जागतिक सत्ता समतोल झपाट्याने बदलत असला, तरी त्याची दखल न घेतल्याने संयुक्त राष्ट्र ही संघटना आता कालबाह्य ठरत आहे. ही संघटना केवळ अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांच्या हातचे बाहुले बनल्यामुळे, जागतिक समस्यांच्या सोडवणुकीत ही संघटना अर्थहीन, निष्क्रिय आणि दुर्बळ ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या पुनर्रचनेची पुनश्च अधोरेखित केलेली मागणी म्हणूनच रास्त ठरावी.
Read More
S. Jaishankar भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशातील अंतरिम सरकारला कडक शब्दात सुनावले आहे. बांगलादेशला भारतासोबत असलेल्या संबंधांचा निर्णय घ्यावाच लागेल. रविवारी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी संबोधित केले. बांगलादेश सतत भारतविरोधी विधान करत आहे. तसेच अल्पसंख्यांकांवरही अन्याय अत्याचार सुरू आहेत. त्यावर एस. जयशंकर यांनी निषेध व्यक्त केला.
USAID भारतातील निवडणुकांमध्ये USAID ने भारताला मतदानाच्या वाढीसाठी २१ दशलक्ष डॉलर्सचे वाटप केल्याचे वक्तव्य अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. त्यानंतर आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी शनिवारी या विधानातील तथ्ये लवकरच बाहेर येतील असे सांगितले.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांविरोधात ( Editorial on Illegal Immigrants In America ) कठोर कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्याच भूमीवरून त्याचे स्वागत केले आहे. त्याचवेळी अशा भारतीयांना देशाची दारे उघडी असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कारण, भारताची घुसखोरीविरोधातील उक्ती आणि कृती सारखीच आहे...
नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांच्या शपथविधीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सोमवार, दि. २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या दौर्यावर जाणार आहेत. शपथविधी आयोजन समितीने यासाठी भारताला निमंत्रण पाठवले आहे.
नवी दिल्ली : मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार बांगलादेशातील नागरिकांसह अल्पसंख्याकांचे संरक्षण ( Protect Hindus ) करण्यासाठी जबाबदार आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शुक्रवारी संसदेत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुर्णपणे दहशतमुक्त आहे. एक दिवस पाकव्याप्त काश्मीरही आम्ही भारताला जोडू, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज व्यक्त केला.
इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’च्या तयारीचा आढावा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी उच्चस्तरीय बैठक झाली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भारताला इतर कोणाकडून शिकण्याची गरज नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यास हिंसाचार भडकविण्यासाठी वापर केला जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे कॅनडात होणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांविरोधात भारताने व्हिसा सेवा निलंबित केली आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी वॉशिंग्टन डिसी येथे पत्रकारपरिषदेत शुक्रवारी केले आहे.
बांगलादेशची राजधानी ढाका येथे नुकतीच सहावी इंडियन ओशियन कॉन्फरन्स अर्थात हिंद महासागर परिषद संपन्न झाली. यावेळी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेदेखील उपस्थित होते. त्यांनी या संमेलनाला संबोधित केले. यावेळी जयशंकर यांनी चीनसह पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले. चीनवर अप्रत्यक्ष हल्ला चढवत एस. जयशंकर यांनी सांगितले की, जेव्हा एखादे राष्ट्र कायदेशीर दायित्वांकडे दुर्लक्ष करते किंवा दीर्घकालीन सहकार्य करारांचे उल्लंघन करते, तेव्हा विश्वास कमी होत जातो. त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रांना मोठ्या प्रमाणावर गंभीर नु
काँ‘ग्लोबल साऊथ’ म्हणविल्या जाणार्या गटातील एक महत्त्वाचा देश म्हणजे कोलंबिया. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेला वसलेला हा एक प्रमुख देश. या देशाची भूराजकीय, भूव्यापारीदृष्ट्या जागाही तितकीच मोक्याची. उत्तरेला कॅरेबियन समुद्र तर पश्चिमेला अथांग पसरलेला पॅसिफिक महासागर
अमेरिकेने भारताचे महत्त्व ओळखले असून, आशिया खंडात शांतता प्रस्थापित करायचे असेल, तर नव्या भारताला पर्याय नाही, हे तिने मान्य केले आहे म्हणूनच अमेरिकी निर्बंधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून भारत रशियाबरोबर व्यापारी संबंध कायम ठेवतो आणि त्याला विरोध केला जात नाही.
आंतरराष्ट्रीय सहकार्य जोपासण्यास जागतिक संघटनांना अपयश आले आले. परिणामी जगभरात सध्या अस्थैर्य निर्माण झाले आहे. मात्र, ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या धोरणाद्वारे जागतिक स्थैर्यासाठी जी२० च्या माध्यमातून काम करण्यास भारत सज्ज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी केले आहे.
जगातील विविध देशांसोबतच्या व्यापार करारांबाबत भारताचा नवा दृष्टीकोन गुणवत्तेस महत्व देतो. त्यामुळे भारत – युरोपीय महासंघादरम्यानचा मुक्त व्यापार करार ऐतिहासिक ठरेल, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी केले. इंडिया युरोप बिझनेस अँड सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्हच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना ते बोलत होते.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी युएईचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान यांची दिल्लीत भेट घेतली. यादरम्यान, भारत आणि युएई त्यांच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला पुढे नेतील, असे जयशंकर यांनी ट्विट केले. युएईचे महामहिम शेख अब्दुल बिन झायेद यांचे भारतात स्वागत करणे, ही नेहमीच आनंदाची बाब आहे.
ड्रॅगन म्हणजे महाशक्तीशाली, पण भारताने त्या ड्रॅगनलाच सुनावले व त्याची नियत जगासमोर आणली. आता ‘एससीओ’सारख्या संघटनेच्या बैठकीत भारताने चीनला ज्या शब्दांत सुनावले ते तो देश कधीही विसरणार नाही.
चीन आणि त्याच्या अतिरेकी विस्तारवादासमोर संपूर्ण आशियात फक्त भारतच ठामपणे उभा राहू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चीनचे आक्रमक विस्तारवादी धोरण सर्वश्रुतच आहे. आपल्या या अतिरेकी धोरणामुळे चीन अनेक छोट्या देशांना आपल्या कह्यात आणू बघतो आहे. त्यांच्यावर ताबा मिळवून आपले प्रभावक्षेत्र वाढवण्याचा चीनचा डाव आहे. नुकतेच शांघाय को- ऑपरेशनच्या शिखर परिषदेतील आठ देशांमध्ये भारत हा एकट्या भारताने चीनच्या या वन बेल्ट अँड रोड नेशनला विरोध केला आहे. त्यामुळे आशियात भारत एकटाच चीनच्या विस्तारवादी धोरणाला पायबंद घालू
गेल्या आठवड्यात परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर न्यूझीलंडच्या दौर्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्री ननाया माहुटा आणि पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांची भेट घेतली. जयशंकर यांच्या न्यूझीलंड भेटीला एक व्यापक राजकीय संदर्भ होता. मात्र, उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचेही या भेटीचे उद्दिष्ट होते. पारंपरिकरित्या भारत आणि न्यूझीलंडचे संबंध दृढ नसले, तरी मित्रत्वाचे नक्कीच आहेत. भारताने विकसित केलेली अण्वस्त्रे आणि 1998 मध्ये पोखरण येथे केलेली अणुचाचणी या दोहोंचा उभय देशांम
दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशातील सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते.
खरे म्हणजे, रशियावर प्रश्न विचारुन भारताला कोंडीत पकडावे, असे पाश्चात्यांना वाटत असते. त्या वाटण्यातूनच असे प्रश्न उपस्थित होत असतात, पण भारत त्यात अडकत नाही. उलट पाश्चात्यांनाच तोंडावर पाडत असतो, जसे आता झाले.
जागतिक पटलावर भारताचा खणखणीत आवाज म्हणजे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
भारत १५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करतो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरांमध्ये राष्ट्रध्वज फडकवून 'हर घर तिरंगा' मोहिमेला बळ देण्याचे आवाहन भारतीयांना केले आहे. या मोहिमेमुळे तिरंग्यासोबतचे आमचे नाते अधिक दृढ होईल, असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी इंडोनेशियातील बाली येथे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. यावेळी जयशंकर यांनी पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) वाद – समस्यांचे वेगात निकाकरण होण्याचे आवाहन केले.
भारताने युक्रेन-रशिया वादात आपल्या गटात यावे, अशी अमेरिकेची अपेक्षा होती. पण, ते शक्य झाले नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाचा अवलंब करत कोणत्याही एका पारड्यात सामील होण्याचा निर्णय घेतला नाही
‘बेकायदेशीर कृत्यप्रतिबंधक कायदा (युएपीए) दुरुस्ती विधेयक, 2022’ लोकसभेत बुधवारी एकमताने मंजूर करण्यात आले. केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी हे विधेयक लोकसभेत मांडले.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे गुरुवारी भारतात दाखल झाले.
काही दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले होते की, “भारत आणि चीनचे संबंध खूप कठीण परिस्थितीत आहेत.” त्यानंतर आता चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले की, “चीन आणि भारत एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाही, तर एकमेकांचे सहभागी-सहयोगी असायला हवे. काही शक्ती चीन आणि भारतात विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात.”
गेल्याच आठवड्यात आर्थिक संकटाने ग्रासलेल्या श्रीलंकेच्या मदतीसाठी भारत धावून गेला. भारताने नुकताच श्रीलंकेला ९१.२ कोटी डॉलर्सच्या आर्थिक पॅकेजसह १.५ अब्ज डॉलर्सच्या ‘दोन लाईन ऑफ क्रेडिट’ची घोषणा केली आणि त्या देशाला ‘दिवाळखोर’ होण्यापासून वाचवले.
भारताने मलेशियाला पाम तेल आयातीवरुन घेरले, तर दैन्यावस्थेत गेलेल्या अर्थव्यवस्थेचा अनुभव घेणाऱ्या तुर्कीबरोबर भारत तब्बल १०० ड्रोनची खरेदी करत आहे. त्यावर पाकिस्तानी माध्यमांनी जळफळाटाला सुरुवात केली आहे.
नव्वदच्या दशकात भारताने स्वीकारलेल्या ‘लुक ईस्ट’ धोरणाचे पंतप्रधान मोदींनी अर्थोअर्थी ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणात अभूतपूर्व रूपांतर केले. नुकतेच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या ‘मेकाँग-गंगा कोऑपरेशन मीटिंग’मध्येही भारताची ही पूर्वेची अपूर्वाई पुनश्च अधोरेखित झाली.
“भारत महात्मा गांधींची भूमी आहे, त्यामुळे वंशभेदाकडे दुर्लक्ष कधीही केले जाणार नाही. ब्रिटनमध्ये बहुसंख्येने भारतीय राहतात आणि त्या देशासोबत भारताचे घनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे योग्य वेळी हा मुद्दा अतिशय स्पष्टपणे मांडला जाईल,” असे प्रतिपादन देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवार, दि. १५ मार्च रोजी संसदेत केले.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर आणि परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेओ भारत दौऱ्यावर
अमेरिका – इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चर्चा
जयशंकर यांच्या भाषणावरूनच सध्याचे केंद्र सरकार देशहिताला प्रथम प्राधान्य देत असल्याचे आणि त्यासाठी कोणत्याही दबावाला झेलत नसल्याचेच स्पष्ट होते. हा स्वतःमध्ये वेगाने परिवर्तन घडवून आणण्याचा आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अधिक दृढतेने स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचाच दाखला होय.
रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरीसोव यांनी रविवारी केलेल्या घोषणेनुसार, 'एस-४००' क्षेपणास्त्र भारताकडे नियोजित वेळेत सोपवले जाईल. बोरिसोव यांनी एका प्रसिद्धीमाध्यमाला दिलेल्या माहितीत म्हटले की, भारताने या करारातील सर्व रक्कम सुपूर्द केली आहे. येत्या दीड वर्षात हे क्षेपणास्त्र भारताकडे देण्यात येईल. गेल्या वर्षी ५ ऑक्टोबर रोजी द्विपक्षीय बैठकीत हा करार करण्यात आला आहे. भारताने रशियासोबत एकूण ५.४३ अब्ज डॉलरचा करार यावेळी केला होता.
दहशतीच्या जीवावर राज्य करण्याच्या पाकिस्तानच्या सवयीला आता एक नवा आयाम प्राप्त झाला आहे. अमेरिकाच नव्हे तर जगातील सर्वच देशांनी पाकची कड घेणे टाळले आणि पाकिस्तान आज एकटा पडला आहे. जयशंकर यांनी जी भूमिका घेतली, ती पाकिस्तानला स्वत:ची जागा दाखविणारी तर आहेच पण गेली तीन-चार वर्षे ज्या नव्या भारताची संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींकडून सुरू आहे, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारीही आहे. प्रत्यक्ष दहशत आणि आता अणुयुद्धाची दहशत असा हा क्रम आहे.
कुलभूषण जाधव यांची सुटका करावी, अशी विनंती आम्ही पुन्हा पाकिस्तानला करणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले. जाधव यांना सुखरूप भारतात आणेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.