Kirit Somaiya भाजपने माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना राज्य सरकारने वक्फनंतर आता मशिदींवरील भोंग्यावरून लक्ष्य केले आहे. याआधी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंग्यावर भाष्य केले होते. ठरवून दिलेल्या नियमालीचे पालन करावे असा दावा फडणवीसांनी केला होता. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत भोंगे लावता येणार आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील भोंग्यांवर बंदी आणली आहे. अशातच आता राज्यातील मशिदींवर सुरू राहणाऱ्या भोंग्यांविरोधात राज्य सराकार पाऊल उचलत आहेत. क
Read More
अधिकार नसताना नायब तहसिलदारांकडून वाटप करण्यात आलेले तब्बल ४० हजार जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवार, १७ मार्च रोजी महसूल विभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील आदेश दिलेत.
सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली.
सुषमा स्वराज या अभ्यासू, व्यासंगी आणि प्रभावी नेत्या होत्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी केले.
मालेगाव येथे बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय असल्याचा दाखला दिल्याचा प्रकार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणला होता. दरम्यान, यासंदर्भात आता ४ हजार अर्जदारांची चौकशी सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे.
बाांग्लादेशी आणि रोहिंग्यांना देण्यात आलेल्या जन्म दाखला घोटाळ्याचे प्रकरण आता अकोल्यापर्यंत पोहोचले आहे. अकोला जिल्ह्यात १५ हजार ८४५ बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंबई : सैफ अली खानवर ( Saif Ali Khan ) हल्ला केलेल्या आरोपीला दि. १८ जानेवारीच्या मध्यरात्री पोलिसांनी ठाणे येथून ताब्यात घेतले. यावर माजी खासदार, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांचे आभार मानले. आरोपी हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे निदर्शनास आले असून यावर पोलिस अधिक चौकशी करणार आहेत.
Vote jihad भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव व्होट जिहाद फंडिंग घोटाळा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव शाखेत सिराज मोहम्मदची ५ बेनामी खाती सापडली. यामध्ये ५३ कोटी बेनामी व्यवहार केल्याप्रकरणाची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस आणि एटीएसला महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकावरही कारवाई करण्याची विनंती केली होती, असे किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा प्रकार उघडकीस आणला आहे.
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.
मुंबई : घाटकोपरमधील भीमनगर परिसरात ‘लव्ह जिहाद’चा ( Love Jihad ) प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजपचे नेते माजी खा. किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलिसांकडे आरोपीसह त्यांच्या परिवारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’चा प्रवक्ता असलेल्या सज्जाद नोमानी ( Sajjad Nomani ) याचे ‘व्होट जिहाद’चे वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नोमानीने परभणी येथील पत्रकारपरिषदेत केलेल्या वादग्रस्त जिहादी मानसिकतेच्या वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगाने त्याची तात्काळ दखल घेत, २४ तासांत या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश परभणी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
मुंबई : मालेगावमधील १२ तरुणांच्या नावाने बनावट बँक खाते उघडून त्यातून कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच, हा पैसा ‘उलेमा बोर्ड’ आणि ‘मराठी मुस्लीम सेवा संघा’च्या खात्यात गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Vote Jihad) शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत.
मेधा किरीट सोमय्या यांच्याशी संबंधित प्रकरणात संजय राऊतांना १५ दिवसांचा तुरुंगवास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना न्यायालयाने १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ते दोषी आढळले आहेत. माझगाव कोर्टाने हा निर्णय दिला.
वोट जिहादसाठी गणरायाचा आणि हिंदुत्वाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावरून संजय राऊतांनी टीका केली होती. यावर आता सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले.
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. जोगेश्वरी येथील भुखंड घोटाळ्याप्रकरणी ही धाड पडली आहे. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि इतर चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. याशिवाय रवींद्र वायकर यांच्या भागीदारांच्या घरावरही धाड पडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांवर मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप केला होता. आता त्यांच्या घरी ईडीची धाड पडली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, किरीट सोमय्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या तर्फे नमो रमो नवरात्र उत्सव आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रासरंग नवरात्र उत्सवात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी हजेरी लावत गरब्याच्या तालावर फेर धरला. डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात नमो रमो नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईतील आठ ठिकाणी ही छापेमारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्बो कोविड केंद्राच्या खिचडी पुरवठादारांशी संबंधित ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे.
उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पक्षादेश आल्यास आपण तुरुंगवारीही करायला तयार आहोत, तसेच निवडणूक लढविण्यासंदर्भात पक्षनेतृत्वही इच्छुक आहे, अशी पुडी राऊतांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत सोडली. मात्र, ज्या मतादार ईशान्य मुंबईतील मतदार संघावर संजय राऊत दावा करत आहेत तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा प्रचंड दांडगा जनसंपर्क आणि भाजपची बूथरचना यांचा विचार करता हा किल्ला अभ्येद्य आहे. 5,14,599 इतक्या मतांसह विजय मिळवला. संजय दिना पाटलांना २
पुणे : कोरोना महामारीच्या काळात बनावट कागदपत्रे, बनावट भागीदारी दस्त तयार करून जम्बो कोविड सेंटरचे कोट्यवधींचे कंत्राट मिळविणार्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीच्या चार संचालकांपैकी राजू नंदकुमार साळुंखे यांना अटक करण्यात आली आहे. साळुंखे हे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांचे पार्टनर आहेत. पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट केले आहे.
संजय राऊतांच्या सहकारी सुजीत पाटकर यांच्यामुळे झालेल्या या नुकसानीची भरपाई कशी करणार, गुन्हा दाखल होणार का?, असा सवाल Kirit Sommaiya यांनी विचारला आहे. याच काळ्या यादीतील कंपनीला पुन्हा उद्धव ठाकरेंचे सुपूत्र, तत्कालीन कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात कोविड जम्बो सेंटरसाठी अतिदक्षता विभागाचा परवाना दिला कसा, याची चौकशी व्हावी. मुख्यमंत्री कार्यालयातील तत्कालीन अधिकारी आणि या संदर्भातील जबाबदारांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी सोमय्या यांनी केला आहे.
बेकायदा स्टुडिओ प्रकरणाचा आरोप असलेले काँग्रेसचे माजी मंत्री असलम शेख यांच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ट लागणार आहे. स्टुडीओ घोटाळा प्रकरणात मुंबई महापालिकेकडून ईडीने अहवाल मागितला आहे. असलम शेख यांचा मार्वेमध्ये हजार कोटींचा स्टुडीओ आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. अनिल परबांच्या कार्यालयावर हातोडा पडल्यानंतर पुढचा नंबर असलम शेख यांचा असेल, असा इशाराही सोमय्यांनी दिला होता.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील संघर्ष पेटल्याचे दिसत आहे. अनिल परब यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे. अनिल परब यांचे ज्या सोसायटीत घरं होतं त्या सोसायटीत अनिल परब आमदार झाल्यानंतर सोसायटीच्या मालकी जागेत जनसंपर्क कार्यालय करावे अशी इच्छा येथील रहिवाशांनी केली होती.
महाविकास आघाडीतील नेत्यांनंतर आता भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात उभारण्यात आलेल्या कोरोना केंद्रांत मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्याबाबतची तक्रार त्यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात दाखल केली होती. तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी कॅगद्वारे केली जाणार आहे. असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले होते.
कोरोना काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला असून याच प्रकरणी मुंबई महापालिकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला ईडी कडून नोटीस बजवण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्यांकडून करण्यात आला आहे. तब्बल १०० कोटींचा हा घोटाळा असून यामध्ये बेनामी कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 1 जानेवारी रोजी ट्विट करताना माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना सूचक इशारा दिला होता. यानंतर आता हसन मुश्रीफ यांच्यावर कागल आणि पुण्यातील निवासस्थान तसेच सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी ईडीने आज पहाटेपासून छापेमारी केली आहे. ईडी आणि प्र
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर भुमिका मांडली. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देण्यापूर्वी चिठ्ठी काढल्याचे दिसले. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या भुमिकेमागे कोणाची स्क्रिप्ट होती ? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल आहे. शिवडी कोर्टाने हे वॉरंट काढल आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात कोर्टाने ही सुनावणी घेतली. येत्या 24 जानेवारी रोजी या प्रकरणी कोर्टात पुढील सुनवाणी होणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बुधवार, दि. ४ जानेवारी रोजी ‘ईडी’कडून जप्त करण्यात आली आहे. दापोलीतील ’साई रिसॉर्ट प्रकरणी ’ईडी’कडून ही कारवाई झाली आहे. या कारवाईमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरेंच्या १९बंगल्यांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतल्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे आणि वायकर परिवार यांचा विरोधात, ग्रामपंचायतीची नोंद खोटी, फोर्जरी करणे बेकायदेशीर कृत्ये करणे. म्हणून भादंवि ’४१५’, ‘४२०’, ’४६७’, ‘४६८’, ’४७१’ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या भेटीसाठी गेले होते, पुण्याचे खासदार गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहे. शरद पवार हे गिरीश बापट यांच्या भेटीसाठी जात असतांना त्याच ठिकाणी काही मिनिटे आधी भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे देखील रुग्णालयात पोहचले होते. त्याच वेळी शरद पवार येणार असल्याचे कळताच किरीट सोमय्या हे थांबून राहिले होते.
'तो मी नव्हेच, असे म्हणणाऱ्या माजी मंत्री आणि उबाठा गट नेते अनिल परबांविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्यांनी दिली आहे. ते म्हणाले, "पहिली एफआयआर दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यांनी ग्रामपंचायतकडे खोटी कागदपत्रे दाखवून १५ हजार ८०० चौरस फुटांचा रिसॉर्ट स्वतःच्या नावे करुन घेतला. दुसरी एफआयआर म्हणजे सदानंद कदम यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांतील एफआयआरमध्ये आता अनिल परबांचे नाव पुन्हा नोंदविण्यात आलेले आहे. सदानंद कदम आणि अनिल परबांनी कोविड काळात र
ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांना दापोली पोलीस समन्स बजावणार असल्याची माहिती समोर आली आहे. साई रिसाॅर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यासह 3 जणांना समन्स बजावले जाणार आहे. दापोली पोलिसांनी शिवसेना नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारदार भाजप प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनाही बोलावले आहे. दापोलीतील अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबतही दापोली पोलीस सोमय्या यांचा जबाब नोंदवणार आहेत. त्यामुळे अनिल परब यांच्या
"मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं. गोरगरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या एसआरए योजनेत स्वतःला घर व ६ गाळे...", असं म्हणत मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकरांनी अनधिकृतरित्या वरळी गोमाता जनता एसआरएमध्ये सहा गाळे/सदनिका हस्तगत केल्याचे पुराव्यानिशी सांगितले. त्यावर प्रतिक्रिया देत गजानन काळे यांनी 'सदर प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे', असा इशाराही दिली आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू केल्यानंतर आता किरीट सोमय्यांनीही याबद्दल प्रतिक्रीया दिली आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने शंभर कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आणले आहे. खासदार संजय राऊत यांच्यावर सोमय्या यांनी हा आरोप केला होता. या प्रकरणी न्यायालयात गेल्यानंतर आजाद मैदान पोलिस ठाण्यात एफ.आय.आर. नोंदवण्यात आली आहे, याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई होईल. असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
'पीएफआय'वर बंदी; केंद्र सरकारच्या निर्णयाचे भाजप नेते किरीट सोमय्यांकडून स्वागत!
बांधकाम व्यावसायिक आणि अधिकारी यांच्या संगनमताने उभे राहिलेले भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेले ट्वीन टॉवर्स रविवारी दुपारी जमीनदोस्त करण्यात आले
आधी अनिल देशमुख, मग नवाब मलिक, आता संजय राऊत, यापुढचा नंबर कोणाचा असणार याबद्दल उत्सुकता असताना आता ते पुढचे नाव शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब असल्याची दाट शक्यता आहे
काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांच्या मढ येथे असलेल्या कथित स्टुडिओशी संबंधित एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समोर आणला होता. या घोटाळ्या प्रकरणी अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घोटाळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाकडून शनिवारी (दि. ६ ऑगस्ट) नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण विभागाने दिले आहेत.
शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावला आहे. ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. परंतु अनिल परब ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित न राहता खुशाल शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले. अनिल परब यांच्या वतीने त्यांचे वकील ईडी कार्यालयात उपस्थित राहिले.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर काही दिवसांपूर्वीच ईडीने कारवाई करत त्यांच्या विरोधातील काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. मुंबईसह पुणे आणि मुरुड येथेही ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीच्या पथकाने मुरुड ग्रामपंचायतीकडून साई रिसॉर्टची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. आता या संबंधात भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी अनिल परब यांनी ज्या विभास साठेंकडून जमीन विकत घेतली होती, त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर तीन दिवसांपूर्वीच ईडीने कारवाई करत काही कागदपत्रे ताब्यात घेतले होते. मुंबईसह पुणे आणि मुरुड येथेही ईडीने धाडी टाकल्या होत्या. यानंतर पुन्हा एकदा शुक्रवारी ईडीचे पथक दापोलीत दुसऱ्यांदा पोहोचले आहे. यावेळी ईडीने मुरुड ग्रामपंचायतीकडून साई रिसॉर्टची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानासह अन्य सात ठिकाणी ईडी धाडी पडल्या आहेत. ही कारवाई किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरुन झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, खुद्द सोमय्या यांनी या प्रकरणी महत्वाची माहिती दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोणा कोणाचे भागीदार ( पार्टनर) आहेत असा सवाल करून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, मुंबईत अतिरेकी कसाब कडून हल्ला झाला तेव्हा पोलिसांना जे निकृष्ट दर्जाचे बुलेट प्रुफ जॅकेट ज्या कंपनीने पुरविले होते, त्या कंपनीचे विमल अग्रवाल यांच्याशी ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर, यशवंत जाधव यांचे संबंध असल्याने या दोघांच्या व्यवसायात भागीदारी असणारे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीयांची भागीदारी देश विघातक शक्ती पर्यंत पोहचली असल्याचा खळबळजनक आरोप आज मंगळवारी येथे पत्रकार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊदशी काय संबंध आहेत, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी काय संबंध आहेत? असा सवाल न्यायालयाने केला आहे. त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही? दाऊदची धमकी आहे की शरद पवारांची? जेलमध्ये गेल्यानंतर नवाब मलिक यांना मंत्रीपदी कायम ठेवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पण डी गँगशी संबंध आहेत का?, असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी केली आहे.
“जितेंद्र नवलानीची चौकशी कोण करत आहे? जितेंद्र नवलानीवर ‘एसआयटी’ कुणाची आहे? जितेंद्र नवलानीवर ‘एफआयआर’ कुणाचा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचे उत्तर देणार का,” असे प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्यांनी बुधवारी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत.
किरीट सोमय्या आणि त्यांच्या परिवारावर १०० कोटींचा घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. परंतु किरीट सोमय्या आणि त्यांच्या परिवाराविरोधात कोणत्याही प्रकारचा पुरावा अद्याप समोर आलेला नाही. मात्र आता किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत त्यांच्या विरोधात शिवडी कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे.