‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील काही शहरांवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशातील काही महत्वाच्या विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर बुधवारी २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. बंद करण्यात आलेल्या विमानतळांमध्ये श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, पठाणकोट, जोधपूर, जैसलमेर, भुज, जामनगर, राजकोट, धर्मशाला, शिमला, भटिंडा आणि पोरबंदरचा समावेश आहे.
Read More
Narayan Rane सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवाईमार्गे देशातील वेगवेगळ्या ठिकाणांना जोडण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चिपी विमानतळावरुन आता इंडिगोची विमानसेवा सुरू केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थिती चिपी विमानतळ बंद होणार नाही, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी शुक्रवार, दि. ११ एप्रिल रोजी दिली.
इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
airlines काही दिवसांपासून विमान कंपन्यांवर बॉम्ब हल्ले करणार असल्याच्या धमक्या देण्याचे काम सुरूच आहे. शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी ८५विमान कंपन्यांना लक्ष करण्यात आल्याची माहिती आहे. उदयपूर ते दिल्लीला जाणाऱ्या विमानांवर हल्ला करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली आहे. यामधील आकासा विमान कंपनीच्या २५ विमानांना लक्ष केले आहे.
threats to planes देशभरात ९५ विमानांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. काही दिवसांपासून विमान कंपन्यांना मेल आणि मेसेजद्वारे धमक्या येत आहेत. ज्यात २० एअर इंजिया, २० इंडिगो, २० विस्तारा आणि २५ आकाशा विमानांचा समावेश आहे. याशिवाय स्पाइसजेटच्या ५ विमानांना आणि अलायन्स एअरच्या ५ विमानांनाही धमक्या देण्यात आल्या आहेत. यामुळे सुरक्षा यंत्रणेत भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी ९० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना धमकावल्याप्रकरणी आठ एफआरआय दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची खोटी धमकी दिल्यानंतर, आता इंडिगोच्या २ विमानांना उड्डाणाच्या काही मिनीटांआधी, विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. ऑपरेटिंग प्रोसीजरनुसार, तपासणीसाठी विमानांना सुरक्षित घटनास्थळी दाखल करण्यात आले आहे.
इंटरग्लोब एंटरप्रायझेस २०२६पर्यंत इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग विमाने तैनात करण्याच्या उद्दिष्टाच्या एक पाऊल पुढे जात आहे
गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली पुणे-बेळगाव विमानसेवा पुन्हा सुरु होत असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी दूर होणार असल्याचे बोलले जात आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या मार्च २०२३च्या वाहतूक अहवालात असे नमूद केले आहे की, जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत देशांतर्गत विमानसेवेचा लाभ ३७५.०४ लाख लोकांनी घेतला. याच कालावधीत म्हणजे जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यान प्रवासी संख्या २४७.२३ लाख होती. हवाई प्रवाशांमध्ये वार्षिक वाढ ५१.७० टक्के आणि मासिक वाढ २१.४१ टक्के नोंदवली गेली आहे.
एका विमान प्रवाशाने तक्रारीत केलेल्या आरोपानुसार, विमानात बसल्यानंतरच तिघांनीही धिंगाणा सुरू केला होता. एअर होस्टेसने तिघांनाही ताकीद दिल्यानंतर तिच्याशीही गैरवर्तन केले होते. रोहित कुमार, नितिन कुमार आणि पिंटू कुमार, अशी तिघांचीही नावे आहेत. तिघेही नशेतच होते. यामुळे इतर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला होता. त्यांनी कित्येकदा पायलटकडे तक्रारही केली होती. या संपूर्ण प्रकरणाची दखल विमानतळ प्राधिकरण आणि सीआयएसएफला देण्यात आली आहे. तिघांनाही विमानातून उतरल्यावर रोखले होते. मात्र, आपण एका राजकीय पक्षाचे आहोत
कोरोना महामारीने कार्यालयात जाणाऱ्यांना घरून काम करण्यास भाग पाडले होते. पण विमानसेवा क्षेत्राची ही परिस्थिती नव्हती.
एका दिव्यांग मुलाला रांची विमानतळावर त्याच्या कुटुंबासह विमानामध्ये चढू न देण्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी इंडिगो एअरलाइन्सला चांगलेच फटकारले आहे. "अशा वर्तनाबद्दल शून्य सहनशीलता असून, कोणत्याही माणसाला यातून जावे लागू नये! या प्रकरणाची मी स्वत: चौकशी करत आहे, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल," असे मंत्र्यांनी ट्विटरवर लिहिले.
शारिक अहमद या तरुणाने एका हिंदू युवतीला इंडिगो एअरलाईन्स मध्ये नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने तिच्यावर बलात्कार करून तिला लुटल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे
कोरोना विषाणू महामारीचा फटका विमान वाहतूक कंपन्यांनाही बसला आहे. या क्षेत्रांतील रोजगारांवर कुऱ्हाड कोसळली असून एका अहवालात नमूद केल्यानुसार, २०२१मध्ये विमान वाहतूक कंपन्यांच्या क्षेत्रातील महसूलात ४४ टक्क्यांनी घट झाली आहे. 'इंक्रा' या संस्थेच्या अहवालानुसार, विमान कंपन्यांना आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी एकूण ३५० अब्ज रुपये इतक्या मदतीची अपेक्षा आहे.
सरकारला ‘खलनायक’ ठरवत हे सरकार कसे दडपशाहीवादी, अल्पसंख्याकविरोधी आहे, याचे सुरस कथानकच रचले. ‘रिल’ आणि ‘रिअल’ लाईफमध्ये एक पुसट रेषा असते, पण अनुरागच्या डोळ्यात इतका जहाल अंगार पेटलाय की, त्याला मोदीद्वेषासमोर काही दिसेल तर नवल !
पत्रकारासोबत गैरवर्तन प्रकरणी कुणाल कामरावर सहा महिने विमानप्रवासास बंदी
कोल्हापूर विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ
नुकतीच एअर इंडिया कंपनीच्या विमानातील खाद्यपदार्थात चक्क झुरळ सापडल्याची धक्कादायक घटना घडली.
विमान तिकीट बुकींग करताना वेब चेक इनवर शुल्क आकारणीच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर ‘इंडिगो’ कंपनीने हे शुल्क सर्वच जागांसाठी नसल्याचे स्पष्ट केले आहे.