वजन कमी व्हावे, आपण बारीक दिसावे यासाठी केरळच्या कन्नूरमधील कुथुपरंबा येथील श्रीनंदा ही १८ वर्षांची तरुणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीने विशेष डाएट प्लॅन अवलंबत होती. तिच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, वजन वाढू नये यासाठी डाएट प्लॅननुसार ती जेवायचीदेखील नाही आणि खूप व्यायाम करायची. जेवण सोडल्यामुळे ती पुरती अशक्त झाली होती. त्यासाठी तिला थालास्सेरी येथील रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा नुकताच मृत्यू झाला. वजन कमी करण्याच्या नादात आणखीन एक तरुणी अशीच हकनाक मेली.
Read More
"सामुदायिक सहकार्याद्वारे समाजाची सर्वांगीण प्रगती साधणे, म्हणजेच समाजसेवेद्वारे गावांना स्वावलंबी बनवणे हेच भारताचे व्हिजन आहे." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. केरळच्या इलाक्कुझी (कन्नूर) येथे पजहस्सी राजा कल्चरल सेंटरचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान प्रत्येक गावाने सर्व क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावे, यावर सरकार्यवाहंनी विशेष भर दिला. Dattatray Hosbale Kannur Program
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन केले. याचसोबत केरळ हे ४ आतंरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील पहिले राज्य बनले.