव्हे, तर डिप्लोमसीच्या जोरावरही पाकिस्तानला पराभूत केले.” त्यांनी हेही सांगितले की, पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केली, हेच भारताच्या ताकदीचे लक्षण आहे.
विशेष प्रतिनिधी मंगळवारी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील केलर येथील शुक्रू वनक्षेत्रात लष्कर-ए-तोयबा (एलईटी) शी संबंधित तीन दहशतवादी मारले गेले आहेत.
काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'ने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केलेच, तर पाकिस्तानी हवाई दलालाही हादरवून टाकले. सोमवार, दि. १२ मे रोजी तिन्ही लष्कर प्रमुखांनी दिल्ली येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत या कारवाईची संपूर्ण माहिती दिली. दरम्यान, भारतीय हवाई दलाचे डीजीएमओ, एअर मार्शल ए.के. भारती यांनी गोस्वामी तुलसीदास यांच्या 'रामचरितमानस' मधील "विनय न मानत जलधि जड़, गए तीन दिन बीत, बोले राम सकोप तब, भय बिनु ह
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री हे ऊर्जा अर्थात शक्तीचे प्रतीक आहे, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांनीही कायमच रणांगण नुसते गाजवलेच नाही, तर आपल्या अचाट पराक्रमाने शत्रूलाही तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले आहे. काळ कितीही बदलला तरी भारतातील स्त्रियांमधील पराक्रम आजही आहे तसाच आहे. आज भारतीय सैन्यदलात मोठ्या संघर्षाने स्वत:चे स्थान निर्माण करणारी प्रत्येक स्त्री हाच पराक्रमाचा वारसा जपताना दिसते. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह हे त्या स्त्री शक्तीचे मूर्तिमंत उदाहरण ठरावे. स्त्रियांच्या संघर्षाचा
जम्मू आणि काश्मिरच्या कुपवाडा, बारामुला, उरी, पुंछ, मेंधार आणि राजौरी या भागांमध्ये निरपराध नागरिकाना लक्ष्य केल्यामुळे पाकिस्तानने स्वतःला अडचणीत आणले आहे. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या या हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या कारवाईबाबत पाकिस्तान सरकारने अपेक्षाही केली नसेल. यावेळी १०० नाही तर थेट ३०० किलोमीटरच्या आत असलेल्या बहुतेक महत्त्वाच्या ठिकाणांवर भारताकडून मोठे हल्ले करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, भारतीय नौदलाच्या युद्धनौके आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात तैनात करण्यात आले असून कराची ब
पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थक परिसंस्थेविरुद्ध भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून निर्णायक कारवाई करण्यात आली. त्याबद्दल भारत सरकार आणि सशस्त्र दलांच्या नेतृत्वाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कौतुक करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर, त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि समर्थन यंत्रणेवर केली जात असलेली लष्करी कारवाई ही देशाच्या सुरक्षेसाठी एक आवश्यक आणि अपरिहार्य पाऊल असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी म्हटले आहे. RS
८ मे २०२५ रोजी संध्याकाळी पाकिस्तानने भारताच्या जम्मू, पठाणकोट, उधमपूर इ लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याला लगेच प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानच्या AWACS विमानासह त्यांच्या तीन लढाऊ विमानांना पाडले. या कारवाईत भारताने पाकिस्तानची लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निकामी केली, ज्यामुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
भारतीय रेल्वे हे जगातील चौथे मोठे सर्वाधिक विस्तारलेले जाळे. सध्या भारतीय रेल्वेचा सुवर्णकाळ सुरू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, नववर्षाच्या प्रारंभी एकूण रेल्वे नेटवर्कपैकी 23 हजार किमीपेक्षा जास्त मार्गांवर ताशी 130 किमी वेग (किमी प्रतितास)पर्यंत वाढवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. ही उल्लेखनीय प्रगती रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि देशभरातील लाखो प्रवाशांसाठी प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेलाच अधोरेखित करते. भारतातील जवळजवळ एक पंचमांश रेल
कष्टे करोनि घसरावे म्लेंच्छावरी...
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बुधवारी पहाटे भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे तळ क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी 'पिक्चर अभी बाकीं है' म्हणत या प्रकरणावर सूचक प्रतिक्रिया दिलीय. Manoj Naravane on Operation Sindoor
दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचे प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे एक्शन मोडवर होते. दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’व्दारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदीजीच्या अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्याला ‘न भूतो न भविष्यते’अशी शिक्षा दिली जाईल असेही सांगितले होते.
दहशतवादाविरोधात आम्ही ‘झिरो टोलरन्स’, हेच धोरण अवलंबवले आहे. जगानेही तसेच दाखवावे, अशी पोस्ट एक्सवर केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी केली आहे. “दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जगाने पुढे यावे, या आशयाची एक्स पोस्ट परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी केली आहे. जयशंकर यांचे हे वक्तव्य 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर आले आहे.
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने बुधवारी पहाटे ऑपरेशन सिंदूर राबवले. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत या ऑपरेशनची संपूर्ण माहिती दिली. दोन्ही सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताचे हवाई दल, लष्कर आणि नौदल यांनी एकत्रितपणे ही कारवाई केली. विशेष म्हणजे, भारताने ऑपरेशन सिंदूर प्रकरणी दोन महिला अधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद आयोजित करून जगाला महिला शक्तीचा संदेश दिला आहे. Vyomika Singh Sofia Qureshi
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत दहशतवादी तळांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे. या कारवाईमुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांनी घुसखोरीचे नेटवर्क उद्ध्वस्त केले असून मुख्य सूत्रधार चांद मियाँसह सहा बांगलादेशी घुसखोर आणि पाच भारतीय एजंटना अटक केली आहे. हे भारतीय एजंट बांगलादेशींना भारतात घुसखोरी करण्यास मदत करायचे, त्यांच्यासाठी बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे बनवायचे आणि त्यांना आश्रयही द्यायचे. बंगाल आणि मेघालयातून बांगलादेशींना घुसखोरी केल्यानंतर, एजंट बनावट कागदपत्रे तयार करून त्यांना देशाच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक करायचे. आरोपी चाँद मिया यांने दिल्लीत ३३ बांगलादेशींची भारतीय कागदपत्रांसाठी नोंदणी करून घेतल
जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर भारतीय ऊर्जा क्षेत्राचा आढावा घेऊन, अणुविद्युतनिर्मिती आपली वाढती ऊर्जाक्षुधा भागविण्यास कशी सक्षम ठरू शकते, तसेच या कामात अत्याधुनिक लघु रचनासुलभ अणुभट्टी आणि भारत लघु अणुभट्टी कशी महत्त्वाची ठरू शकते, याचा घेतलेला आढावा.
पहलगाम दहशतवादी हल्लानंतर केंद्र सरकारने अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी २७ एप्रिलपर्यंत देश सोडावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे निर्देश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे काही याचिकाकर्त्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड आहेत. यासंदर्भात शुक्रवार, दि.२ मे रोजी न्यायालयाने एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या भारतीय नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी सेनादलांना कारवाईचे स्वातंत्र्य दिले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीदेखील पंतप्रधानांची भेट घेतल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे
डिजिटल सेवेचा वापर करणे, हा सध्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने याबाबत २० निर्देश जारी केले. या ऐतिहासिक निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने डिजिटल सेवाचा लाभ घेणे व त्याचा वापर करणे हा मूलभूत अधिकार असल्याचे म्हटले आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडितांनी डोळे गमावले असतील, ज्यांना दृष्टीदोष किंवा अंधत्वासारख्या समस्या असतील, अशा ग्राहकांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया सुलभ करणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केवायसी म्हणजेच Know Your Customer ज्यात ग्र
भारत आणि फ्रान्सने सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी २६ राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी ६३ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक येथील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयात हा करार करण्यात आल्याचे भारतीय नौदलाने सांगितले. सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने या महिन्याच्या सुरुवातीला या कराराला मंजुरी दिली होती.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांच्या हत्येनंतर भारत सरकारने कठोर पाऊल उचलत पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. यासंदर्भात भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांचे बंधू नरेश टिकैत यांनी भारत सरकारने सिंधू पाणी करार रद्द करणे योग्य नसल्याचे वक्तव्य केले. नरेश टिकैतचे वक्तव्य देशविरोधी शक्तींना पाठबळ देणारे असून देशाच्या शत्रूंना मुळापासून नष्ट करणे हाच समस्येवरचा उपाय असल्याचे भारतीय किसान संघचे अखिल भारतीय महामंत्री मोहिनी मोहन मिश्र या
वक्फ कायद्याविरोधात नव्याने याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी याबद्दल झालेल्या सुनावणीत वक्फ सुधारणा कायद्याविरुद्धात कॉपी-पेस्ट याचिका नको, अशा शब्दांत कानउघडणी केली आहे. वक्फ सुधारणा कायदा २०२५ ला आव्हान देणारी कोणतीही नवीन रीट याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
पाकिस्तानस्थित सायबर गुन्हेगारांना पुन्हा एकदा भारतीय सायबर सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्यात अपयश आले आहे. भारतीय सायबर सुरक्षा यंत्रणांनी पाकचा नापाक इरादा धुळीस मिळवला आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही (एलओसी) पाकच्या गोळीबारास भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत केंद्रीय पॅनेलच्या सहसचिव पदावर प्रचंड विजय मिळवला. अभाविपचे उमेदवार वैभव मीणा यांनी सहसचिव पदावर विजय मिळवत डाव्या संघटनांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. त्याचबरोबर १६ शाळा आणि विविध संयुक्त केंद्रांमध्ये एकूण ४२ पैकी २४ समुपदेशक पदांवर विजय मिळवून अभाविपने 'लाल किल्ल्यावर' भगवा फडकवला आणि अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या तथाकथित डाव्या विचारसरणीचा पाडाव केल्याचे दिसून आले. ABVP in JNU Election Result
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ६० वर्षांपूर्वी मांडलेला ‘लोकमत परिष्कारा’चा विचार आजही प्रासंगिक आहे. किंबहुना हा समाजोत्थानाचा मार्ग आहे. या मार्गावर धोरणात्मक मार्गक्रमण केल्यास येत्या काळात भारत गतिमान प्रगती साधेल,” असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केला. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल २०२५ रोजी दरम्यान आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’त ते बोलत होते.
भारतीय राष्ट्रदर्शन विकसित होण्यासाठी किमान १५ ते २० हजार वर्षे लागली. त्यामुळे आपल्या संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. पाश्चात्य देशांच्या ’नेशन’ या संकल्पनेशी भारताच्या ’राष्ट्र’ या संकल्पनेची तुलनाच होऊ शकत नाही. कारण, आपल्याकडे बहुराष्ट्रवाद नाही. आपल्या संस्कृतीत एकतेचा संदेश आहे. आपण भूमीला ’माता’ मानतो. त्यामुळे ’नेशन’ आणि ’राष्ट्र’ या भिन्न संकल्पना आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केले. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल रोजीदरम्यान आयोजित
जगाला नवा मार्ग दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यासाठी वसाहतवादी वैचारिक वारसा सोडून भारतीय विचारांना बळकट करण्याची गरज आहे. त्यामध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची भूमिका महत्त्वाची ठरते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) प्रायोजित आंतरराज्य छात्र जीवनदर्शनच्या (एसइआयएल) नव्या वास्तूचे ‘यशवंत’चे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत, अमृत भारत एक्स्प्रेस आणि नमो भारत रॅपिड ट्रेनला आधुनिक भारतीय रेल्वेची त्रिवेणी म्हणून संबोधले आहे. या त्रिवेणीतील वंदे भारत आधीच संचलनात आहेत, तर आता नवीन गाड्या बिहारमधून मुंबईच्या दिशेने धाव घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बिहारमधील नवे तीन प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात सहरसा-लोकमान्य टिळक दरम्यान पहिली अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे.
Constitution आजच्या घडीला काँग्रेसने संविधानाचा आणि त्याच्याशी सर्व भारतीयांच्या जोडलेल्या भावनांचे जे राजकारण केले आहे, ते चिंताजनकच नव्हे तर, अपमानकारकदेखील ठरते. कारण, काँग्रेसकडे संविधानाचे रक्षणकर्ते असल्याचे दाखवण्याचा नैतिक अधिकार आहे का? हा प्रश्न विचारायलाच हवा.
सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आपला जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हा लौकिक कायम ठेवणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. देशांतर्गत मागणीत झालेली वाढ त्यामुळे उत्पादनाला मिळणारी चालना यांमुळे भारत हा विकासदर गाठू शकेल असे या अहवालात म्हटले आहे
"भारतीय संस्कृती जगाच्या मार्गदर्शनाचे केंद्रबिंदू बनली आहे. भारत हा जागतिक नेता राहिला आहे आणि आज पुन्हा जगातील लोक भारताच्या चालीरीती, तत्त्वे, परंपरा आणि संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. कानपूर येथे कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण संरक्षण गतिविधीतील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. भारतीय संस्कृतीचे महत्त्व, कौटुंबिक जवळीक आणि पर्यावरण संरक्षण यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून आले. Sarsanghachalak Kanpur Swayamsevak Meeting
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली सारखा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त आणि शेवटचा जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पालकत्वात वेगाने 'स्टील सिटी' होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. हे साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते, पूल तसेच रोजगार विषयक कामांना प्राधान्य दिले जात आहे. याच उपक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे ९४३ कोटी २५ लाख रुपये देण्यास नुकत्याच पार पडलेल्या मंत्
Drugs Smuggler भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. ज्यात त्यांना मोठे यश संपादन करता आले आहे, १२-१३ एप्रिलच्या रात्री भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाईमध्ये समुद्रातून तस्करी करत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, ज्याची किंमत सुमारे १८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे औषध मेथाम्फोटामाइन असण्याची शक्यता असून यासंदर्भात अजूनही चौकशी सुरू
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १३ एप्रिल रोजी सकाळी आपल्या एक्स मिडीया हँडल वरुन समस्त भारतीयांना बैसाखीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. उत्तर भारतामध्ये बैसाखीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यावेळी १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला हत्याकांडाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की " हा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे.
Dr. Babasaheb Ambedkar यांचे कार्य व्यापक असेच आहे. विविध क्षेत्रातील धोरणनिर्मितीमध्ये त्यांचे स्वातंत्र्यपूर्व योगदान अतुलनीय असेच. देशाच्या समोर आलेल्या कोणत्याही समस्येकडे, समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना शोधण्याच्या वृत्ती त्यांच्या ठायी होती. देशासमोरील आव्हानांवर त्यांनी सांगितलेल्या उपायांचा त्यांच्या जयंतीनिमित्ताने घेतलेला मागोवा...
“सध्याच्या जागतिक अर्थकारणातील उलथापालथींच्या काळात भारत हा एकच आशेचा किरण उरला आहे” अशा शब्दांत राष्ट्रीय शेअर बाजारा म्हणजे एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी मांडले. भारताच्या भविष्याचा वेध घेणारी इंडिया ग्लोबल फोरम मुंबईत संपन्न झाली
भारताला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्याच्या रक्षणाची जबाबदारी भारतीय नौदल समर्थपणे सांभाळत आहेच. मात्र, जागतिक व्यापारात भारतीय व्यापारी नौदलही विक्रमाचे नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. याच व्यापारी नौदलाचा भारतातील इतिहास आणि स्वदेशी नौदलाची प्रवास याचा घेतलेला हा आढावा...
मी कठोर परिश्रम, इमानदारी आणि समर्पण यावरच सतत विश्वास ठेवत, काम करत गेलो असे म्हणत दिल्ली न्यायालयाचा स्वत:च्या बाजूने लागलेला निकाल विनम्रपणे स्वीकारणारे आणि एकाचवेळी भारतीय हॉकी आणि आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये विविधपदे सांभाळत हॉकीमध्ये आधुनिकता आणणार्या नरिंदर बत्रा यांच्याविषयी...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा अक्षयवट आहे, असेच म्हणावे लागेल.
काँग्रेसमधील नवे अर्थतज्ज्ञ राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यात भाजप सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत, बँकिंग क्षेत्र संकटात असल्याचा आरोप केला असून, मोदी सरकार या स्थितीला जबाबदार असल्याचेही म्हटले आहे. तथापि, आर्थिक दृष्टिकोनातून पाहता हा दावा दिशाभूल करणाराच ठरतो. भारतीय बँकिंग क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर थकीत कर्जांच्या समस्येने ग्रासले होते आणि याची मुळे काँग्रेसच्या काळातील अनियंत्रित आणि बेजबाबदार कर्जवाटप धोरणांमध्येच सापडतात.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देशातील महत्वाची खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी काढलेल्या परिपत्रकात एचडीएफसी बँकेला केवायसी प्रक्रियेतील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे
भारतीयांनी वैदिक काळात स्थापत्य, ज्योतिष, खगोलशास्त्र, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये अपार असे ज्ञान आणि कौशल्य संपादित केले होते. दीर्घकाळापर्यंत भारतीय या ज्ञानाचा दैनंदिन वापर करत होते. मात्र, इंग्रजी आक्रमणानंतर त्यात खंड पडला. तेव्हा अशाच काही भारतीय वैज्ञानिक संशोधन परंपरांचा पुनःपरिचय करुन देणारा हा लेख...
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा देशाने यशस्वीपणे सामना केल्याचे कौतुकोद्गार ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने काढले. तसेच, पुनश्च भारताच्या आर्थिक वृद्धीवर ‘नाणेनिधी’नेच विश्वास दर्शविल्यामुळे विरोधकांच्या अर्थअप्रचाराला सणसणीत चपराक बसली आहे.
'भारतीय निवडणूक आयोग’ ही देशाच्या लोकशाही व्यवस्थेची एक अत्यंत विश्वासार्ह आणि संविधानिक संस्था आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीत निवडणूक आयोगाची भूमिका केवळ निवडणुका पार पाडण्यापुरती मर्यादित नसून, देशाच्या लोकशाही मूल्यांची रक्षण करणारी ती आधारशिला आहे. मात्र, कपिल सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या संस्थेवर जे आरोप केले आहेत, ते अत्यंत घातक आहेत. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर ‘अपयशी आणि निष्क्रिय’ अशी टिप्पणी करताना जे राजकारण केले, ते नेमके विरोधकांची मानसिकता दर्शवते.
सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयावर विश्व हिंदू परिषदेने जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर या निर्णयाला असंविधानिक, तुष्टीकरणाची उंची आणि पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे. VHP on Muslim Reservation in Karnataka
विलिनीकरणानंतर कोकण रेल्वेचे नाव तसेच राहणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बंगळुरु येथे होत आहे. बांगलादेशातील हिंदू समाजासोबत एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन करण्याबाबतचा प्रस्ताव बैठकीच्या दुसऱ्या दिवशी (शनिवार, दि. २२ मार्च) संमत करण्यात आला. सहसरकार्यवाह अरुण कुमारजी यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर देखील उपस्थित होते. RSS ABPS Day 2 Press Conference
भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या दहा वर्षात अनेक विकसित राष्ट्रांनाही मागे टाकत आपली घौडदौड चालूच ठेवली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आयएमएफच्या अहवालानुसार भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन २.१ ट्रिलियन डॉलर्स वरुन झेप घेत ४.३ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे
नुकतेच इंडसइंड बँकेच्या अनिवासी भारतीय (NRI) ठेवींवरील व्यवसायातील अनियमितता आणि वित्तीय धोके समोर आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यानिमित्ताने भारतीय बँकिंग क्षेत्रातील धोरणे, अनियमितता आणि जोखीम व्यवस्थापन यांचा ऊहापोह करणारा हा लेख...