"सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन 'प्रकरणे' दाखल करावी लागणार आहेत. त्यासाठी सहकार कायद्यात आवश्यक बदल करावे लागतील. सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १२ मे रोजी केली
Read More
उबाठा गटाला लागलेली गळती दिवसेंदिवस वाढत असून आता नवी मुंबई महापालिकेतही त्यांना जोरदार धक्का बसला आहे. नवी मुंबई महापालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे प्रतोद रतन मांडवे तसेच त्यांच्या पत्नी सुनीता रतन मांडवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. सोमवार, २८ एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर आणि उबाठा गटाचे उपनेते दत्ता दळवी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
डोंबिवली“पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यांचा घटनाक्रम प्रत्यक्षदर्शी आणि या हल्ल्यात मृतांच्या कुटुंबीयांकडून ऐकताना अंगावर शहारे आले,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. बालाजी किणीकर, आ. राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह
घटनाक्रम ऐकून अंगावर शहारे’
कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाप्रमुखांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला खिंडार पडले आहे. मंगळवार, १५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
मुंबई मराठी साहित्य संघातर्फे ' निवडक जयवंत दळवी ' या कार्यक्रमात दिवंगत लेखक, पत्रकार जयवंत दळवी यांच्या साहित्याचा स्मृतीजागर पार पडला. गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात जयवंत दळवी यांच्या साहित्याच्याअभिवाचनचा कार्यक्रम संपन्न झाला. दिग्गज लेखक तथा नाट्यकर्मींच्या उपस्थिती मध्ये हा साहित्य सोहळा संपन्न झाला.
Waqf बोर्ड सुधारणा (Waqf) विधेयकाला विरोध करुन उबाठाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना कायमचे सोडले, यावर शिक्कामोर्तब झाले. हिंदुत्वविरोधी भूमिकेमुळे त्यांचे भवितव्य अंध:कारमय झाले आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, दि. ३ मार्च रोजी केली.
Woqf Board संसदेत २ एप्रिल २०२५ रोजी रोजी संसदेत मांडलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध होत आहे. केंद्रीय पातळीवर राज्य पातळीवर विरोधी बाकांवर बसणाऱ्या नेते मंडळींनी विधेयकाला टोकाचा विरोध केला आहे. राज्यातही या विधेयकावरून विरोधकांकडून केंद्र सरकार भाजवर लक्ष केंद्रीत करत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्त्वाचा काहीही एक संबंध नसल्याची गरळ ओकली आहे. त्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर टीकेची तोफ डागली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले राज्यातील सर्व गडकोट किल्ले कायमचे अतिक्रमणमुक्त करण्याला प्रधान्य देण्यात येईल. तसेच गोसेवा करणाऱ्या गोरक्षकांना गरज लागेल तेव्हा संरक्षण दिले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार, दि. २९ मार्च रोजी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी पुण्यातील वढू येथे आले असता ते बोलत होते.
मुंबई, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, पुणे, आणि लातूर जिल्ह्यातील उबाठा गटातील विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
काल दिवसभर स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे गाणे वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर आपण सगळ्यांनीच ऐकले. हे गाणे व्हायरल झाल्यावर अपेक्षित ती जळजळीत प्रतिक्रियाही शिवसेनेकडून आलीच. पण, त्यानंतर महाराष्ट्रात कशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते, इथे कशी हिटलरशाही आहे, कलाकारांना, त्यांच्या विनोदी कलेला कशी किंमत नाही वगैरे प्रतिक्रिया ठाकरे गटासह विरोधकांच्या तोंडून बाहेर पडल्या. आता असेच एखादे टीकात्मक गाणे उद्धव ठाकरेंवर कॉमेडीच्या नावाखाली क
ठाणे येथील बाळकुम ते गायमुख या १३.४५ कि.मी. लांबीच्या खाडी किनारा मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेले असून या कामाची एकूण किमंत रू.३,३६४.६२ कोटी इतकी आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १३.४५ कि.मी. असून यातील ६.६४ कि.मी. लांबी करिता पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्यकता नाही. त्यामुळे या लांबीकरिता काम सुरु करण्यास कोणताही अडथळा नाही, अशी माहिती राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या जबर तडाख्यांनी उबाठा गटाचे बुरुज एकामागून एक ढासळू लागले आहेत. या बुरुजांची डागडुजी करणे अजूनही उद्धव ठाकरे यांना शक्य झालेले नाही. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या कामाचा आवाका पाहून, ठाकरेंचा एक एक मोहरा एकनाथ शिंदेंकडे डेरेदाखल होत असून, ठाकरे आणि त्यांच्या विश्वप्रवक्त्यांना हताशपणे बघण्यावाचून दुसरा पर्यायच राहिलेला नाही. कोकणातून राजन साळवी यांनी ठाकरेंना रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. तिकडे छत्रपती संभाजीनगरमधूनही ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली आह
दापोली, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील उबाठा गटाच्या अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवार, १८ मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्तगिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शुक्रवार, १४ मार्च रोजी होळीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. मात्र, यावर विजय वडेट्टीवार यांनी वेगळेच मत व्यक्त केले. नाना पटोलेंनी घाई केली असल्याचे ते म्हणाले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाना पटोलेंनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात त्याचे चांगलेच पडसाद उमटले. मात्र, आता नाना पटोलेंनी आपल्या या वक्तव्यावरून युटर्न घेतला आहे. मी हा विषय गमतीत घेतला असल्याचे ते म्हणाले आहे.
Nana Patole उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर खुर्च्यांच्या अदलाबदलीवरून चर्चाही झाल्या. त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, असे नाना पटोले म्हणाले. यामुळे आता राज्याच्या राजकीय परिस्थितीत उलथापालथ होई
गेल्या काही दिवसांपासून उबाठा गटात गळती सुरुच असून आता पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील उबाठा महिला आघाडीला खिंडार पडले आहे. बुधवार, १२ मार्च रोजी येथील असंख्य पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
संत एकनाथ महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी २०१८ पासून देण्यात येणारा ' भानुदास एकनाथ पुरस्कार' यंदाच्या वर्षी संत साहित्याचे अभ्यासक व संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांना देण्यात येणार आहे. दि. २१ मार्च रोजी पैठण इथल्या नाथमंदिर परिसरातील संत नरहरी सोनार महाराज धर्मशाळेत हा सत्कार सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पैठणकर, वारकरी व नाथभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन योगिराज महाराज गोसावी यांनी केला आहे.
( Devendra Fadanvis ) नवीन सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. विरोधी पक्षाने नऊ पानांचे पत्र दिले आहे. यातील काही नेत्यांनी सह्या केलेल्या नाहीत. हम साथ साथ है अशी त्यांची परिस्थिती दिसत नाही. मात्र हम आपके है कौन अशी परिस्थिती तिथे आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.
अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी धनुष्यबाण हाती घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपल्या मायमराठीच्या समृद्धीसाठी महायुतीचे सरकार सदैव तत्पर राहील " असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिम्मित आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
बहुप्रतिक्षीत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाच्या उद्घाटन समारंभ दि. २ मार्च रोजी पार पडणार असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. बदलत्या काळासोबत, कलेचे वेगवेगळे प्रवाह आत्मसात करून पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी अद्यावत सोयी सुविधांसहीत सज्ज झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपल्या मायमराठीच्या समृद्धीसाठी महायुतीचे सरकार सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून यात विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
सत्तेचा दुरुपयोग करून नेत्यांना अडकविणे हे लोकशाहीसाठी घातक आहे, असे वक्तव्य भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी गुरुवार, २१ फेब्रुवारी रोजी केले.
Pravin Darekar राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीचे सरकार असताना खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याचा कट रचल्याचे षडयंत्र आखले गेले होते, असा आरोप भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारकडून कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमणूक करण्यात आली होती. आज या एसआयटी पथकाची भाजपा आ. प्रविण दरेकर यांनी मुंबई पोलीस मुख्यालयात भेट घेतली आणि आपल्या
ज्यादिवशी एकनाथ शिंदे तोंड उघडतील त्यावेळी उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जावे लागेल, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी केले. रत्नागिरी येथे आयोजित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेत ते बोलत होते.
राजन साळवी यांच्यानंतर आता विदर्भातील उबाठा गटाच्या बड्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला असून उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथील आनंदआश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
उबाठा गटाचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील आनंदाश्रम येथे हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे अनेक बडे नेते उपस्थित होते.
शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, यामुळे संजय राऊतांनी थयथयाट करण्यास सुरुवात केली आहे. शरद पवारांनी शिंदेंचा सन्मान केल्याने आम्हाला वेदना झाल्या असल्याचे ते म्हणाले.
Eknath Shinde कभी झुकता नही... सबको झुकाया.. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांचा साधा कार्यकर्ता, पण मला हलक्यात घेऊ नका. असा गर्भित इशारा देत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात पुष्पा सिनेमा स्टाईल गरजले. निमित्त होते, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मा. नगरसेवक राम रेपाळे यांनी किसन नगर येथे आयोजित केलेल्या "भाई भंडारा " या मोफत उपक्रामाचे. यावेळी शिंदे यांनी, राज्यात तसेच देशात कुठेही गेलो तर किसननगर मध्ये आल्यानंतर जो आनंद होतो तो वेगळाच असल्याचे नमुद केले.
Eknath Shinde Birthday ‘कर्मयोगी’, ‘संघर्षयोद्धा’, ‘लोकनेता’, महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य करणारे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आज दि. 9 फेब्रुवारी रोजी 61वा वाढदिवस. त्यांचा आणि माझा सामाजिक- राजकीय जीवन प्रवास एकत्रित सुरु झाला. त्यामुळे शिंदे साहेबांबद्दल लिहिण्यासारखे, सांगण्यासारखे खरं तर खूप काही आहे. त्यातील काही महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकणारा हा लेख...
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण विभागाची सोडत बुधवार दि.५ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या निवडणूका तोंडावर असताना उद्धव ठाकरेंना एकामागून एक धक्के बसत आहेत. आता पुण्यातील माजी आमदार महादेव बाबर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांच्यासह विविध जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने उबाठा गटाला मोठा दणका बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवार, २८ जानेवारी रोजी हा पक्षप्रवेश पार पडला.
'मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि विकासाचे माहेर असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे राज्याचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेशन सेंटर येथे ‘एम एम आर डी ए’ च्या ५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
संजय राऊतांचे विधान हा राजकीय बालिशपणा आहे, असे प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिले. ते सध्या दावोस दौऱ्यावर असून त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांच्या विधानावर पलटवार केला.
महाराष्ट्रातील कोट्यवधी मतदारांना कुणी वेश्या म्हणत असेल तर एकनाथ शिंदेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यावर राऊतांनी सोमवारी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली.
मुंबई : “राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन, त्यांचे कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावे,” अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Fadanvis ) यांनी शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी दिल्या.
मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील, विशेषत: मुंबई महानगरातील झोपडपट्ट्यांमधील कुपोषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadanvis ) यांनी 'अॅक्शन प्लॅन' आखला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना त्यांनी शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी महिला आणि बालविकास विभागाला दिली.
मुंबई : कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता मिळाल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजण्याआधीच उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) धक्क्यावर धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील 'उबाठा'चे माजी नगरसेवक एकेक करून महायुतीमध्ये प्रवेश करीत असताना, आता छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखील ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली आहे. शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महायुती सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णयांचा धडाका सुरु केला आहे. गुरुवार, २ जानेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रोजी राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत दोन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते.
हिंदू अध्यात्मिक आणि सेवा संस्थानच्या वतीने नवीन वर्षाच्या प्रारंभी एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दि. ९ ते १२ जानेवारी या कालावधीत महाराणी अहिल्याबाई होळकर मैदान, लक्ष्मी पार्क, बांगुर नगर, महाराजा अग्रसेन मार्ग, गोरेगाव (प) याठिकाणी सलग चार दिवस सदर मेळावा भरेल. HSSF Melawa in Mumbai
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथून जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “डॉ. सिंग यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणे ही साधारण कामगिरी नसून फाळणीनंतर भारतात आल्यानंतर बरेच काही गमावले. तरीही डॉ. सिंग यांनी यश प्राप्त केले,” असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.
(Eknath Shinde) भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना शासनाकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यावर दि. २१ डिसेंबर रोजी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासह, जे प्रकल्प रखडले आहेत, जो मुंबईकर मुंबईतून बाहेर गेलाय, त्याला पुन्हा मुंबईत घर देण्याचे काम स्वयं-पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून करू, अशी ग्वाहीच विधानपरिषदेत दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोषणेमुळे स्वयं- पुनर्विकास योजनेला गती मिळणार आहे.
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वागळे प्रभाग समितीतील किसन नगर ( Kisan Nagar ) परिसरात ठाणे महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत झोपडपट्टी परिसर, अंतर्गत रस्ते यांचीही स्वच्छता करण्यात आली.
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारचे ( Mahayuti ) खाते वाटप जाहीर झाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण, तर अजित पवारांकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. गृह मंत्रालयासह ऊर्जा, विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, तसेच माहिती आणि जनसंपर्क विभाग हे विभाग मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवले आहेत.