बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उत्तराखंड येथील बाबा केदारनाथचे दरवाजे पारंपारिक हिंदू परंपरेनुसार शुक्रवार, दि. २ मे रोजी भाविकांसाठी उघडण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. संपूर्ण परिसर हर हर महादेव आणि जय बाबा केदारनाथच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. कर्नाटकातील वीरशैव लिंगायत समुदायाचे प्रमुख रावल भीमाशंकर हे मंदिरात पोहोचणारे पहिले होते. गढवाल रायफल्सच्या बँडने धार्मिक संगीत वादनाने कार्यक्रमाची शोभा आणखी वाढल्याचे दिसून आले. Kedarnath Door Open Ceremony
Read More
उत्तराखंड सरकारच्या आदेशानुसार आता केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री धामच्या (Chardham Yatra) २०० मीटरच्या परिघात मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुख्य सचिव राधा रातुरी यांनी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करत नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील प्रसिद्ध बद्रीनाथ (Badrinath) मंदिराचे दरवाजे रविवार, दि.१२ मे रोजी सकाळी ६ वाजता उघडले, ज्यामुळे भाविकांना पारंपरिक पद्धतीनुसार दर्शन घेता आले. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मंदिर झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते.
अकरावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड येथील केदारनाथ धामचे (Kedarnath Dham) दरवाजे शुक्रवार, दि. १० मे रोजी पहाटे उघडण्यात आले. बाबा केदारनाथच्या जयघोषात आणि लष्कराच्या ग्रेनेडियर रेजिमेंटच्या बँडच्या भक्तिमय सूरांमध्ये विधीवत पद्धतीने दरवाजे उघडण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.
चार धामांपैकी एक असलेल्या बाबा केदारनाथ (Baba Kedarnath) यांच्या पंचमुखी मूर्तीची देव डोली श्री ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथून गुप्तकाशीच्या पहिल्या मुक्कामाकडे सोमवार, दि. ०६ मे रोजी निघाली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उखीमठच्या स्वयंसेवकांनी पुष्पवृष्टी व अल्पोपहाराचे वाटप करून यात्रेचे स्वागत केले. यावेळी देव डोली ही फुलांनी सजवण्यात आली होती. श्री ओंकारेश्वर मंदिरात रविवारी सायंकाळी उशिरा श्री भैरवनाथजींची पूजा संपन्न झाली.
काँग्रेस नेते राहूल गांधी ५ नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे पोहोचले आहेत. दरम्यान, तेथील लोकांनी मोदी-मोदी अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आदी शंकराचार्यांचे जन्मस्थळ असलेल्या कलाडी येथे पंतप्रधानांच्या हस्ते वेदपाठशाळेचे उद्घाटन होणार आहे. ९० वर्षांहून अधिक जुन्या या वास्तूचा जीर्णोद्धार होणार आहे
चित्रपट अभिनेता अक्षय कुमार सध्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये आहे. त्यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची डेहराडून येथील निवासस्थानी भेट घेतली. यादरम्यान अभिनेता उत्तराखंडची हिल कॅप परिधान करताना दिसला. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतसोबत साराने 'केदारनाथ' या चित्रपटातून पदार्पण केले होते
सुशांतच्या मित्राचा सारा-सुशांतच्या नात्याबद्दल गौप्यस्फोट!
प्रचाराची धामधूम आणि मतदान संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील केदारनाथला भेट दिली होती.
लोकसभा निवडणुकीतील सहा टप्प्यांचे मतदान आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उत्तराखंडच्या केदारनाथ येथील ज्या गुहेत रात्रभर ध्यानसाधना केली होती, त्या गुहेला नागरिकांकडून प्रचंड मागणी होत आहे.
सोबतच या सगळ्यालाच एका भयगंडाची किनारदेखील आहे. देशात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विचारांचे सरकार सत्तेवर येण्याची व आपली सद्दी संपल्याची जाणीव या लोकांना होत असल्यानेच हे सगळे घाबरलेले लोक मोदींविरोधात नाही नाही ते उद्योग करत आहेत. म्हणजेच मुद्दा केवळ नरेंद्र मोदींच्या मंदिर दर्शनाचा नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वाला लागलेल्या सुरुंगाचा आहे.
केदारनाथला पोहचल्यानंतर मोदींनी बाबा केदार मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन ध्यान धारणा केली. यावेळी पुजाऱ्याने त्यांना रुद्राक्षची माळ घालत व कपाळी चनदांचा टिळा लावत मंदिराच्या वतीने स्वागत केले.