शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणी दरम्यान सलग तिसऱ्या दिवशी, गुरुवारी २३ नोव्हेंबरला ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांची उलट तपासणी घेण्यात आली. शिंदे गटाच्या वकिलांकडून प्रश्नांचा भडीमार सुरू झाल्यानंतर प्रभू काहीसे गांगरून गेल्याचे पहायला मिळाले.
Read More
मागील काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यामध्ये शिवसेना कोणाची यावरून वाद सुरु आहेत. यादरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. १४ फेब्रुवारीपासून घटनापिठापुढे नियमित सुनावणी सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानेही काही निरीक्षणं नोंदवली असून, हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे सोपवलं जाणार का? हा सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे. मंगळवारी ठाकरे गटाकडून कपिल सिब्ल यांनी युक्तिवाद केला आणि बुधवारी झालेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी युक्तीवाद केला होता. गुरुवारी सुद्धा युक्तिवाद झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीच्या दृष्टीने आजची ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने शिंदे गटाची बाजू ऐकून घेतली होती. आजच्या सुनावणी ठाकरे गट आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. यावेळी दोन्ही गटाचे नेते दिल्लीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हबाबत आज निर्णय होणार का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
धनुष्यबाणावर सुनावणीला सुरुवात झाली असताना, दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद वकीलांनी केला. सर्वप्रथम शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाकडे आमदार, खासदारांचे बहुमत असल्याचा युक्तीवाद केला. धनुष्यबाण चिन्हासाठी बहुमत असल्याचे ते यावेळी म्हणाले. तर, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाची सादर कागदपत्रे बोगस असल्याचा युक्तीवाद केला. यावेळी दोन्ही बाजूंनी १९७२ सालच्या सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग या प्रकरणाचा दाखला वारंवार दिला गेला.
धनुष्यबाणावर सुनावणीला सुरुवात झाली असताना, जोपर्यंत सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे, तोपर्यंत निवडणूक आयोगात सुनावणी नको, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. यावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी 'उद्धव ठाकरेंकडे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून असलेलं पद हे चूकीचं नाही, मात्र ज्याप्रकारे त्यांनी पक्षप्रमुख नात्याने पक्षाचे जे निर्णय घेतले ते चूकीचे आहे.', असा मोठा युक्तीवाद उपस्थित केला आहे.