रात्र संपतांना महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले. गेल्या तीन आठवडयापासून हिरीहिरीने राजकीय चर्चा आणि जल्पक बनून संदेश वहन करणारे लोकशाहीचे उपासक आज मतदानाचा हक्क बजावून कृतकृत्य झाले असतील. आपणही आपला हक्क बजावला असेल. या लेखमालेच्या तिसऱ्या भागात योजनांचे माहितीपत्रक का वाचावे? याचा उहापोह केला होता. आज आपण म्युच्युअल फंडांचे प्रकार, योजनांचे वैविध्य याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करू.
Read More
अनंत चतुदर्शीला सर्वांचा लाडका विघ्नहर्ता भक्तांचं विघ्न दूर करण्याचा आशिर्वाद देऊन परतीच्या प्रवासाला निघून गेला. पण पुढच्या वर्षी पुन्हा येणार हे मूक आश्वासन देऊनच. प्रत्येक गुंतवणूकदाराने गणपती स्तोत्र म्हणतांना विदयार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं या ओळीचा उच्चार मनोभावे केला असेल. माणूस आठवणींशिवाय जगू शकत नाही. मग आठवण बनवत कोण? खरतरं आठवण ही अनुभवलेल्या, जगलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या क्षणांनी बनत असते. गेल्या १० दिवसांत मंदीची आठवण पुसट होऊन मांगल्य अवतरल्याचा अनुभव सर्वांनी घेतला.
श्रीगणेशाची स्थापना करण्याची एक विधिवत पद्धती आपल्याकडे परंपरेनुसार चालत आली आहे. त्यासाठीची संहिता प्रत्येक घरात पाळण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या घरात अनुभवी ज्येष्ठ असतील तिथे त्रुटी राहत नाही. परंतु नवतर मंडळी असतील तर बहुतेकदा सोपस्कार पार पाडले जातात. असंच काहीसं म्युच्युअल फंड व त्यातील विविध पर्यायांची कार्यपद्धती माहित न करून घेता जाहिरात बघून कमिशन वाचणार म्हणून डायरेक्ट गुंतवणूकदार बनतात. मग पदरी मोदकाचा प्रसाद येण्याऐवजी खिरापत सांभाळण्याची वेळ येते.