हिंदू नववर्षदिनी अर्थात गुढीपाडव्याला (३० मार्च रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) मुख्याल रेशिमबाग येथे भेट देणार आहेत. हिंदू नववर्षानिमित्त रा. स्व. संघाने 'प्रतिपदा' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृती मंदिरास भेट देऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांना आदरांजली वाहतील. Narendra Modi at Reshimbaug
Read More
"श्री गुरुजींचे तत्त्वज्ञान आजच्या काळात पूर्वीपेक्षा अधिक समर्पक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने संघाच्या वैचारिक चौकटीला आकार मिळाला आहे. गुरुजींचे जीवन समर्पण आणि दूरदृष्टीची गाथा आहे. हे पुस्तक त्यांच्या तत्त्वांना समजून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून काम करेल." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. Shri Guruji Drishti - Darshanikata book publishing
‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये ‘अंतर्गत संकट’ नावाच्या प्रकरणात, ज्या तीन संकटांचा उल्लेख आहे, त्यातील जिहादी मुस्लिम कट्टरवादाच्या दहशतीने आज संपूर्ण जग त्रस्त आहे. या शक्ती भारतात ज्या फुटीरतावादी कारवाया करत आहेत, त्याने संपूर्ण देश चिंतित आहे. चर्चद्वारा फसवून-कपटाने होत असलेले कन्व्हर्जन, अनेक अराष्ट्रीय कारवायांना मिळणारे त्यांचे छुपे समर्थन आणि शहरी माओवाद किंवा नक्षलवादाच्या संकटांचे गांभीर्य, आताच्या काही घटनांमुळे सर्वांसमोर आले आहे.