केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांची माहिती भाजपतर्फे बिहार विधानसभा निवडणूक पत्रात कोरोना लस मोफत देण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी रान उठवले होते. मात्र, केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी देशभरातील प्रत्येकाला कोरोना लस मोफत मिळणार असल्याची माहिती दिली. निर्मला सितारामण यांच्या वक्तव्यावरून भाजप इतर राज्यांशी भेदभाव करत आहे का, असा आरोप त्यावरुन केला जात होता. मात्र, यावर आता पडदा टाकण्यात आला आहे.
Read More
स्वदेशी बनावटीच्या आणि स्वदेशातच विकसित केलेल्या लांब पल्ल्याच्या ‘निर्भय’ या सब सॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची ओदिशातल्या चंदीपूर इथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ही चाचणी घेतली. चाचणीसाठी ठेवण्यात आलेल्या सर्व उद्दिष्टांची पूर्तता झाली आहे.
मे २०१४ मध्ये भाजपने मित्रपक्षांसह उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्र वगैरे राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांत अभूतपूर्व यश संपादन केले. म्हणून या खेपेला पश्चिम बंगाल, तामिळनाडू व ओडिशा या तीन राज्यांवर भाजपने विशेषत्वाने भर दिलेला दिसतो.