वेरुळातील लेणी ही आश्चर्याचा एक नमुनाच समजली जातात. प्रत्येक लेणे हे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधलेले आहे. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहेच तसेच सूर्याच्या प्रकाशकिरणांना अनुसरुन काही मंदिरे कोरलेली आहेत. येथील दहाव्या क्रमांकाच्या लेण्यांवर दरवर्षी सूर्य उत्तरायणाला सुरुवात करताना किरणोत्सव पाहायला मिळतो. संध्याकाळच्या वेळेत दिसणारा हा किरणोत्सव काही ४ ते पाच दिवस दररोज पाहता येतो.
Read More