‘शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे,’ असा आग्रह धरणारे व प्रत्यक्ष कृतीद्वारे आयुष्यभर कार्यरत राहणारे अरुण फडके नुकतेच अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत. मराठी भाषा, तिचे सौंदर्य अधिकाधिक शुद्ध व स्वच्छ असावे म्हणून फडके प्रयत्नशील होते. त्यांच्या स्मृतींना आणि कार्यांना उजाळा देणारा हा लेख...
Read More
मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचे कर्करोगामुळे गुरुवारी (१४ मे) निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. 'शुद्धलेखन ठेवा खिशात' या छोट्या पुस्तिकेद्वारे समग्र मराठी लेखन-कोशापर्यंत विविध प्रकारची पुस्तके त्यांनी लिहिली होती. 'शुद्धलेखन ठेवा खिशात' हे त्यांच्या पुस्तकावर आधारित असलेले अॅपही अनेकांना खूप उपयुक्त ठरले. पुस्तकलेखनाबरोबरच शुद्धलेखन कार्यशाळांच्या माध्यमातूनही ते मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी लोकांना जागरूक करण्याचे कार्य करत होते. गेली काही वर्षे कर्करोगाशी लढा देत असतानाही त्यांचे कार्य अविरत सुरूच ह
शीख बांधवांचे प्रार्थनास्थळ असणार्या गुरुद्वाराच्या शिखरावर फडकणारा ध्वज हा पवित्र 'निशाणसाहिब' या संबोधनाने सर्वपरिचित आहे. (चित्र क्र १). याच्या मध्यभागी आपल्याला तसेच सुपरिचित चिह्न दिसते. हे चिह्न-प्रतीक आणि त्याचे अर्थसंकेत शीख संप्रदायाची धर्मप्रणाली आणि शीख समाजाच्या व्यक्तिमत्त्वाचा विस्ताराने परिचय करून देतात.
ज्युईश आस्था-श्रद्धा-निष्ठेनुसार एकूण 13 तत्त्वं आणि सूत्रांचा स्वीकार आणि त्याचे दैनंदिन जीवनात पालन करणे आवश्यक आहे. गंमत म्हणजे ‘धर्म’ या विषयावर आपल्या देशात डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या समाजात जशी मत-मतांतरे असतात, अगदी तसेच इस्रायल या देशांतील ज्यूधर्मीय समाजात होत असते. या धर्मप्रणालीत ‘देव’ म्हणजे या ‘जगाचा निर्माता’ ही प्राथमिक संकल्पना आहे.
प्राचीन भारतीय चिह्नसंस्कृतीतील हिंदू धर्म आणि इस्लाम धर्मातील प्रतीके यांच्याकडे वळण्याआधी जगभरातील अन्य धर्मप्रणालींच्या आणि पंथ-संप्रयादायांच्या चिह्न-प्रतीकांचा परिचय करून घेऊया. मूळ इस्लामिक तत्वज्ञानापासून फारकत घेऊन निर्माण झालेले 'बहाई फेथ' या संबोधनाने परिचित असणार्या 'बहाई संप्रदाय' या सर्वात तरुण धर्मप्रणालींच्या प्रतीक आणि चिह्नांचा अभ्यास आणि त्याचे संकेत समजून घेणे हा फार रंजक अनुभव आहे. विविध धर्म प्रणालीतील चिह्नसंकेत बहाई फेथ - सर्वात तरुण संप्रदाय चिह्न आणि प्रतीके