राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. गुरुवार, ९ जानेवारी रोजी न्यायालयाने यावर निर्णय दिला असून यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
Read More
ठाणे : मुंबई महापालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त ५० एमएलडी पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी आज दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत संयुक्त बैठक घेतली. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
(MLA Suresh Dhas) अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. "प्राजक्ता माळींबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. कुणाचेही मन दुखावले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो", असे सुरेश धस म्हणाले.
नागपूर : मुंबई विद्यापीठाच्या ( Mumbai University ) अधिसभेवर (सिनेट) भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतिनिधी म्हणून आमदार डावखरे यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे.
नागपूर : विधानसभा निवडणुकीत सर्वाधित लाडक्या बहिणींनी ( Ladkya Bahini ) महायुती सरकारला भरभरून मतदान केले. त्यामुळे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात किती महिलांना संधी मिळते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिला आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.
मुंबई : “देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जैन ( Jain ) समाजाने सातत्यपूर्ण योगदान दिलेले आहे. यापुढील काळातही जैन समाज आपले सर्वोच्च योगदान महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासासाठी देईल,” असा निर्धार जैन समाजाच्या नीती निर्धारण संमेलनावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनातून विरोधकांनी काढता पाय घेत आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर आमदारांना शपथ देत असतानाच ईव्हीएमवर संशय घेत त्यांनी शपथविधीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर Uddhav Thackeray यांची खबरदारी..
नवी दिल्ली : भाजपने दिल्लीच्या उत्तम नगरमधील आम आदमी पक्षाचे (आप) आमदार नरेश बालियान यांची एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे, ज्यामध्ये ते एका गुंडाशी बोलत आहेत. भाजपचे ( BJP ) म्हणणे आहे की बालियान यांचे गुंडांशी संबंध असून ते खंडणीची टोळी चालवतात. भाजपने बालियान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ठाणे : लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे खोटे नॅरेटीव्ह चालले. पण विधानसभा निवडणुकीत झिरो झाले.तेव्हा, खोट्या नॅरेटीव्हचा फटका कसा बसतो हे विरोधकांना कळले असेल. अशी शालजोडीतील टीका आमदार संजय केळकर ( MLA Kelkar ) यांनी मविआवर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम बाबत स्पष्टता केल्यानंतरही तक्रारी करणाऱ्या विरोधकांनी आत्मपरिक्षण करावे. असा सल्लाही आमदार केळकर यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणूकीचा निकाल हा काँग्रेससाठी अतिशय लाजीरवाणा असून काँग्रेसच्या आमदारांनी भाजपममध्ये विलीन व्हावे, असे वक्तव्य भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली.
ठाणे : “महाराष्ट्राला पुढे आणण्यासाठी भाजपने जीवाचे रान केले आहे. राज्यात आम्ही चांगले पेरले तेच उगवले असल्याने राज्यात जनतेने बंपर विजय महायुतीला दिला. प्रत्येक पक्षाला वाटते आपल्या जागा वाढल्या पाहिजेत, आपला महापौर झाला पाहिजे. या अनुषंगाने ठाणे महापालिकेत भाजपच्या जागा वाढवण्याकरिता कार्यकर्त्यांची ताकद लावणार आहोत,” अशी भूमिका आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी व्यक्त केली.
पनवेल : “आमदार प्रशांत ठाकूर ( Prashant Thakur ) यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला आहे. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यापुढे विजयाचा षटकारही मारणार आहेत,” असा ठाम विश्वास माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.
रायगड जिल्ह्यातील एकूण सात विधानसभा मतदारसंघात विद्यमान सातही विद्यमान आमदार निवडणूक रिंगणात होते आणि त्या सातही आमदारांच्या गळ्यात पुन्हा विजयाची माळ पडली आहे.
मुंबई : ‘झोपडपट्टीमुक्त दहिसर’ करण्याचा निर्धार येथील भाजपच्या अधिकृत उमेदवार मनीषा चौधरी ( Manisha Chaudhari ) यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी केलेली खास चर्चा.
मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा एक मोठा टप्पा पूर्ण होऊन लाखो मुंबईकर या मार्गावरून जलद प्रवासाचा आनंद घेत आहेत. मात्र हा प्रकल्प बांधत असताना वरळीच्या क्लिव्हलँड बंदर भागातील स्थानिक मच्छिमार आणि कोळी बांधवांनी या रोडला विरोध केल्यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या कोळी बांधवानी सत्तेत असणाऱ्या स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी सतत भेटीचा पाठपुरावा केला. मात्र, ठाकरे सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असणाऱ्या आदित्य ठाकरे यां
नुकतीच महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यापैकीच पहिल्यांदाच आमदार झालेले भाजपचे युवा आमदार विक्रांत पाटील यांचा युवा कार्यकर्ता ते विधानपरिषद आमदार असा प्रवास सांगणारा हा संवाद...
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त सात आमदारांनी मंगळवारी शपथ घेतली. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या सात आमदारांनी सदस्यत्वाची शपथ दिली.
राज्यपाल नियुक्त सात आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यासाठी उबाठा गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तातडीने सुनावणीही पार पडली. परंतू, न्यायालयाने या आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
T Raja Singh भाजपचे आमदार टी राजा सिंह (T Raja Singh) यांच्या घराची ४ संशयितांनी रेकी केल्याची घटना आहे. खाजा आणि इस्माईल अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ही टी राजा सिंह यांच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल माध्यमाद्वारे पाठवत होते. ही घटना २७-२८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीची आहे. आता याप्रकरणी चार पैकी दोघेजण ताब्यात आले आहेत.
Ganeshotsav 2024 भाजपा चारकोप विधानसभा व आमदार योगेश सागर यांच्या वतीने गौरी गणपती साठी कोकणात दिनांक ४ व ५ सप्टेंबर रोजी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे, आज प्रथम बस गणपती बाप्पा मोरया या गजरात रवाना झाली. ५ सप्टेंबर रोजी ३ विशेष एसी बस व एस टी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्यासमोर सुनावणी पार पडली. दरम्यान, न्यायालयाने अजित पवारांसह त्यांच्या ४१ आमदारांना नोटीस बजावली आहे. तसेच हे दोन्ही प्रकरण सारखे असल्याने यावर एकाचदिवशी पण स्वतंत्र सुनावणी होणार आहे.
गिरणी कामगार संपला आज ४२ वर्षे उलटली तरीही हजारो गिरणी कामगार अद्याप हक्काच्या घरापासून वंचित आहे. या गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळावी या मागणीसह अन्य मागण्यांसह गिरणी कामगार वारस संघर्ष समितीने गिरणी कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांना निवेदन दिले. गुरुवार दि.२० जून२०२४ रोजी म्हाडा कार्यालयासमोर एकत्र येत गिरणी कामगारांनी निदर्शने केली.
दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या हत्येस मोदी सरकार जबाबदार आहे, असा प्रचार करून आपली पोळी भाजणार्या पुरोगामी कंपूचा बुरखा अखेर फाटला आहे. रोहित वेमुला याचे जातप्रमाणपत्र बनावट होते, असे तेलंगणा पोलिसांनी तेलंगणा उच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. बनावट प्रमाणपत्रामुळे मिळालेल्या पदव्या रद्द होऊ शकतात, याची त्याला भीती होती तसेच डाव्या विद्यार्थी संघटनांचाही त्याला राग होता.
योद्धा शरण जात नाही, तेव्हा त्याला बदनाम केले जाते...’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नुकतीच उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली. पण, त्यांचा रोख सत्ताधार्यांकडे नव्हता, तर स्वपक्षातील कट-कारस्थानांना कंटाळूनच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. पक्षनेतृत्व आपल्या नाराजीची दखल घेईल, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु, उद्धव ठाकरेंनी त्यांना फारसे महत्त्व दिले नाही.
देशभरात लोकसभा निवडणुक २०२४ चे वारे वाहु लागले आहेत. सर्वंच पक्ष लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार घोषित करत आहेत. अशामध्ये काँग्रेसला पुन्हा सुरुंग INC MLA resign लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे पाच आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. यात तीन विधानसभेतील आमदार आहेत, दोन विधान परिषदेतील आमदार आहेत.
माझं निर्णय घटनेला धरून आहे हे त्यांनाही माहिती आहे. पण माझा निर्णय चुकीचा आणि कुणाच्या प्रभावाखाली घेतलेला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट न्यायालयात गेले आहेत. यावर आता राहूल नार्वेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली.
गुरुवारी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला अनेक आमदार अनुपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते सारवासारव करताना दिसले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर मंत्रिपदासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. याला आता भाजप आमदार नितेश राणे यांनीदेखील दुजोरा दिला आहे. दीपक केसरकर यांच्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे पदांसाठी आणि आमदारकीसाठी पैसे घेतात यावर आता शिक्कामोर्तब झालं असल्याचे ते म्हणाले आहेत. बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात सध्या शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आहे. १० जानेवारी रोजी कोणालाही अपात्र न करता खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात आता शिंदे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. उबाठा गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बुधवारी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे. दरम्यान, त्याआधीच विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याने उद्धव ठाकरेंनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता राहूल नार्वेकरांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत ठाकरेंना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. सत्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेस स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच न्यायालयाने त्यांना जामीनही नाकारला आहे. शनिवारी याप्रकरणी सुनावणी पार पडली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी मानून दोषी ठरवले असून त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नागपुर येथे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पार पडली असून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणी दीपक केसरकर यांची उलटतपासणी सुरु आहे. यावेळी उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून आदरापोटी उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख असा उल्लेख होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एखाद्या कामानिमित्त आमदारांच्या घेतलेल्या सह्या मुद्दाम दुसऱ्या ठरावाला जोडण्याची बोगसगिरी उबाठा गटाने केली असल्याचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. शनिवारी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी पार पडल्यानंतर शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हिंदूंमध्ये द्वेष पसरवणारे काँग्रेस आमदार आफताबुद्दीन मोल्ला यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी हिंदू संत, पुजारी आणि नामघरिया यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते.
उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या एका आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर चालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. शाहजील इस्लाम असे या आमदाराचे नाव आहे. शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी ३० ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेले वेळापत्रक फेटाळले आहे. तसेच आमदार अपात्रतेप्रकरणी ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता कार्यवाहीचे वेळापत्रक ३० ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना आमदार अपात्रता कार्यवाहीचे वेळापत्रक १७ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याविषयी मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेल्या वेळापत्रक असमाधान व्यक्त केले.
नुकतीच राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवले आहे. आज संध्याकाळी ७ वाजता मंत्र्यांना वर्षा निवासस्थानी बोलवण्यात आले आहे. वर्षा बंगल्यावरील बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांना बोलवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्यक्षांवर कुणाचा दबाव आहे का? असा सवाल केला होता. आता भाजप खासदार प्रताप चिखलीकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवेंनी वायफळ बडबड करु नये, असे ते म्हणाले आहेत. नांदेड येथे बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सोमवारी सुनावणी पार पडली. दरम्यान, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे. सगळ्या प्रकरणावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केले आहे.
विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी आज पार पडली. यावेळी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणी एकूण ३४ याचिका असून आजच्या सुनावणीनंतर या याचिकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठाणे : ठाण्यात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुका रहिवाशांच्या कला-क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी ठाण्यात भारतीय जनता पक्ष व सन्मान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजता ठाण्यातील गोदुताई परुळेकर मैदान येथे सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतंर्गत आमदार सन्मान चषक - २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी खोपट येथील भाजपाच्या कार्यालयात या स्पर्धेसाठी सहभागी संघाची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. यावेळी आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे,माजी नगरसेवक नारायण पवार,सुनेष जोशी,
उद्धव ठाकरे गटाचे आमदार Rajan Salavi तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. त्यांच्या पत्नीसह कुटूंबियांना एसीबीची नोटीस बजावण्यात आली आहे. साळवींची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला ही नोटीस बजावली आहे. २० मार्चला या सर्वांना चौकशीसाठी हजर रहाण्याचे निर्देश नोटीशीद्वारे देण्यात आले आहेत. साळवींची यापूर्वी तीनदा तर स्वीय सहायकांचीही चौकशी झाली होती. नोटीस आल्याची माहिती स्वतः साळवींनी अधिवेशनात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
ज्याप्रमाणे वकिलांच्या नावाआधी अॅडव्होकेट आणि डॉक्टरांच्या नावाआधी Dr. लावण्यात येते त्याचप्रमाणे शिक्षकांच्या नावाआधी आता टीचर Tr. लावण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत,'
रश्मी उद्धव ठाकरे जेव्हा सामनाच्या संपादकपदी नियुक्त झाल्या त्यावेळी त्यांच्यासह उद्धव ठाकरेंनाही संजय राऊतांनी अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या होत्या. ही गोष्ट राऊत विसरले असतील पण विसरलेलो नाही, असा गौप्यस्फोट माजी मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.
सोमवारी रात्री एका संगीत मैफिलीचा समाप्तीनंतर सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याच्यासोबत काही पुरुषांकडून गैरवर्तन करण्यात आले. आपल्यासोबत जबरदस्तीने सेल्फी काढावा म्हणून एक घोळका सोनू यांच्या निकट गेला असता धक्का बुक्की झाली आणि सोनूचे सहकारी पायऱ्यांवर खाली पडले. जमलेल्या गदारोळात एक मुलगा मुंबईतील ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांचं असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सोनूला कोणतीही शारीरिक हानी पोहोचली नसल्याचे त्याने मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळावर दिलेल्या व्हिडिओमधून स्पष्ट होते.
गोव्याच्या सीमेपासून थेट गुजरातच्या सीमेपर्यंत पसरलेल्या कोकण विधान परिषद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक या महिन्यात होत असून यावेळी येथील आमदार ‘सावित्रीच्या लेकी’ ठरवणार आहे. संपूर्ण मतदारसंघात एकूण ३७ हजार ७१९ पैकी १८ हजार ९७ महिला मतदार असून यापैकी ठाण्यात नोंद झालेल्या १४ हजार ६८३ शिक्षकांमधील ८ हजार ७६७ महिला आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ हा भाजपप्रणीत शिक्षक परिषदेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. शिक्षक परिषदेचे रामनाथ मोते सलग दोन वेळा याच मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, मागील निवडणुकीत मोते या
"जसं अमिताभ बच्चननं सिनेमात मेरा बाप चोर है, असं गोंदवून घेतलं होतं. तसं आता आमदारांची मुलं गद्दार म्हणून डोक्यावर आणि हातावर गोंदवून घेतील," असं वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं आहे. शुक्रवार, दि. २ नोव्हेंबर रोजी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. "मी बाळासाहेबांच्या पुण्याईनं तुरुंगातून सुटून आलोयं. बऱ्याच कालावधीनंतर मी नाशिकला आलो आहे. पण जी जूनी शिवसेना आहे तीच शिवसेना आहे.", असंही ते म्हणाले.