पुणे : कोरोना महामारीच्या काळात बनावट कागदपत्रे, बनावट भागीदारी दस्त तयार करून जम्बो कोविड सेंटरचे कोट्यवधींचे कंत्राट मिळविणार्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीच्या चार संचालकांपैकी राजू नंदकुमार साळुंखे यांना अटक करण्यात आली आहे. साळुंखे हे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांचे पार्टनर आहेत. पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट केले आहे.
Read More
पुणे : राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे व्यवसायिक भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनीने कोणताही अनुभव नसताना पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळवले. हे सेंटर चालविले जात असताना नागरिकांच्या जीवाशी खेळ करून कोट्यवधींचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईप्रमाणेच पुढील सात दिवसात पाटकर यांच्या कंपनीवर तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत के
'उद्धव ठाकरे गटाच्या प्रत्येक नेत्यावर काही ना काही आरोप आहेत. कुणावर भ्रष्टाचार तर कुणावर गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तर घोटाळा कसा करावा आणि फसवणूक कशी कारवाई याची जणूकाही मक्तेदारीच घेतली आहे. अनिल परब यांनी साई रिसॉर्टबाबत केलेला व्यवहार आणि संजय राऊतांनी सुजित पाटकरांसोबत केलेला गैरहव्यवहार यातून ठाकरे गटाच्या नेत्यांची भ्रष्ट प्रतिमा जगासमोर आली आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या भ्रष्ट नेत्यांना आणि घोटाळेबाजांना तुम्ही पदे दिलीच कशी ?' असा सवक भाजपच
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची मालकी असलेल्या कंपनीच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची बातमी ताजी असतानाच, मुंबई महापालिकेसंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांना ‘ईडी’ने समन्स बजावल्याची माहिती समोर येत असून, ’ईडी’ने चहल यांना सोमवार, दि. 16 जानेवारी रोजी चौकशीसाठी ‘ईडी’ कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याचेही समजते. मुंबई महानग
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने शंभर कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आणले आहे. खासदार संजय राऊत यांच्यावर सोमय्या यांनी हा आरोप केला होता. या प्रकरणी न्यायालयात गेल्यानंतर आजाद मैदान पोलिस ठाण्यात एफ.आय.आर. नोंदवण्यात आली आहे, याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई होईल. असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.