सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणाला लागून असणाऱ्या शिरंगे खजिन उत्खननाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. हे उत्खनन बंद करण्यासाठी ग्रामसभेने ठराव केलेला असताना देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने गुरुवार दि. ६ मार्च पासून खानयाळे ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यासंपूर्ण परिसरात 'L4' असा सांकेतिक क्रमांक असणाऱ्या नर वाघाचा वावर असल्याचे 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने सावंतवाडी-दोडमार्ग संवेदनशील क्षेत्रासंबंधी तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. (shrirange villagers)
Read More
पुरातत्व शास्त्राचा वापर करून भारतात अनेक ठिकाणी संशोधन सुरु असते. अशातच तेलंगणा राज्यात फणिगिरी नावाची महत्वाची बौध्द पुरातत्वीय साईट आहे. येथे आता पर्यंत अनेक वेळा उत्खनन झाले व काही उत्खननांचे रिपोर्ट सुद्धा प्रकाशित आहेत. येतच आजही उत्खनन सुरु आहे. याबाबत पुरातत्व अभ्यासक आशुतोष बापट यान्नीफेसबक पोस्ट करून धन भरलेल्या मोहोरांचा घडा मिळाल्याची माहिती दली आहे.
मुंबई : राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
पाकिस्तानमध्ये उत्खननादरम्यान एक दुर्मीळ २,३०० वर्षे जुने बौद्ध मंदिर सापडले आहे. मंदिराव्यतिरिक्त उत्खननादरम्यान २,७०० हून अधिक कलाकृती देखील सापडल्या आहेत. पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम प्रदेशातील स्वात प्रांतात पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्वशास्त्रज्ञांच्या संयुक्त पथकाने याचा शोध लावला आहे. हे मंदिर पाकिस्तानातील बौद्ध काळातील सर्वात जुने मंदिर असल्याचे सांगितले जात आहे.
तेल उत्खननात 'आत्मनिर्भरता' शक्य!
स्वयंसेवी संस्थांची कार्यपद्धती, त्यांना परदेशातून मिळणारा निधी, त्यांच्याकडून केली जाणारी प्रत्यक्ष कामे याबाबत सविस्तर अहवाल तयार करावा. अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प, जलविद्युत निर्मिती प्रकल्प, युरेनियमचे उत्खनन, कृषी क्षेत्रातील जैवतंत्रज्ञान, कोळशाच्या खाणी, मोठे औद्योगिक प्रकल्प अशा विशिष्ट क्षेत्रांमध्ये काम करत असलेल्या स्वयंसेवी संस्थांवर ‘लक्ष’ ठेवले पाहिजे.
भारतीय समाजव्यवस्थेत आध्यात्मिक अधिष्ठानाचे अपरंपार महत्त्व आहे. हे आध्यात्मिक अधिष्ठान वृद्धिंगत करण्यासाठी तसेच भारताचा हा अनमोल ठेवा जतन व्हावा, यासाठी विविध मंदिरे ही मोलाची भूमिका बजावत असतात.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात ‘एएसआय’ने असे काही प्रकल्प हाती घेतले. १९५५ मध्ये बी. बी. लाल यांनी महाभारतात वर्णन केलेल्या नगरींचे उत्खनन केले. हस्तिनापूर, इंद्रपत, सोनपत, पानिपत, तिलपत, बघपत आदी अनेक ठिकाणी उत्खनन केले गेले. या उत्खानातून इ. स. पूर्व १३०० मधील मानवी संस्कृतीच्या खुणा मिळाल्या. राखाडी रंगाच्या खापरांवर काळ्या रंगाने रंगवलेली भांडी, (PGW Painted Grey Ware) तसेच लोहापासून तयार केलेल्या अनेक वस्तू मिळाल्या.
अमेरिकेतल्या शालेय पाठ्यपुस्तकातून ‘आर्यांचे आक्रमण’ ही संकल्पना काढून टाकण्यात आली आहे. आपल्याकडचे विद्वान नि विचारवंत मात्र सगळ्या नव्या संशोधनाकडे साफ दुर्लक्ष करून व्हिन्सेंट स्मिथ साहेबांचे जुनचे धडे गिरवत आहेत. आता या अंधश्रद्धेचं निर्मूलन कुणी करायचं?