मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी शनिवार, दि. ८ जून रोजी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राईव्ह) राबविण्यात आली. त्यात, एकाच दिवसात ८५ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज), २५ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ६५ मेट्रिक टन कच-याचे संकलन करण्यात आले. तर, ३१६ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले.
Read More
महाबळेश्वरमध्ये बेशिस्त पर्यटकांकडून उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे (gaur in mahabaleshwar). याठिकाणी उघड्यावर पडलेल्या प्लास्टिकचा कचरा रानगवा खात असल्याचे छायाचित्र पुण्यातील वन्यजीव छायाचित्रकाराने टिपले आहे (gaur in mahabaleshwar). त्यामुळे महाबळेश्वरमधील वन्यजीवांच्या अधिवासाला देखील प्लास्टिकचा विळखा बसल्याचे समोर आले आहे. gaur in mahabaleshwar
कल्याण डोंबिवलीतील घन कचरा विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांना वेतन वेळेत मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कडोंमपा प्रशासनाने लेखी आश्वासन देऊनही वेळेत वेतन मिळत नसल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद केले आहे. त्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील सुमारे १ हजाराच्या आसपास कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. या कंत्राटी कामगारांनी बुधवारी सामूहिक सुट्टी टाकली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कल्याण डोंबिवलीत कचरा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
मुंबईतील कचरा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर पूल ते सातिवली खिंड दरम्यान आणून टाकला जातो. ही बाब बेकायदेशीर आहे. त्यामुळे तातडीने हा प्रकार थांबविला पाहिजे, अशी मागणी भाजप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा कार्यकारिणी सदस्य केदारनाथ म्हात्रे यांनी पोलिस निरीक्षक, महामार्ग ट्राफिक पोलिस विभाग कोल्ही-चिंचोटी यांच्या कार्यालयात भाजपा शिष्टमंडळासह लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील १०० टक्के कचरा व्यवस्थापन हे आव्हान नसून संधी आहे. अनेक हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे पाहण्याची निकड आहे. हे ठसठशीतरित्या पटवून द्यायचे आहे. कचरा व्यवस्थापन हे ‘समर्थ भारत व्यासपीठा’चे काम नव्हते, आज नाही आणि उद्याही नसणार. आम्हाला व्यवस्था परिवर्तन घडवायचे आहे.
जागतिक वारसास्थळातील आठव्या मानांकनात स्थित असलेल्या पश्चिम घाट आणि त्यात प्रदेशनिष्ठ असलेल्या जैवविविधतेचा अमूल्य ठेवा जतन करण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, याच जबाबदारीची जाणीव करून देणारा हा लेख...
कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथावरच वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘ग्राऊंड झिरो’ मोहिमेदरम्यान निदर्शनास आला आहे. केंद्र सरकारने वैद्यकीय कचर्याच्या व्यवस्थापनासाठी दिलेल्या निर्देशांना केराची टोपली दाखवत या ठिकाणी काही गोडाऊन माफियांकडून पदपथासहरस्त्यावरच वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावली जात आहेत.
एकदा वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या ‘सिंगल यूझ प्लास्टिक’ वस्तू वर्ष २०२२ पर्यंत वापरातून हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिगुल वाजवले होते.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत पुरस्कार मिळवल्याचा बडेजाव केला जात आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरातील कचर्याचे ढीग पाहता महानगरपालिका प्रशासन खरोखर शहरातील स्वच्छतेसाठी काम करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित करत, पुढील दहा दिवसांत कचर्याची समस्या न सोडविल्यास भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे कल्याण पश्चिमचे माजी आमदार व भाजप भटके विमुक्त आघाडीचे संयोजक नरेंद्र पवार यांनी महागनरपालिका आयुक्तांना पत्र लिहून दिला आहे.
मुंबई महापालिकेकडून खेळाची मैदाने बांधण्यात आली होती. मात्र, आता त्याचा वापर गाड्या पार्किंगसाठी तसेच कचरा टाकण्यासाठी होत असून याकडे मुंबई महापालिका दुर्लक्ष करत असल्याची तक्रार कांदिवलीतील चारकोप येथील स्थानिकांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना केली.
ईशान्य भारतात कार्यान्वित होणार इस्रोची ‘नेत्रा'
कोल्हापूरच्या 'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'मधील तिलारी नगर घाटामध्ये राजरोसपणे मृत कोंबड्यांचे अवशेष टाकण्याचे काम होत आहे. यामुळे इथला वन्यजीव अधिवास संकटात सापडण्याची शक्यता आहे. या कॉन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये वाघाचा अधिवास आहे. अशा परिस्थितीत याठिकाणी मृत कोंबड्यांचे अवशेष टाकले गेल्यामुळे त्याव्दारे वन्यजीवांचा संसर्गाची बाधा होण्याची शक्यता आहे.
नैसर्गिक आपत्ती अथवा कुठल्याही कारणामुळे जमा झालेल्या हरित कचर्यावर अत्यल्प किमतीत प्रक्रिया करून त्यामार्फत तयार होणार्या साधनांचा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित काही कामासाठी वापर केला जातो. ज्यामुळे एकतर हरित कचर्याचे नियोजन झाले व त्यातून वैद्यकीय क्षेत्रातील कामांतही मदत होते. अर्थात, समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मार्ग अनेक आहेत, तिथे आवश्यकता आहे ती फक्त इच्छाशक्तीची. पण, मुंबईकरांचं दुर्दैव हेच की, मुंबई महापालिकेकडे याच इच्छाशक्तीचाच मुळी अभाव दिसून येतो.
महानगरांमध्ये निर्माण होणारा घनकचरा आणि त्यांचे अनियोजित व्यवस्थापन ज्याप्रमाणे चिंतेची बाब आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तयार होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा आणि त्याच्या निर्मितीचे वाढते प्रमाण हे नियोजनाच्या दृष्टीने
कल्याण पश्चिम भागात असलेल्या महापालिकेच्या उंबर्डे घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी पोहचल्या होत्या. या आगीमुळे प्रकल्पाच्या मशीनचे व शेडचे नुकसान झाले आहे.
‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या (एमपीसीबी) आकडेवारीनुसार 2019-20 मध्ये राज्यात निर्माण झालेल्या एकूण इलेक्ट्रॉनिक कचर्यापैकी (ई- कचरा ) केवळ एक टक्का कचर्यावर पुनर्प्रक्रिया केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय मानवी आरोग्यास घातक असलेल्या दहा टन कचर्यापैकी 37 टक्के कचर्यावर प्रक्रिया न झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अजूनही राज्यात पर्यावरण आणि मानवी आरोग्यास घातक असलेल्या कचर्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याचे दिसून येत आहे.
कचरा प्रश्नावर नाचक्की झालेल्या कल्याण -डोंबिवली शहरात गेल्या सहा महिन्यांपासून 'शून्य कचरा मोहिम' राबविली जात आहे. या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेतर्फे सुका कचरा देखील वेगळा करून त्यांचा पुनर्वापर कसा करता येईल हे पाहिले जात आहे.
गेल्या काही महिन्यांत मुंबईत कोरोनामुळे वैद्यकीय कचर्याची व्याप्ती नेहमीपेक्षा तिप्पट झाली आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने या कचर्याची योग्य ती प्रक्रिया करुन विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
दरदिनी साडेपाच हजार मेट्रिक टन कचरा
समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत २०० किलो कचरा जमा
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ यांच्या यात्रेनिमित्त वैष्णवांचा मेळा जमतो. या मेळ्यामध्ये वारीला आलेले वारकरी आणि परिसर, पर्यावरण यांच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला निर्मलवारी उपक्रम वनवासी कल्याण आश्रमातर्फे राबवला जातो.
जगातील महासागर, समुद्र, नद्या-नाले, ओढे, पर्वत इतकेच काय, जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टदेखील मानवनिर्मित कचर्यामुळे आच्छादित झालेले दिसते. इतकेच काय तर पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर अंतराळातही असाच कचरा तरंगतोय.
मुंबई स्वच्छ आणि दुर्घटनामुक्त करण्यासाठी १०५००कॅमेऱ्यांची नजर
कचरामुक्तीचा ठाणे पॅटर्न
‘एन्व्हायर्नमेन्ट लाइफ’ या स्वयंसेवी संस्थेने रविवारी प्रबळगड-माची धबधब्याजवळ राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमधून तब्बल ६०० किलो कचरा गोळा केला.
: प्लास्टीक कचऱ्याची जगासमोर उभी आहे. मात्र, दिल्लीतील एका कंपनीने या समस्येवर मात करण्यासाठी नवकर प्लास्टीक या कंपनीने त्यांचा कोट्यवधींचा प्लास्टीक बनवणारा प्लांट बंद करून बायो कॅरीबॅगचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कंपनीचे सर्वेसर्वा पंकज यैन यांनी २०१७ मध्ये प्लास्टीकच्या भस्मासुराची उभी असलेली समस्या पाहून हा पर्याय स्वीकारला. त्यानुसार दिल्लीतील एनसीआर येथे बायोकॅरीबॅगचा प्लांट उभा केला.
एक महिला जखमी झाली असून एकाच मृत्यू झाला आहे
येथील ‘टीम परिवर्तन’च्या माध्यमातून वंचितांची गरज पूर्ण करण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शुन्य कचरा संकलन मोहीमेच्या माध्यमातून महिन्यातुन एकदा अनुक्रमे कल्याण आणि डोंबिवली शहरांतील नागरिकांकडून त्यांच्याकडे असलेले जूने साहित्य संकलित केले जाते.
कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी या सगळ्या वस्तू आधी वेगळ्या कराव्या लागतात. त्यासाठी मोठी यंत्रसामग्री आणि ऊर्जा लागते. तरीसुद्धा १०० टक्के वर्गीकरण होत नाही. ओल्या कचऱ्यात प्लास्टिकचे बारीक कण मिसळले जातात. याला उपाय एकच. कचऱ्याचं वर्गीकरण हे घरातच व्हायला हवं, जे सहज शक्य आहे.
महापालिका क्षेत्रांमध्ये दरदिवशी निर्माण होणारा सुका कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्यावतीने खासगी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली... देशाची राजधानी आणि राजकीय घडामोडींचे केंद्र. पण, सध्या याच दिल्लीला कचऱ्याच्या भीषण समस्येने ग्रासले आहे.
फ्रान्समधील प्यू ड्यू फोयू या ऐतिहासिक पार्कमध्ये सध्या कावळ्यांना कचरा उचलण्याचं ट्रेनिंग दिलं जात आहे. आतापर्यंत सहा कावळ्यांनी ही कला उत्तमरित्या अवगतही केली आहे.
कल्याणमधील कचरावेचक कामगारांच्या मुलांसाठी विविध उपक्रम आविष्कार फाऊंडेशन सातत्याने आयोजित करत असते