जपान देशाच्या जपान मिंट (टांकसाळी) या प्रशासकीय संस्थेतर्फे आयोजित 'आंतरराष्ट्रीय नाणे संकल्पना 2023' स्पर्धेत 'कोकणातली अश्मयुगीन कातळशिल्प' या विषयावर आधारित नाणे डिझाईन सादर करणारे शिल्पकार मुकेश पुरो यांना 'फाईन मास्टर आर्टिस्ट' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर त्यांनी सादर केलेल्या कलाकृतीला 'फाईन आर्ट' म्हणून गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुकेश पुरो यांनी कातळशिल्पांची छबी रत्नागिरीची अजून एक खास परिचित ओळख असलेल्या हापूस आंब्याच्या पार्श्र्वभूमीवर साकारली आहे.
Read More
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या 'विकासदरा'चे आकडेवारी जाहीर केले आहेत. या आकडेवारीनुसार भारताचा 'विकासदर'६.१ टक्क्याने वाढला आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतातील अशा विचारवंतांपैकी एक आहेत, ज्यांनी ‘विचारांचे स्वराज’ - म्हणजेच ‘भारतीय मनाचे उपनिवेशीकरण’ हा विचार मांडला. भारत राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला आहे. पण, वैचारिकदृष्ट्या अजूनही वसाहतवादी मानसिकता मोठ्या प्रमाणात रुजू आहे. तेव्हा, नवीन संसद भवनाचे होणारे राष्ट्रार्पण आणि ‘भारत काय विचार करतो, याकडे जगाचे लक्ष आहे,’ या पंतप्रधान मोदींच्या विधानाचा एकात्म मानवदर्शनाच्या माध्यमातून मांडलेला हा विचार...
चतुर्भुज सुरक्षा संवाद’ म्हणजेच ’क्वाड’ हा ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि युनायटेड स्टेट्स या चार राष्ट्रांतील धोरणात्मक सुरक्षा संवाद आहे, जो सदस्य देशांतील चर्चेद्वारे राखला जातो. या क्वाडची स्थापना २००७ मध्ये करण्यात आली. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी आपल्या एका दैनंदिन पत्रकार परिषदेत क्वाडमध्ये नवीन सदस्य जोडण्याची कोणतीही योजना झाली नसल्याचे सांगितले.
मिझुहो इंडिया जपान स्टडी सेंटर २१ एप्रिल रोजी ‘क्रिएटिंग अ ग्लोबल लिंगुआ फ्रँका: रोल इन अ कॉमन लँग्वेज आणि ब्रिजिंग द लँग्वेज डिव्हाईड’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करणार आहे. भाषा ही दोन संस्कृतींना जोडनंतर एक महत्वपूर्ण दुवा असल्याने या दिशेने पावले उचलणे गरजेचे असल्याचे होत असलेल्या चर्चांमधून दिसून यते. नुकतेच इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सने सुद्धा शेजारील देशांसोबत भाषिक दुवा साधण्याचा प्रस्ताव जाहीर केला.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर खुनी हल्ला झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे सगळे जग शोकाकुल झाले आहे. या पाश्वर्र्भूमीवर कोरोना फेम चीनमध्ये काय दृश्य आहेत? तर, चीनच्या ‘विबो’ या समाजमाध्यमांवर चिनी नागरिक शिंजो आबेंच्या मृत्यूवर चक्क आनंद व्यक्त करत आहेत. ते एकमेकांचे अभिनंदन करून संदेश लिहित आहेत की, “आज आम्ही एक प्लेट जास्त भात खाऊ.” तर काही चिन्यांनी मत व्यक्त केले आहे की, जे शिंजो आबेंबरोबर झाले, तेच जपानच्या विद्यमान पंतप्रधान तसेच दक्षिण कोरियांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत सुद्धा होऊ शकते
अमेरिकेने चीनवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे कारण तालिबानने युद्धग्रस्त देश ताब्यात घेतल्यानंतर चीन अफगाणिस्तानमधील बाग्राम हवाई दल तळावर कब्जा करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि भारताला विरोध करण्यासाठी पाकिस्तानचा वापर आणि त्यासाठी पाकिस्तानला शस्त्रास्त्रेही तो पुरवू शकतो , असा इशारा एका माजी वरिष्ठ अमेरिकन मुत्सद्दी निकी हेली यांनी आपल्याला दिला आहे.
समर्पण संस्था, आयोजित १ला आशियाई चित्रपट महोत्सव १७ फेब्रुवारीपासून जळगावात सुरु होत आहे. पर्यटन वा सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या सहयोगाने अजिंठा फिल्म सोसायटी यांच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातील चित्रपटांचे स्क्रिनिंग नियोजन भवन सभागृहात करण्यात आले आहे.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या खासगी निवासस्थानी भोजन करणारे जगातील पहिले नेते.
शहरातील प्रस्तावित बुलेट ट्रेनचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जापनीज शिष्टमंडळास दिली.