प्रख्यात दिग्दर्शिका सुधाताई करमरकर, प्रयोगशील दिग्दर्शक चेतन दातार आणि प्रतिभावंत दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्या तालमीत अभिनयाचे धडे गिरवून, नंतर व्यावसायिकला प्रकाश बुद्धिसागर, दिलीप कोल्हटकर, गणेश यादव, संतोष पवार, आणि चंद्रकांत कुलकर्णी अश्या मातब्बर दिग्दर्शकांसोबत थिएटर करत रंगभूमीवर पाय रोवून भक्कमपणे आपलं अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी असलेली लोकप्रिय अभिनेत्री मैथ्थिली जावकर आज अभिनय, नृत्य, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी पंचरंगी लीलया पेलत लवकरच रसिकांना नव्या साजात दिसणार आहे. तिच्या आयुष्याला
Read More
आशियाई देशांमध्ये पुन्हा एकदा चित्ता या जंगली प्राण्याचे अस्तित्व वाढवण्यासाठीच्या सामंजस्य करारावर दक्षिण आफ्रिका आणि भारताने आज स्वाक्षर्या केल्या. या करारानुसार फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांचा पहिला कळप भारतात आणला जाणार आहे. 2022 मध्ये नामिबियातून भारतात दाखल झालेल्या आठ चित्त्यांसोबत या चित्त्यांचे वास्तव्य असणार आहे. फेब्रुवारीमध्ये 12 चित्ते भारतात आणल्यानंतर, त्यापुढे पुढची आठ ते दहा वर्षे दरवर्षी आणखी 12 चित्ते भारतात आणण्याचा सरकारचा विचार आहे.
भारतातील भौगोलिक क्षेत्राचा सुमारे 24 टक्के गवताळ प्रदेशांनी व्यापलेला आहे. या प्रदेशात लवकरच एका पाहुण्याचे आगमन होणार आहे. देशातून नामशेष होऊन सात दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर भारताच्या जंगलात पुन्हा चित्ता दिसणार आहे. ‘आशियाई चित्ता’ भारतातून 1952मध्ये नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. आता तब्बल 70 वर्षांनी भारतात ‘आफ्रिकन चित्ता’ (आशियाई) आणण्याची योजना करण्यात आली आहे. गवताळ प्रदेशातल्या या प्राण्याविषयी जाणून घेऊया...
मध्यप्रदेशच्या पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यानात येऊ घातलेल्या चित्त्यांची पहिली आरोग्य चाचणी करण्यात आली आहे. भारतात येणाऱ्या संभाव्य उमेदवारांची आरोग्य चाचणी करण्यात आली. 'चिता कन्झर्वेशन फंड'च्या तज्ज्ञांकडून ही तपासणी करण्यात आली. नामिबियातील विंडहोक येथे भारताचे उच्चायुक्त प्रशांत अग्रवाल यांच्या उपस्थितीत सोमवारी दि. १५ ऑगस्ट रोजी ही चाचणी करण्यात आली.
देशातून अशयाई चित्ते नामशेष होऊन सात दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर भारतच्या जंगलात आफ्रिकन चित्ते दि. १५ ऑगस्टच्या आधी येणार होते. मात्र, त्यांचे आगमन लांबणीवर पडले आहे. मध्यप्रदेशच्या प्रधान मुख्य वसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिलेल्या माहितीनुसार आफ्रिकन चित्ते भारतात येण्याची तारीख अजून केंद्रीय मंत्रालयाकडून आलेली नाही. तसेच चित्त्यांच्या संख्येबाबत देखील माहिती प्राप्त झालेली नाही.
देशातून नामशेष होऊन सात दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर भारतच्या जंगलात पुन्हा चित्ता दिसणार आहे. भारतात 'आफ्रिकन चित्ता' आणण्यासाठी या वर्षी जून महिन्यात भारत आणि नामिबिया यांनी सामंजस्य करार केला. त्या अनुषंगाने हे चित्ते भारताच्या ७५व्या स्वंतंत्र्य दिनानिमित्त दि. १५ ऑगस्टच्या आधी मध्यप्रदेशच्या पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात येणार आहेत.