'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) 'जीपीएस टॅग' लावून चंद्रपूरातील 'ताडोबा व्याघ्र प्रकल्पा'त सोडलेल्या गिधाडाने कर्नाटक गाठले आहे (BNHS tagged vulture). १,२०० किलोमीटरचा प्रवास करुन हे गिधाड १० नोव्हेंबर रोजी कारवार शहारात पोहोचले (BNHS tagged vulture). नवदलाच्या तळाजवळ हे गिधाड पोहोचल्याने काही काळ खळबळ उडाली, मात्र सध्या हे गिधाड कारवार शहराच्या परिसरातच असून वन विभागाने त्यावर पाळत ठेवली आहे. (BNHS tagged vulture)
Read More
सांगलीतील जत तालुक्यावर कर्नाटकातील सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केल्यानंतर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने २०१२ साली ग्रामस्थांनी तसा ठराव केला होता. त्या ठरावाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य त्यांनी केले आहे. याला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
कोकणात जाणाऱ्यांसाठी दोन विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर २० डिसेंबरपासून मध्य रेल्वेतर्फे मुंबई-करमळी मुंबई-तेजस विशेष आणि मुंबई-मंगळुरू सुपरफास्ट विशेष या दोन आरक्षित गाड्या धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर २० डिसेंबर पासून मध्य रेल्वेकडून ०२११९/०२१२० मुंबई करमळी मुंबई- तेजस विशेष आणि ०११३३/०११३४ मुंबई- मंगळुरू सुपरफास्ट विशेष या दोन आरक्षित गाड्या धावणार आहेत.