बॅरिस्टर नाथ पै विमानतळ राज्य मंत्रीमंडळ बैठकीत सिंधुदुर्ग विमानतळाला बॅ.नाथ पै यांचं नाव देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या विमानतळाच्या निर्मितीपासून कायमच विमानतळाच्या नावाचा मुद्दा चर्चेत होता. आता राज्य सरकारने बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Read More
चिपी विमानतळ उद्घाटनाला २४ तास उलटून झाले नाहीत तोवर शिवसेनेला कोकणात भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी दणका दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा झाल्यानंतर लगेचच शिवसेनेला हा मोठा दणका मानला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री आदिती तटकरे, आमदार सुनील प्रभू, नितेश राणे व इतर मंत्री उपस्थित होते. तर, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी ला
'माझा महाराष्ट्राशी फक्त राजकीय संबंध नाही तर पारंपरिक आणि रक्ताचा संबंध आहे. माझं सिंधुदुर्गासोबतही संबंध आहे. सिंधुदुर्गाचा विशाल इतिहास आणि छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास मोठा आहे. हा जिल्हा शौर्याचे प्रतिक आहे. मी ५०० वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं स्मरण करतो. पण छत्रपतींचा हिंदवी स्वराज्याचा विचार होता. एकीकडे पेशवे तर दुसरीकडे त्यांचे तीन प्रमुख सेनापती होते, असे उद्गार केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी चिपी विमानतळ उद्घाटन प्रसंगी काढले.
अलायन्स एअर या विमान कंपनीने मुंबई ते सिंधूदूर्ग विमान प्रवासाचे वेळापत्रक व तिकीटदर घोषित केले
कोकणातील एकमेव बहुचर्चित चिपी विमानतळाचा गणेशोत्सवाचा मुहूर्तही हुकला आहे. आता नवरात्रोत्सवाचा नवा मुहूर्त खासदार विनायक राऊत यांनी दिली जाहीर केला आहे. "सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ विमान वाहतुकीला पूर्णपणे सज्ज आहे. परवा मी दिल्लीला होतो. हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, एव्हिएशन सेक्रेटरी, डिजिसीएचे चेअरमन आणि हवाई वाहतूक करणारी अलायन्स कंपनीचे या सर्वांशी संपर्क साधला असता येत्या ७ ऑक्टोबरला चिपी विमातळावरून विमान वाहतुकीस सज्ज आहे." अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाप्पासह १२ आसनी विमानाचं आगमन झालं आणि कोकणवासीयांची परशुरामभूमीवर विमानदर्शनाची प्रतीक्षा एकदाची संपली.