दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक मुखपृष्ठासह ‘साप्ताहिक विवेक’ने सादर केलेला दिवाळी अंक हा दर्जेदारच म्हणावा लागेल. ख्यातनाम चित्रकार वासुदेव कामत यांच्या कुंचल्यातून साकारलेले देवी सरस्वतीचे मनमोहक आणि जिवंत भासणारे चित्र, हे सर्वस्वी लक्षवेधी. रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची संघशताब्दीनिमित्त घेतलेली विस्तृत मुलाखत आणि त्यांनी मांडलेली पंचसूत्री, ही सर्वस्वी समाजाला दिशादर्शक ठरावी. त्याचबरोबर रमेश पतंगे यांनी अतिशय सोप्या शब्दात, महाराष्ट्रातील संतपरंपरेची शिकवण समाजात रुजवण्यासाठी काय कराय
Read More