‘गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या वतीने यंदाच्या हिंदू नववर्ष शोभायात्रेतून मराठी भाषा 'स्व'त्वाच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचे प्रतीक यांचा जागर होणार असल्याची माहिती आहे. रविवार, ३० मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या या शोभायात्रेत पारंपरिक प्रात्यक्षिकांसह अनेक चित्ररथांचा सहभागही असणार आहे. Girangaon Shobha Yatra 2025
Read More
Hindi आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तामिळनाडूवर ढोंगीपणाचा आरोप करण्यात आला आहे. ते म्हटले की, त्यांचे नेते आर्थिक फायद्यासाठी त्यांचे तमिळ चित्रपट आतापर्यंत हिंदी भाषेत डब करत होते. पक्षाच्या स्थापना दिनी बोलताना जनसेवा प्रमुख म्हणाले की, देशाच्या अखंडतेसाठी भारताला तमिळसह अनेक भाषांची आवश्यकता आहे.
सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाषेचा मुद्दा राजकारणात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण, ‘दक्षिण विरुद्ध उत्तर’ वगैरे तणाव हे भारतविरोधी ‘सोरोस टूलकिट’चा भाग आहेत, हे आता जनतेला कळून चुकले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन सन्मान दिन म्हणून साजरा केला जाईल तसेच ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दि. १० मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा २०२५-२६ सालचा अर्थसंकल्प सादर करताना ते बोलत होते.
Amit Shah तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात फतवा काढला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हिंदी भाषेमुळे तमिळ भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: एमके स्टॅलिन यांना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हे तमिळ भाषेत सुरू करावे. ७ मार्च २०२५ रोजी रानीपेट जिल्ह्यातील थाकोलममधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६ व्या स्थापन दिनाच्या समारंभात अमित शाह यांनी संबोधित केलं.
मराठी भाषेवर प्रेम करीत तिला सौंदर्य बहाल करणार्या आणि संदर्भसूचीच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटविणार्या तपस्विनी शिल्पा सबनीस यांच्याविषयी...
अमेरिका हा स्थलांतरितांचा देश असून, गेली अडीचशे वर्षे या देशात कोणत्याही एका भाषेला अधिकृत दर्जा देण्यात आला नव्हता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, आता इंग्रजीला अधिकृत भाषा घोषित करण्यात आले आहे. या निर्णयाने राष्ट्रीय एकात्मता वाढेल, असे काहींचे मत असले तरी, भाषिक अल्पसंख्याकांसाठी हा मोठा धक्का ठरण्याची शक्यताही आहे.
ज्यांच्या काव्यप्रतिभेने मराठी साहित्य उजळून निघाले असे विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज यांची जन्मभूमी असणारे शिरवाडे वणी हे गाव ' कवितांचे गाव ' म्हणून घोषित करण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव 'कवितांचे गाव' म्हणून घोषित करण्यात आले. भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी शालेय शिक्
Hindi या देशात हिंदू संस्कृतीवर आघात करण्याची एक वेग़ळीच परंपरा आहे. आक्रांतांनी सुरु केलेल्या या परंपरांचे प्रामाणिक पाईक आजही भारतात आहेत. मात्र, आता विरोध थेट न करता, तो विविध रंगाढंगात केला जातो. विविध रुपांच्या माध्यमातून या पाईकांचा विरोध पुढे येतो. प्रादेशिक अस्मिता हे त्यापैकीचे एक कारण. भारतासारख्य विविधता असलेल्या देशात प्रादेशिक अस्मिता नक्कीच चूक नाही, मात्र त्याचा वापर स्वार्थासाठी व्हावा हे दुर्दैव. नेमके हेच स्टॅलिन यांना न उमगल्याने, त्यांनी हिंदी भाषेला विरोध आणि त्याच्या आडून संस्कृत भाषा आ
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपल्या मायमराठीच्या समृद्धीसाठी महायुतीचे सरकार सदैव तत्पर राहील " असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिम्मित आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपल्या मायमराठीच्या समृद्धीसाठी महायुतीचे सरकार सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्यादेखील उंचावते आहे. आर्थिक परिस्थिती नसताना पालक आपल्या पाल्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. यामागील कारणांचा शोध घेतला असता, भाषेत उदरनिर्वाहाची असणारी क्षमता, भाषेमुळे मिळणारी प्रतिष्ठा या गोष्टी कारणीभूत आहेत. नोकरी मिळण्याची क्षमता एखाद्या भाषेच्या अंगी कशी येते, याचा शोध घेऊन मराठीला त्यादिशेने पावले टाकण्याची गरज आहे.
स्वातंत्र्यानंतर मराठी ही शासकीय भाषा म्हणून स्वीकारली गेली असली, तरी तिचा प्रभावी वापर संपूर्णपणे रूढ झालेला नाही. इंग्रजी शब्दप्रयोग अजूनही सरकारी लिखाणात आणि संभाषणात सहजगत्या घुसखोरी करताना दिसतात. उदाहरणार्थ, मीटिंग, डिपार्टमेंट, ऑफिस, अटेन्डन्स, सर्क्युलर असे शब्द सहज वापरले जातात, जे बैठक, विभाग, कार्यालय, हजेरी, परिपत्रक असे सहजपणे मराठीत बदलता येऊ शकतात.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची बातमी आली आणि समस्त मराठी जनता सुखावून गेली. तरुणांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनीच ही गोष्ट साजरी केली. मात्र, अभिजात दर्जा मिळल्यानंतर नेमकी कोणती गोष्ट घडणार आहे, याचा विचार फार कमी तरुणांनी केला असेल, असे आपल्या आसपासचे वातावरण पाहिल्यावर लक्षात येते.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आपल्या सर्वांनाच अतिशय आनंद झाला. परंतु, मराठी भाषेच्या श्रेष्ठत्वासाठी काम करताना सर्व क्षेत्रांत ती उपयोगांत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. भारतीय राज्यघटनेनुसार, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळणे हा एक मूलभूत हक्क आहे. परंतु, न्यायालयीन प्रक्रिया ही बहुतेक वेळा इंग्रजी भाषेत चालत असल्याने, अनेक मराठी भाषकांना न्याय मिळवताना अडचणी येतात आणि भाषा म्हणून मराठी केवळ टिकवण्यासाठीच नाही, तर तिला समृद्ध करण्याच्या दृष्टीनेही विचार व्हायला हवा. याच पार्श्वभूमीवर, न्यायव्यवस्
अलीकडच्या काळात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा ही सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. एक प्रकाशक म्हणून माझ्यासाठीसुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठीमध्ये सकस साहित्यनिर्मिती होते. हे साहित्य वाचणारा चांगला वाचकवर्ग मराठीच्या नशिबी आहे. येणार्या काळात आपल्या अभिजात मराठीचा वाचकवर्ग वाढेल, यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
Marathi Bhasha Gaurav Din मराठी विषयात एम.ए. करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवहेलना केल्याची धक्कादायक बाब उघड झाली. पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच एम.ए मराठी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी थेट पालिका मुख्यालयात जाऊन याबाबत पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. तर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी थेट पालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र देऊन हे परिपत्रक त
संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला नगराची उपमा दिलेली आहे. ‘अभिजात भाषा’ म्हणून गौरवण्यात आलेल्या आपल्या मराठी भाषेला समजून घेताना, या नगराच्या अंतरंगाशी एकरूप होणेदेखील तितकेच गरजेचे. भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. काळाच्या पटलावर मराठी भाषासुद्धा अशाच वेगवेगळ्या प्रवाहांमुळे समृद्ध होत गेली. अशा या आपल्या लाडक्या मराठी भाषेला दीड हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगांपासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. इ. स. ५०
मागील वर्षीच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्या पार्श्वभूमीवर दि. २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करताना ‘एआय’च्या युगात मराठी यावर विचार करणे विशेष आवश्यक ठरते.
आपलीही मुलं महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. तिथेही हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषेचे ज्ञान दिले जाते. याला आता अन्नामलाईंनी द्रमुकचे ढोंग आहे का? प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनावले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० वरून तामिळनाडूत मोठा वादंग निर्माण झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन यांनी या धोरणाविरूद्ध आवाज उठवला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे धोरण तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
(Sunil Tatkare) मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दि. २६ फेब्रुवारी रोजी 'मराठी पाऊल पडते पुढे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
Narendra Modi राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा. स्व. संघ) आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहेत. संघामुळेच मराठी आणि महाराष्ट्राशी माझा ऋणानुबंध निर्माण झाला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी विज्ञान भवनातील शानदार कार्यक्रमात केले.
Ramayana सुदूर पूर्वोत्तर भारतातील आसाममधील राजकवी माधव कंदलीचे रामायण, ‘असामिया’ साहित्यातील पहिले रामायण महाकाव्य आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या आधी 14व्या शतकात, हा राजकवी होऊन गेला. त्याचे रामायणातील फक्त पाच कांड उपलब्ध आहेत. पुढील काळात, थोर संत शंकरदेव यांनी उरलेली आदिकांड, उत्तरकांड लिहून माधव कंदलांचे रामायण पूर्ण केले आहे.
बोली भाषा हा भारताचा आत्मा आहे. भारतीय संस्कृती ही भाषिक संस्कृती असून तिचे संवर्धन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भाषाशास्त्रज्ञ गणेश देवी यांनी केले. मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठी! येत्या २५ वर्षांत मराठीला ज्ञान आणि रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी ‘मराठी भाषा धोरणा’त व्यवहारक्षेत्र निहाय शिफारसी अंतर्भूत करण्यात येत आहेत. केवळ शिक्षणाचेच नव्हे, तर सर्व लोकव्यवहारांचे मराठीकरण होण्याकरिता महाराष्ट्रातील केंद्रीय कार्यालयांमध्येही आता ‘मराठी’ अनिवार्य केली जाणार आहे. तशी शिफारस भाषा धोरणात करण्यात आली आहे.
मराठी भाषा विभागातर्फे ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विश्व मराठी संमेलनाच्या कायक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली. मंगळवारी विश्व मराठी संमेलनाच्या सोशल मीडियावरील पेजवर कार्यक्रमपत्रिका प्रसिध्द करण्यात आली.
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाला’ आजपासून सुरुवात झालेली आहे. २८ जानेवारी २०२५ पर्यंत तो साजरा केला जाणार आहे.
उद्या, दि. १२ जानेवारी. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपला देश हा तर जगातील सर्वाधिक युवा संख्या असलेला देश. युवा ही देशाची खरी संपत्ती मानली जाते. वर्तमान सुधारण्याची आणि भविष्य घडवण्याची ताकद या युवांमध्ये असते. आपल्या देशातील युवांनी ( Young Marathi Generation ) प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेलेच आहे. आज साहित्य क्षेत्रही याला अपवाद नाही. आपली अभिजात आणि समृद्ध असलेली मराठी भाषा टिकवून ठेवण्याचे आणि पुढे नेण्याचे काम अनेक युवा साहित्यिक क
मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवार, ८ जानेवारी रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली. त्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला.
Marathi language ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबतची अधिसूचना आज दि : ८ जानेवारी २०२५ रोजी जारी केली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.
नवी दिल्ली : साहित्य अकादमीच्यावतीने देण्यात येणार्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ ( Sudhir Rasal ) यांना ’विंदांचे गद्यरुप’ पुस्तकासाठी यंदा हा जाहीर झाला आहे. आतापर्यंतचा हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याची भावना रसाळ यांनी व्यक्त केली.
मुंबई : “मराठी ( Marathi ) भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे. त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे. मराठी भाषेचा अवमान कदापी सहन करणार नाही,” अशी प्रतिक्रिया मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी दिली.
चक्क कर्नाटकचे शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनाच कन्नड भाषा बोलता येत नसल्याची एका विद्यार्थ्याने ऑनलाईन कार्यक्रमात टिप्पणी केली आणि मग काय, बंगारप्पांचा अंगार शिक्षण खात्यातील अधिकार्यांना झेलावा लागला.
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी आपली सभा पार पडल्यानंतर ‘राष्ट्र भाषा समिती, पुणे’चे अध्यक्ष जयराम फगरे (वय ९४) यांच्या हस्ते सन्मानपत्र स्वीकारले. फगरे यांनी चांदीचे सन्मानचिन्ह कधीचे मोदींना देण्यासाठी तयार करून ठेवले होते. पंतप्रधान हिंदी भाषेचे दूत आहेत, म्हणून त्यांचा सत्कार करायचा होता. पण ते देण्याचा योग मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या दौर्यात आला. ‘एकता’ मासिकाच्या संपादिका रूपाली भुसारी यांनी सप्टेंबरच्या अंकात फगरे यां
संस्कृत भाषा प्रचारिणी सभा, नागपूर आणि बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘संस्कृत बालनाट्य लेखन स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत स्वलिखित किंवा अनुवादित संस्कृत कथा पाठविता येणार आहेत.
नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यानिमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, मराठी विचारधारा प्रतिष्ठान, गोरेगाव आणि अमेरिकेतील मराठी कल्चर अँड फेस्टिवल्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘
अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांच्या पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष आणि भाषाभ्यासक पद्मश्री चमू कृष्ण शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मराठी बरोबरच बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत या भाषेच्या अभ्यासकांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. पाच राज्याचे मिळून एकूण २५ प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते.
पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. नुकतेच त्यांनी हे युग युद्धाचे नाही तर बुद्धाचे आहे, असे पुन्हा एकदा भाषणात अधोरेखितही केले. गौतम बुद्ध यांचे विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी वारंवार मांडले आहेत. म्हणूनच, उपेक्षित घटकांना, भाषांना न्याय देणारे हे मोदी सरकार आहे, असे म्हणता येते.
पाली भाषा ही ‘ग्रंथभाषा’ म्हणून मर्यादित राहिली आहे. दि.३ ऑक्टोबर रोजी पाली भाषेला ग्रंथ भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यानिमित्ताने पाली भाषेचा इथवरचा प्रवास आणि तिला होणारे फायदा या विषयावर सिद्धार्थ महाविद्यालयातील प्राध्यापक विजय मोहिते यांच्याशी साधलेला हा संवाद.
3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. २०१२ पासून यासाठी प्रयत्न सुरू होते पण एका कारणामुळे मराठी भाषेला तो दर्जा मिळत नव्हता. काय आहे ते कारण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये..
नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याची घोषणा करण्यात आली. आहे. त्यानिमित्ताने फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठी भाषेचे प्राध्यापक आणि ‘मराठी अभ्यास परिषदपत्रिका भाषा आणि जीवन’चे संपादक प्रा. आनंद काटीकर यांच्याशी मराठी भाषा, अभिजात दर्जा आणि शिक्षण क्षेत्र या विषयांवर साधलेला हा संवाद..
3 ऑक्टोबर रोजी 'पाली भाषेला' अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याच विषयावर मुंबई विद्यापीठातील पाली भाषेचे प्राध्यापक लक्ष्मण सोनावणे यांची घेतलेली ही मुलाखत. | Pali Language | Classical Language
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पण कसा होता हा प्रवास?
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अतिशय आनंद झाला. माझी मराठी अमृताशी पैजा जिंके अशीच आहे. आणि याच आनंदाप्रित्यर्थ माय मराठीला ही शब्दांजली!
३ ऑक्टोबर हा दिवस 'मराठी अभिजात भाषा दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने गुरुवारी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज (शुक्रवार) राज्य सरकारने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभल्यामुळे आता मराठी ही भारताचा अभिमान होईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केली आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहराध्यक्ष वाघुले यांनी आभार मानले आहेत.
केवळ अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीला उर्जितावस्था येणार नाही. त्यासाठी मराठी माणसाने या भाषेला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनविला पाहिजे. महाराष्ट्रात, अगदी मुंबईतही समोरची व्यक्ती रिक्षावाला आहे, टॅक्सीवाला आहे की इस्त्रीवाला, हे न पाहता त्याच्याशी जेव्हा फक्त मराठीतूनच संवाद साधला जाईल, तेव्हाच मराठी ही सामान्यजनांची भाषा होईल. सरकारने आपले कर्तव्य पार पाडले असून आता तरी मराठी माणूस सर्वार्थाने मराठीत बोलेल का?
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि मराठी मने आनंदाने न्हाऊन निघाली. मराठीचे माहेरघर असलेल्या पुण्यात साहित्यपंढरी असलेल्या या पुण्यनगरीत हा उत्सव अतिशय दिमाखात साजरा होत आहे. जाहीररित्या तो साजरा होत असताना तो मनामनांत साजरा होत आहे, ते शब्दातीत.
सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी झटणारे हरेशआनंद आमडेकर यांच्याविषयी...
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्सच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिनाच्या’ निमित्ताने मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या जगभरातील तमाम मराठी माणसांसाठी लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.