तालुक्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे आचरा मार्ग बंद करण्यात आला आहे. सेंट उर्सूला शाळेजवळ गड नदीचे पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. येथील गणपती साणा येथेही पाणी भरले असून जनावली आणि गड नदी दुधडी भरून वाहत आहे. आचरा मार्ग हा नेहमीच पावसात पुरामुळे ठप्प होतो. पूरस्थिती पहाता शाळेलाही सुटी देण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.
Read More
महाराष्ट्रातील काही मोजक्या गावांमध्ये आजही 'गावपळण' ही परंपरा पाळली जाते. ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा हा भाग वेगळा. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा पाळणारे 'आचरे' हे कोकणातील एक गाव. या गावाची 'गावपळण' दि. १२ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान संपन्न झाली. दर चार वर्षांनी तीन दिवसांसाठी संपन्न होणार्या अनोख्या 'गावपळण' या परंपरेचा आढावा घेणारा हा लेख...