इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या (आयआयसीटी) निर्मितीसाठी जागतिक पातळीवरील मनोरंजन संस्थांच्या सहकार्याला तत्वतः पाठिंबा देत हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दि. ३ मे रोजी या संदर्भात ही चर्चा झाली. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला जाईल, ज्या प्रमाणे आयआयटी आणि आयआयएमचा दर्जा आहे. तत्सम दर्जा हा आयआयसीटीलाही मिळेल, त्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची मा
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात जातगणना करण्याचा अनपेक्षित निर्णय घेतला. दि. ३० एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत देशासाठी जे काही आवश्यक आहे ते केलेच पाहिजे, असे ते म्हणाले. Bhaiyyaji Joshi on Caste Census
केंद्र सरकारने बुधवारी आगामी जनगणनेत जातीय गणना समाविष्ट करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती माध्यमांना देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की काही राज्यांनी जाती सर्वेक्षण केले आहे आणि जनगणना करणे हे केंद्र सरकारच्या अधिकारक्षेत्रात आहे. ते म्हणाले की राजकीय व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने (सीसीपीए) आज निर्णय घेतला आहे की आगामी जनगणनेत जाती गणना समाविष्ट करावी.
भारतीय रेल्वेच्या अजून दोन कंपन्याना नवरत्न दर्जा प्राप्त झाला आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसी आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन अशी या दोन कंपन्यांची नावे आहेत
मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मान्यता दिली आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की यामध्ये स्किल इंडिया कार्यक्रमासाठी ८ हजार ८०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची वर्ल्ड बँकेचे कंट्री डायरेक्टर ऑगस्ट कौमे आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनचे दक्षिण आशिया रिजनल हेड इमाद फाखोरे आणि इतर अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली
मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल आता सुपरफास्ट आणि आलिशान होणार असून या सेवेत लवकरच नवे आणि प्रवाशांच्या पसंतीला येतील असे बदल करण्याची भूमिका भारतीय रेल्वेने घेतली आहे. त्यातूनच खचाखच भरलेल्या डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुरेसे ऑक्सिजन मिळू शकेल अशा पद्धतीची रचना असणारे नवे डबे यासेवेत आणले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास मोकळा होऊ शकेल. या बदलासोबतच मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर नवे टर्मिनल उभारण्यासह उपनगरीय रेल्वे सेवेत नवे बदल होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वै
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी घोषणा केली की “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारी ( Modi Government ) कर्मचार्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे,” अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मुघल आणि इस्लामिक राजवटीत ताब्यात घेतलेली मंदिरे परत मिळण्यास प्रतिबंध करणारा कायदा प्रार्थना स्थळ कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट) संदर्भात न्यायालयीन लढाई सुरु आहे. या कायद्याला सुब्रमण्यम स्वामी, अश्विनी उपाध्याय, विष्णू शंकर जैन आणि इतर संघटनांनी हिंदू पक्षाच्या वतीने आव्हान दिले आहे. हिंदू पक्षानेही हा कायदा संसदेत मंजूर करण्यास विरोध केला असून कायद्याच्या बचावासाठी काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे निदर्शनास आले आहे. देशातील धर्मनिरपेक्षता वाचवण्यासाठी हा कायदा आवश्यक असल्याचे क
हे नवे वर्ष रेल्वे प्रवाशांना जलद आणि सुरक्षित रेल्वे प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सज्ज झाले आहे. केंद्र सरकारने याआधीच देशभरातील रेल्वे प्रवाशांकरता, कमी आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासात आसन व्यवस्था ( chair car) असलेल्या वंदे भारत रेल्वे गाड्यांमधून जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव घेण्याची सुविधा यशस्वीरित्या उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आता भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांद्वारे शयनयान (स्लीपर) आरामदायी सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे.
R. Ashwin's Retired टीम इंडियाचा ऑल राऊंडर खेळाडू आणि आपल्या फिरकीच्या जादूने नावारूपाला आलेला गोलंदाज आर. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या ऑस्ट्रेलियातील गाबा येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेदरम्यान दि: १८ डिसेंबर २०२४ रोजी त्याने निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत त्याने आंतरराष्ट्रीय खेळातून बाहेर पडत असल्याची माहिती अधिकृतरित्या सांगितली.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई मेट्रो३च्या विविध स्थानकांवर इन-सीटू मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत १०००हून अधिक झाडे लावली.
दिल्ली : राजधानी दिल्लीमधील ( Delhi ) तालकटोरा स्टेडियम येथे दि. २१ फेब्रुवारी ते दि. २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार्या ‘98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ परिसरास ‘छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी’ नाव देण्याचे ‘अखिल भारतीय साहित्य महामंडळा’ने, तसेच ‘सरहद’ या आयोजक संस्थेने ठरविले आहे.
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यांनी भारतीय रेल्वेच्या अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम आणि उपलब्धींवर प्रकाश टाकला. विविध विषयांवर बोलताना त्यांनी प्रवाशांच्या सुविधा वाढवणे, ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारणे, सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे यासाठी केलेल्या प्रयत्नांची तपशीलवार माहिती दिली. पायाभूत सुविधांपासून ते नाविन्यपूर्ण रेल्वे सेवांपर्यंत, मंत्र्यांनी देशाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेच्या वचनबद्धतेव
: सरकारच्या संसदीय कामकाजात अडथळा आणण्याचे काम विरोधक सातत्याने करीत आहेत. विरोधकांनी याची पुढची पायरी गाठत आता फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु याच्या विरोधात सत्ताधारी भाजप सुद्धा ठोस उपाययोजना करताना आपल्याला दिसून येत आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांच्या याच फेक नॅरेटिव्हची पोलखोल केली आहे. बुधावर दिनांक १२ डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये रेल्वे (दुरुस्ती) विधेयक २०२४ पारित करत असताना,त्यांनी विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हचा चांगलाच समाचार घेतला.
भारतातील पहिला ४१० मीटरचा हायपरलूप चाचणी ट्रॅक बांधून पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प भारताच्या अति-आधुनिक वाहतूक प्रणालींमध्ये एक मैलाचा दगड ठरेल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या समाजमाध्यमातून या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची घोषणा केली. यासोबत त्यांनी या चाचणी ट्रॅकचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. यावेळी वैष्णव यांनी म्हंटले आहे की, “भारताचा पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक (४१० मीटर) पूर्ण झाला. टीम रेल्वे, आयआयटी मद्रासची आविष्कार हायपरलूप टीम आणि TuTr यांचा हा एक इनक्युबेटेड स्टार्टअप आहे.”
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर इंटिग्रेटेड ट्रॅक मॉनिटरिंग सिस्टम (ITMS) आणि रोड कम रेल इन्स्पेक्शन व्हेईकल (RCRIV)ची पाहणी केली. ही अत्याधुनिक प्रणाली भारतीय रेल्वेच्या ट्रॅक सुरक्षा आणि कामकाजाची गुणवत्ता सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हे प्रस्तावित रेल्वे मार्ग पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि अवधचा काही भाग महाराष्ट्राशी जोडतील. या प्रकल्पांची माहितीती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांना दिली.
गति शक्ती विद्यापीठ (GSV) उच्च शिक्षण क्षेत्रात, विशेषतः वाहतूक, लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी एक गेमचेंजर म्हणून उदयास आले आहे. याकडे लक्ष वेधताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले “गति शक्ती विद्यापीठ भारत आणि जगातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून उदयास येणार आहे. संपूर्ण वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून हे विद्यापीठ उदयास आले आहे. रेल्वे, विमान वाहतूक, सागरी अभियांत्रिकी, महामार्ग, जहाजबांधणी,
नाशिक : “आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो. पण, हिंदू धर्मासाठी आपण एक होतो का,” असा परखड सवाल ज्येष्ठ अभिनेते आणि इतिहास अभ्यासक राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar ) यांनी शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी नाशिकरोड येथे आपल्या व्याख्यानात उपस्थित करून उपस्थितांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. ‘लव्ह जिहाद’, ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘व्होट जिहाद’ या देशापुढील सर्वांत मोठ्या समस्या असल्याचेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. या समस्यांची व्याप्ती आणि गांभीर्य आपल्याला अजूनही समजत नाही, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. ‘अश्वमेध
नवी दिल्ली : ( PM Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विद्यालक्ष्मी या नवीन केंद्रीय क्षेत्रातील योजनेला मंजुरी दिली आहे. याद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. पीएम विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत, दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी, शिक्षण शुल्क आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून तारणमुक्त, गॅरेंटर फ्री कर्ज मिळविण्यास पात्र असेल. ही योजना एका
मुंबई : राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी धोरण निश्चिती करणे आवश्यक असून, नेमके हेच करण्यात उद्धव ठाकरे Uddhav Thacheray अपयशी ठरल्याचा निष्कर्ष ‘राष्ट्रीय मतदाता मंच’च्या अहवालातून काढण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय मतदाता मंच’ने नुकताच ‘महाराष्ट्र सरकार मूल्यमापन अहवाल २०१९-२४’ प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये राज्य सरकारच्या २०१९ ते २०२४ काळातील कामगिरीचा सर्वांकष आढावा घेतला आहे.
भारतीय रेल्वे कडून प्रवाशांना दिवाळी निमित्त विशेष भेट देण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून आता आगाऊ आरक्षणाची मुदत कमी करण्यात आली असून, तिकीट आरक्षित करण्यासाठीची मुदत १२० दिवसांवरून ६० दिवस (प्रवासाचा दिवस वगळता) करण्यात आली आहे.
कोकण विकास आघाडी मुंबईच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री मा.श्री अश्विनी वैष्णव यांची मुंबई कार्यालयात भेट घेऊन कोकणात गणपती उत्सवासाठी ३४२ जादा गाड्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
दिवाळीच्या निमित्ताने भारतीय रेल्वे कडून नागरिकांना एक विशेष भेट देण्यात आली आहे.
मेट्रो ३ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात धावणार असल्याची माहिती एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Sabarmati Express Accident कानपुर येथे साबरमती एक्सप्रेसचे (Sabarmati Express Accident) २२ डब्बे रेल्वे रूळावरून घसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १६-१७ ऑगस्ट रोजी पहाटे २.३५ वाजता कानपूर येथील गोविंदपूर येथे घडली होती. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. याप्रकरणाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे रूळाचे डब्ब रूळावरील जाड लोखंडी वस्तूला आदळल्याने रेल्वेचे डब्बे घसरले आहेत. याप्रकरणात आयबी संस्थेचा तपास सुरू आहे.
हाराष्ट्रातील डहाणूजवळील वाढवण येथे ग्रीनफिल्ड बंदर उभारण्यास केंद्रातील मोदी सरकराने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथील सर्व हवामान ग्रीनफिल्ड डीप ड्राफ्ट प्रमुख बंदर म्हणून विकसित केले जाईल. हे बंदर विकसित झाल्यावर जगातील दहाव्या क्रमांकाचे बंदर असेल.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सीप्झ, एम.आई.डी.सी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक, सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सी.एस.एम.टी, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड या १३ मेट्रो स्थानकांजवळ ५०० हून अधिक झाडे लावली असल्याची माहिती दिली आहे.
कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसह सणासुदीला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवासी आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाय म्हणून अतिरिक्त रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली जात आहे.
१७ व्या संयुक्त समितीच्या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा
कारडेपोच्या रखडपट्टीमुळे पहिला टप्पा विलंबाने; व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची माहिती
बिहारच्या शिक्षण विभागाने २०२४ साठीचे शालेय सुट्यांचे कॅलेंडर जारी केले असून यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश हिंदू सणांच्या सुट्या रद्द केल्या आहेत, तर ईद आणि मोहरमच्या सुट्या वाढवण्यात आल्या आहेत. याशिवाय सरकारी शाळांमध्ये रविवारऐवजी शुक्रवारच्या साप्ताहिक सुटीचा आदेश जारी केला. केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी या आदेशाचा निषेध केला आहे.
"निःस्वार्थ समाज सेवेसाठी संवेदना महत्वाची आहे. ही संवेदना कधीही क्षीण होता कामा नये. कारण संवेदनेतूनच समाजासाठी काम करण्याची प्रेरणा, उभारी मिळते," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुहासराव हिरेमठ यांनी केले.
कित्येकांनी नवान्न पौर्णिमा हा शब्दप्रयोगच ऐकला नसल्याच्या शक्यता जास्त आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शेती ज्यांचा प्रमुख व्यवसाय आहे, अशा घरात नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. आपल्याकडे बरेच सण पौर्णिमेच्या दिवशी साजरे होतात ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? यामागचं कारण काय असावं?
भारत पाक सीमेवर मराठ्यांच्या पराक्रमाची माहिती देण्यासाठी जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून २४ ऑक्टोबर रोजी मुंबईतील राजभवन येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांचा हस्ते हा पुतळा रवाना करण्यात आला.
इस्रायल – पॅलेस्टाईनमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा कोणताही परिणाम भारत – मध्यपूर्व – युरोप आर्थिक कॉरिडॉरवर (आयएमईईसी) होणार नसून भारताने त्यासाठी ३.५ लाख कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देऊन काम सुरू केले आहे.
बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ११ ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथील बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर स्टेशनजवळ दिल्ली-कामाख्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे २१ डबे रुळावरून घसरल्याने हा अपघात घडला आहे.
साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" ज्येष्ठ साहित्यिक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने हा कार्यक्रम वसई - विरार शहर महानगरपालिका आणि संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय यांच्या सहकार्याने शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता वसई पश्चिम येथील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात संपन्न झाला.
महात्मा गांधींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यातच आता भारतीय रेल्वेने आपल्या नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या केवळ १४ मिनिटांत स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. '१४ मिनिटांत चमत्कार' असे या योजनेला नाव देण्यात आले आहे.
जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका माणिक भिडे यांचे वृद्धापकाळाने ८८ व्या वर्षी नुकतेच निधन झाले आहे. गेली काही वर्षे त्या पार्किन्सन्स आजाराने ग्रासलेल्या होत्या. त्यांच्या निधनवार्तेने अवघे संगीत विश्व् गहिवरले आहे. माणिक मूळच्या कोल्हापूर येथील अत्रोली घराण्यातील होत, त्यांनी गोविंद भिडे यांच्याशी विवाह करून जेष्ठ गायिका किशोरी आमोणकर यांचे शिष्यत्व पत्करून मुंबईस आले. त्यांच्याकडून त्यांनी १५ वर्षे गायनाचे धडे घेतले.
ओडिशातील बालासोरमधील भीषण रेल्वे अपघाताने देश हळहळला. या अपघातात २७५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला, तर जवळपास ९०० हून अधिक जण जखमी झाले. सध्या याठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर आली असून त्यामागे ‘एनडीआरएफ’च्या जवानांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा वाटा आहे. या रेल्वे अपघाताची माहिती मिळताच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दिल्लीहून घटनास्थळी पोहोचले. दुसर्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीही घटनास्थळी पोहोचले.
मुंबई : खारघर येथे २३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत होणाऱ्या ४८ व्या अश्वमेध महायज्ञानिमित्त भूमीपूजनाचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती मैदान, खारघर येथे संपन्न झाला. अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, अश्वमेध यज्ञ हे केवळ धार्मिक अनुष्ठान नाही, तर त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक व अध्यात्मिक महत्त्व आहे. सर्व समाजाला एकत्र घेऊन यज्ञ करीत असल्यामुळे त्यातून मतभेद मिटून एकात्मतेची भावना वाढते
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मह्त्त्वांकाक्षी प्रकल्पातील एक 'वंदे भारत एक्सप्रेस' अंतर्गत देशाच्या विविध भागात रेल्वे जाळे अत्याधुनिक केले जात आहे. मुंबईतदेखील आता वंदे भारत मेट्रोद्वारे रेल्वे प्रवास जलद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारकडून मुंबईकरांना २३८ वंदे भारत मेट्रोची भेट मिळणार आहे. अशी माहिती रेल्वे बोर्डाने सांगितली आहे. या वंदे भारत मेट्रोमुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी अत्याधुनिक होणार आहे. मुंबईतल्या लोकल ट्रेनच्या बदल्यात या नवीन वंदे भारत मेट्रो लवकरच धावणार आहेत. या व
नवी दिल्ली : देशात ५जी इंटरनेट तंत्रज्ञानाचा वेगवान विस्तार होत आहे. गेल्या आठ महिन्यात देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील ७०० जिल्ह्यांमधी तब्बल २ लाख ठिकाणांपर्यंत या सेवेचा विस्तार झाला आहे.
मुंबई : “भारतात २०२४ पर्यंत ‘हायड्रोजन ट्रेन’ धावतील,” अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. हावडा-पुरी ‘वंदे भारत’ ट्रेनने प्रवासादरम्यान त्यांनी ही माहिती दिली आहे. ओडिशाला गुरुवारी पहिली ‘वंदे भारत’ ट्रेन मिळाली असून याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः पुरी ते हावडा प्रवास केला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती तंत्रज्ञान – हार्डवेअर क्षेत्रासाठी १७ हजार कोटी रुपयांची पीएलआय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सुमारे २ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय आरोग्य, रसायने व खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेल्वेने त्यांच्याशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी प्रवाशांनी भरलेल्या विशेष भारत गौरव पर्यटक ट्रेनला शुक्रवार १४ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आयआरसीटीसी द्वारे आयोजित एका विशेष कार्यक्रमात, विशेष ट्रेनला हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
कसबा पोटनिवडणुकीत पराभवानंतर हेमंत रासनेंची पोस्ट चर्चेत आली आहे. "हे सामर्थ्य् नाशवंत नाही!" असे म्हणत त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट व्हायरल केली आहे.पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवीेंद्र धंगेकर मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने आपला बालेकिल्ला कायम ठेवला असून अश्विनी जगताप यांचा मोठा विजय झाला आहे. अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला आहे.
हळूहळू जे गौप्यस्फोट होताहेत, हे चांगलेच आहेत. मी जे बोललो तेच खरे होताना दिसते आहे. आतापर्यंत अर्धेच बाहेर आले आहे. अजून अर्धी गोष्ट बाहेर यायची आहे. काळजी करु नका, संपूर्ण गोष्ट सुद्धा बाहेर येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.