‘युरो-अटलांटिक’ ते ‘इंडो-पॅसिफिक’: नकाशा पाहा
‘टीम मार्शल’ म्हणतोय, आजचं जग ‘युरो-अटलांटिक’ नव्हे, तर ‘इंडो-पॅसिफिक’ बनलंय. कारण, नवा जागतिक संघर्ष प्रदेश आता आशिया खंड आणि त्याच्या भोवतीचा हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर असणार आहे. या संघर्षातले मुख्य भिडू आहेत अमेरिका, चीन आणि उत्तर कोरिया. बाकीचे भिडू आहेत रशिया, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि आखाती देश. म्हणजेच ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड हे युरोपिय प्रगत देश यात नाहीत. प्रगत आणि अण्वस्त्रसज्ज असूनही नाहीत. का नाहीत?
Read More