अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या २२ जानेवारीला होत आहे. त्यानिमित्त भारतभर आनंदोत्सव सुरु आहे. त्याच उत्साहात राम मंदिर आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्त रामकथा केंद्रस्थानी ठेऊन अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यात मराठीतील वैशिष्ट्य पूर्ण आणि गाजलेल्या रचना म्हणजे गीत रामायण. ग दि माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेले हे गीतरामायण भारतभर पोहोचायला हवे अशी इच्छा गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी व्यक्त केली आहे.
Read More
राम म्हणजे कोण? तर, ‘रमयती सर्वान्.’ जो सर्वांना रमवतो, आनंद देतो तो राम. याच अर्थाला धरून राम शोधू म्हटलं तर जी गोष्ट वा जे काम आपल्याला परमोच्च समाधानाचा आनंद देतं ते काम म्हणजेच राम. अरे वा, खूप सहज कळला की राम आपल्याला असं मनाला वाटू लागतानाच मग ‘रामराज्य आणणं’ वा ‘रामासारखं राज्य’ करणं इतकं कठीण का जात असावं माणसाला, हा प्रश्न मनात येतो. याचं उत्तरही फार कठीण असं नसतंच. आपलं शरीर, शक्ती, मन, बुद्धी, विचार हे सगळं नीती आणि विवेकाने वापरणं कर्मकठीण आणि म्हणूनच राम मिळणं कठीण आणि रामराज्य दुरापास्त!
ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या कृपा प्रसादाने श्री कालिपीठ संस्थान नैमिषारण्यतर्फे गीतरामायण आणि श्रीराम कथा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. कालिपीठाधीश प. पू. गोपाळ शास्त्री, नैमिषारण्य यांच्या उपस्थितीत १ जुलै ते १० जुलै या कालावधीत अयोध्या काशी, नैमिषारण्य, प्रयागराजसह अयोध्या येथील जानकी महल येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र वाल्मिकी म्हणून गौरवण्यात आलेले प्रतिभावंत कवी ग. दि.माडगूळकर (गदिमा) विरचित गीतरामायण संगीतबद्ध करून ते आपल्या अमृतवाणीने, भावपूर्ण स्वर्गीय स्वरात गीतगायन करून बाबूजीं
गीतरामायण हे आपले अस्तित्वभान असून ते जपले जाण्याची गरज अविनाश धर्माधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली.
अण्णा आणि यशवंतराव यांच्यातील अतूट स्नेहबंध उभयतांची कर्तृत्वाची क्षेत्रे भिन्न असूनही कायम होते.