दासबोधातील श्रवणभक्तीचे समर्थकृत वर्णन तसेच श्रवणासंबंधी काही शास्त्रीय माहिती आपण मागील लेखात पाहिली. माणसाने पुष्कळ ऐकले, वाचन केले, अभ्यासले आणि त्यातील सार आत्मसात केले की त्याला वाटू लागते, आपण हे दुसऱ्याला सांगितले पाहिजे. या वृत्तीतून श्रवणानंतर कीर्तन हे स्वाभाविकपणे येते. परमेश्वराची भक्ती करण्याचा हा चांगला मार्ग आहे. स्वामींनी म्हटले आहे की, ‘कलौ कीर्तन वरिष्ठ’ म्हणजे या कलियुगात कीर्तनभक्ती श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे ज्या सज्जनांच्या सभेत भगवंतासाठी गायन चालू असते, तेथे भगवंत उभा असतो असे विष्णूं
Read More
स्वआचारणामधून स्वाभिमान समाजमनात जागृत करणारे दत्तसंप्रदायामधील श्रेष्ठ संत विष्णुदास महाराज यांच्याविषयी सांगणारा हा लेख...