Kawad Yatra उत्तर प्रदेशातील बरेलीत गेल्या काही दिवसांआधी उत्तर प्रदेशातील बरेलीत हिंदू समुदयाच्या कावड यात्रेवर (Kawad Yatra) दगडफेक करण्यात आली होती. त्याचठिकाणी विरोध करणाऱ्या जिहाद्यांनी मिरवणूक काढून उन्माद केला आहे. ही घटना १५ सप्टेंबर दिवशी रात्री घडली होती. यावेळी अनेक हिंदूंनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कट्टरपंथींनी ही एक नवीन परंपरा असल्याचे म्हणत उन्माद केला. याप्रकरणी संबंधित पोलिसांनी लक्ष घालत तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला.
Read More
उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील मुस्लिमबहुल असलेल्या गावात कंवर यात्रेकरूंचा (Rastaroko during Kawad Yatra) मार्ग रोखण्यात आला. त्यांना शिवीगाळ आणि मारहाणही करण्यात आली. हा पूर्वनियोजित कट असल्याचे सांगत कंवर प्रवाशांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बिल्लू, शाहिद, माजिद, गुलबहार, तैमूर, फारुख, महरूफ, कामिल, शाकीर, शाहरुख आणि इतर काही जणांविरोधात पोलिसांनी नोंदवला असून तपास सुरू आहे. आरोपींना अटक न केल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्याचे दिसले.
श्रावण महिन्यात झारखंडच्या बाबा बैद्यनाथ धाम येथे देशभरातून लाखो भाविक भगवान शंकराकडे प्रार्थना करण्यासाठी येत असतात. शिव आशीर्वाद प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या कावड यात्रेलाही नुकतीच सुरुवात झाल्याने याठिकाणी भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. (Baba Baidyanath Dham)
स्वामी यशवीर महाराज यांनी गुरुवार, दि. १८ जुलै रोजी इस्लामिक कट्टरपंथी आणि तथाकथित 'सेक्युलर' विरोधात एका व्हिडिओद्वारे विधान जारी केले होते. अनेक दिवसांपासून अशा बातम्या येत आहेत, ज्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक हिंदू देवी-देवतांचे नाव घेऊन हॉटेल, दुकाने, ढाबे आणि फळांचे ठेले चालवत आहेत. याला यशवीर महाराज अनेक दिवसांपासून विरोध करत आहेत. (Yashveer Maharaj on Kattarpanthi)
आमदार संतोष बांगर यांच्यावर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने ते अडचणीत सापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कावड यात्रेत तलवार फिरवल्याने तसेच परवानगी न घेता डीजे लावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.