आदिवासी समाज हा आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी झगडत आहे. त्याचे जीवनमान स्थिर नाही. त्यासाठी त्यांना जमीनीची मोजणी करुन आणि नकाशा तयार करुन देण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच जमीन मोजण्याबाबत काही आर्थिक आणि तांत्रिक धोरण तयार करता येईल का याबाबत जमाबंदी आयुक्तांकडून माहिती घ्यावी. यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावा असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
Read More
आदिवासी समाजाच्या आरोग्यासाठी व्यापक आणि परिणामकारक धोरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रविवार, २ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे आदिवासी आरोग्य विषयक पहिला आंतरराष्ट्रीय परिसंवाद समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.
राज्य सरकारने पोलिस भरतीत आदिवासी उमेदवारांना ५ से.मी. उंचीची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता आदिवासी तरुणांचे पोलिस बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
आज प्रत्येकाच्याच हृदयात दादा तुम्ही घर केलं आहे. आज फक्त देहरूपाने तुम्ही आमच्यात नाहीत, पण तुमचा सहवास, तुमचे सत्विचार, तुमचा शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव आहे आणि असेल. मी १९८७ साली इयत्ता पाचवीत तलासरी केंद्रात प्रवेश घेतल्यापासून आबा (माधवराव काणे), चिंतामणदादा वनगा, विष्णुदादा सवरा, आदरणीय अप्पा, वसुधाताई, आदरणीय कुंदाताई, अशा अनेक सत्-पुरुषांचा सहवास मला लाभला, हे मी माझे भाग्य समजते. कैलासवासी आबा, आदरणीय अप्पा, वसुधाताई या त्रिमूर्तींच्या सत्विचाराने प्रेरित झालेले चिंतामणदादा, विष्णुदादा अशा अनेक
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दादांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. शिक्षण घेत असतानाच दादांचा संपर्क ऋषितुत्य अशा माधवराव काणे यांच्याशी झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीज दादांच्या आयुष्यात रुजविण्याचे कार्य माधवराव काणे व अप्पा जोशी यांनी केले. संघाच्या मुशीमध्ये कार्य करणारे दादा अंगीभूत गुणांमुळे अधिकच सामाजिक जीवनामध्ये एकरूप, एकरस झाले.
अधूनमधून ‘वनवासी कल्याण केंद्र’ (तलासरी), ‘हिंदू सेवा संघ’ (आंबाण), संघाचे ‘हेमंत शिबीर’ अशा निमित्ताने विष्णुदादांशी परिचय वाढत गेला, पण अगदी जवळून परिचय होण्याकरिता १९९० उजाडावे लागले. निमित्त होते कारसेवेचे. झांशी रेल्वे स्थानकात आम्हाला अटक झाली. त्या बंदिवानांमध्ये रामभाऊ कापसे आणि विष्णु सवरा यांना बघून मी उडालोच. राजकीय व्यक्ती कारसेवेला येतात. आम्हा सर्वांकरिता हे अप्रूपच होते.
विष्णु सवरा यांच्या निधनामुळे पालघर जिल्ह्यात मोठी पोकळी उत्पन्न झाली आहे. चिंतामण वनगा यांचे निधन झाले, तेव्हाही असाच भाव अनुभवास आला, पण तेव्हा सवरा होते व त्यांच्यामुळे स्वतःच्या मतदारसंघातच नव्हे, तर अन्य ठिकाणीही जो कोणी दीनदुबळा, अन्यायग्रस्त असेल त्याला दिलासा देणारा दुसरा लोकप्रतिनिधी उपस्थित होता. आता सवराही कैलासवासी झाले, तेव्हा पालघर जिल्हा अनाथ झाला आहे, असे म्हणण्यात काडीची अतिशयोक्ती नाही!
स्वयंसेवक म्हणून माझ्या जडणघडणीबरोबर सामाजिक व राजकीय जडणघडणीत कै. तात्या लेले (भूतपूर्व संघचालक) व कै. आंबो भोईर (भाजप नेते) यांच्याबरोबर आदरणीय विष्णुजी सवरा साहेबांचा मोलाचा वाटा आहे. विष्णुजींबरोबर माझा पहिला परिचय १९८९ मध्ये झाला. (इ. पाचवी) विष्णुजी मुंबईहून वाड्याकडे निघाले की, रात्री (वाहनाअभावी) मुक्कामी तात्यांकडे बर्याचदा यायचे. सुरुवातीस त्यांचा पेहराव लेहंगा, झब्बा व खांद्याला लावलेली शबनम असा असायचा. माझ्या लहानपणी मी निवडणुका आल्या की सवरा व वनगा ही दोन नावे हमखास ऐकायला मिळायची. त्यांचे अनग
अनेकांनी विष्णुदादांविषयी आपले अनुभव लिहावे यासाठी फोनवर बोलणे केले, पण त्यानंतर मीच थोडा अंतर्मुख झालो. विष्णुदादांच्या घडणीमध्ये माझा वाटा खारीचासुद्धा नसला तरी १९७० ते २०२० या सुमारे ५० वर्षांच्या त्यांच्या प्रवासाचा मी निश्चितच साक्षीदार आहे. त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. लिखाणाची फार मोठी सवय नसली तरी विष्णुदादांविषयीच्या आठवणी लिहिण्याचा शब्दबद्ध केलेला हा प्रयत्न...
जन्माला आलेला प्रत्येकजण कधीतरी जाणारच, हे जरी खरं असलं तरी विष्णु सवरा यांचा बुधवार, दि. ९ डिसेंबर, २०२० रोजी झालेला मृत्यू राजकीय क्षेत्रात वावरणार्यांना, पालघर जिल्ह्यातील त्यांच्या समाजबांधवांना तमाम कार्यकर्त्यांना, तलासरी केंद्रातील सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांना, संघ परिवाराला व पालघर जिल्हा भाजपला जबरदस्त धक्का देणारा आहे.
आपल्या चिल्या-पिल्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना पाठीशी घेऊन मोलमजुरी करण्यासाठी दरवर्षी दूरवर परगावी जाणे, ज्याला वनवासी ‘जगाय चाल्लू’ असे म्हणतात. अशा पूर्वाश्रमीच्या ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम जंगली भागांतील तालुक्यांपैकी वाडा तालुक्यातील गालतरे या वनवासी पाड्यावर दि. १ जून, १९५० रोजी सवरा दाम्पत्याला पुत्ररत्न झाले. हिंदुत्वाच्या संस्काराचा पगडा असलेल्या, सवरा कुटुंबीयांनी बालकाचे नाव ‘विष्णु’ असे ठेवले. याच विष्णुने पुढे अखंड दारिद्य्राच्या गाळांत रुतलेल्या, खितपत पडलेल्या वनवासी समाजाचा उद्धार केल
प्रचंड जनसंपर्क, सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची विष्णु सवरा यांची वृत्ती त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवते. तसेच सामान्य जनतेशी थेट नाळ जोडून काम करण्याच्या कार्यपद्धतीमुळे ते आजवर आपलं राजकीय यश टिकविण्यातही यशस्वी ठरले. सलग ३० वर्षं जनमानसावर अधिराज्य गाजवणं, हे बदलत्या राजकीय संस्कृतीत सवरांनी टिकवलं, हे त्यांच्यातील असामान्य कर्तृत्व सिद्ध करणारं आहे.
सन १९९० पासून २००९ पर्यंत दोन दशके वाडा विधानसभा मतदारसंघाचे, २००९ पासून भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे, तर २०१४ पासून २०१९ पर्यंत विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व ज्यांनी केले, ते महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, विष्णुजी सवरा यांचे वयाच्या ७१व्या वर्षी बुधवार, दि. ९ डिसेंबर, २०२० रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या राजकीय जीवनाचा, कारकिर्दीचा मागोवा घेत असताना अनेक आठवणींचा, भाव भावनांचा चल चित्रपट माझ्या मनश्चक्षूपुढे तरळू लागला.
सामान्यांतून असामान्य माणसे तयार होत असतात. परंतु, असामान्य होऊन सामान्यांसारखे राहावे, वागावे व ते टिकवणे हे श्रेष्ठत्वाचे लक्षण दादांनी जीवनभर आचरणात आणले. दादांच्या जीवनातील हे विविध पैलू उलगडताना आपल्याला त्यांची अनेक स्वभाववैशिष्ट्ये दिड्.मूढ करतात व दिशा दाखवतात. पहाडाएवढी कामे करूनसुद्धा त्यांची जाहिरात न करणारा राजकारणी हा विरळाच. टीकाकारसुद्धा कालांतराने त्यांचे प्रशंसक होऊन जात असत.
“सोन्या, रागावलीस का माझ्यावर?” फोनवर पलीकडून आवाज आला आणि माझ्या डोळ्यातून गंगा, यमुना, गोदावरी वाहू लागल्या. मी सकाळी चिडून निघून आले म्हणून दादांनी ऑफिसमधली गर्दी आटोपून कामाच्या रगाड्यातून आठवणीने फोन केला होता. इतक्या हळव्या मनाचे माझे दादा, त्यांचा आवाज यापुढे ऐकू येणार नाही. असं का झालं? असं व्हायला नको होतं. तुम्ही का गेलात? वडील हे मुलीच्या आयुष्यातले पहिले ‘सुपर हिरो’ असतात आणि मुलगी कितीही मोठी झाली तरी ती त्यांच्यासाठी राजकन्याच असते. मग मी तरी याला अपवाद कशी बरं असेन?
विष्णुजी २०१४ची विधानसभा निवडणूक विक्रमगडमधून लढले व जिंकले. सहावेळा निवडणूक जिंकणे अजिबात सोपे नाही. पण, प्रचंड दांडगा जनसंपर्क, वैयक्तिक संबंध आणि लोकांची केलेली कामे म्हणूनच ते निवडून आले. सर्वात ज्येष्ठ असल्यामुळे पहिल्या यादीतच त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे आदिवासी विकासमंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले. खऱ्या अर्थाने गरीब, वनवासी आणि इतर समाजाचेही अनेक प्रश्न सोडविले होते.
सन १९९५च्या निवडणुकीनंतर सतत साहेबांसोबत राहिलो. त्यानंतर २०००, २००४, २००९ व २०१४ या निवडणुकांमध्येदेखील साहेबांचं काम केलं. साहेब सातत्याने सहावेळा निवडून आले. १९९५च्या काळामध्ये युती सरकारमध्ये १९९९ साली साहेब कॅबिनेट मंत्री झाले. अवघ्या सहा-आठ महिन्यांचाच कालावधी त्यांना मिळाला. परंतु, इतक्या कमी कालावधीमध्येसुद्धा मंत्रिमंडळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
आजही बऱ्यापैकी दुर्गम असलेल्या वाडा तालुक्यात वनवासी कुटुंबात जन्माला आलेले विष्णु सवरा आपले भाग्य घडवायला वनवासी कल्याण आश्रमाच्या तलासरी येथील शाळेत दाखल झाले. तिथे शिक्षण आणि संघ संस्कारांची शिदोरी घेऊन बाहेर पडलेल्या विष्णु सवरांनी स्वतःचे भाग्य घडविलेच; पण खऱ्या अर्थाने ते संपूर्ण महाराष्ट्रातील वनवासींचे आणि वाडा-पालघर विभागाचे भाग्यविधाता झाले.
विष्णु सवरा उर्फ सवरा साहेब म्हणजे तत्कालीन ठाणे ग्रामीण भाजपमधील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. अत्यंत साधे राहणीमान, प्रामाणिकपणा, कायम भाजपचा विचार आणि वनवासी बांधवांसाठी तळमळ ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये. सवरा साहेबांना भेटण्यासाठी कधीही भाजपचा कार्यकर्ता वा सामान्य नागरिकांना ‘अपॉईंटमेंट’ घ्यावी लागली नाही. कायम जनतेच्या गराड्यात राहणे हा त्यांच्या दिनचर्येचाच भाग असावा. आदिवासी विकासमंत्रिपद भूषविण्याचा मान सवरा साहेबांना दोन वेळा मिळाला. या काळात त्यांच्या कार्याचा ठसा आदिवासी विकास विभागावर उमटला
विष्णु सवरा म्हणजे अतिशय तल्लख स्मरणशक्ती, तीव्र संघर्षयोद्धा आणि २४ तास वनवासी समाजाच्या प्रगतीचा ध्यास लागून राहिलेलं व्यक्तिमत्त्व. दि. ९ डिसेंबर रोजी त्यांच्या निधनाचं वृत्त मला जेव्हा समजलं, तेव्हा मी प्रवासात होतो. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मनाला अतिशय वेदना झाल्या. गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षाला जे धक्के सहन करावे लागले आहेत, त्यामुळे अतिशय दु:ख होतं. ज्या नेत्यांनी पक्षाचे एक लहानसे रोप लावून त्याची तन-मन-धनाने जोपासना केली, त्याचे आज वटवृक्षात रूपांतर होत असताना, ते नेते आपल्याला सोडू
जिजामाता उद्यानापासून सुरु झालेल्या वनवासी बांधवांच्या मोर्चाने अवघी मुंबई दणाणून सोडली.
समाजकार्याला वाहून देणाऱ्या आणि आदिवासी समाजाच्या स्त्रियांच्या आरोग्याचे परीक्षण करणाऱ्या राणी बंग या नवदुर्गाबद्दल जाणून घेऊया...