मध्य रेल्वे मुंबईच्या बदलापूर, अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान एक नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे. याकरता गेल्या ८ वर्षांपासून प्रवासी मागणी करत होते. ११ ऑक्टोबरला प्रवाशांच्या मागणीला यश आले असून मध्य रेल्वेकडून स्थानक उभारणीला सुरुवात झाली आहे.
Read More
अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. एक हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचा ठळक पुरावा असलेले, हे उत्कृष्ट वास्तुवैभव सुशोभीकरण प्रकल्पामुळे नव्याने उजळून निघणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी १३८.२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामाचे कार्यादेश नुकतेच देण्यात आल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. अंबरनाथमधील शिवमंदिर शिलाहारकालीन स्थापत्य कलेचा अप्रतिम अविष्कार आहे. या प्राचीन वास्तूच्या माध्यमातून जागतिक पातळीवर अंबरनाथ शहराची
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून उल्हासनगर शहरातील विविध विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांचानिधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामांमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह, समाजमंदिर उभारणे , नाले उभारणी, अभ्यासिका यांसारख्या कामांचा समावेश आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथजी शिंदे यांनीराज्यशासनाकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाकडून उल्हासनगर महापालिकेला हा निधी मंजूर करण्यात आलाआहे. या मूलभूत विकासकामांमुळे उल्हासनगरमधील नागरिकांना दिलासा मिळणार असून शहरां
महाराष्ट्र राज्याची स्थापना दि. १ मे, १९६० रोजी झाल्यानंतर राज्याची औद्योगिक प्रगती तथा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात औद्योगिक वसाहती उभारण्याचा विचार सुरू झाला. त्या अनुषंगाने ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’ची स्थापना दि. १ ऑगस्ट, १९६२ रोजी करण्यात आली. ‘एमआयडीसी’चा मुख्य उद्देश महाराष्ट्रात औद्योगिक वसाहती उभारून त्या वसाहतीत मूलतः व्यवस्था म्हणजे पाणी, वीजपुरवठा तसेच रस्ते व त्याबरोबर औद्योगिक सांडपाणी निचरा इत्यादी व्यवस्था करून देणे असेच राहिले.
मुंबईतील एसी लोकलची लोकप्रियता पाहता मध्य रेल्वेवर अजून १० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उल्हास नदीत येणार्या पावसाच्या पाण्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले आहे. नदीवरील पाणी शुद्धीकरण केंद्राच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होत असून गाळामुळे नागरिकांना पुरवल्या जाणार्या पाण्याचाही रंग बदलला आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्यातर्फे करण्यात आले आहे.
‘एमएमआर’ क्षेत्रातील कडोंमपासह उल्हासनगर, ठाणे पालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपरिषदेत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप मनसेचे आ. राजू पाटील यांनी गुरूवारी केला.
नगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत ६४ हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. हरकतीच्या सुनावणीदरम्यान पालिका प्रशासनाने प्रभाग रचना करताना केलेल्या चुका जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आल्या.
औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने वालधुनी नदीचा प्रवाह कमालीचा प्रदूषित झाला आहे. तर दुसरीकडे नदीपात्रात भराव टाकून होणार्या अतिक्रमणांमुळे वालधुनी नदी अरूंद होत चालली आहे. परिणामी, पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन स्थानिकांच्या घरात आणि शेतात पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते
आ. अमोल मिटकरी यांच्याविरोधात अंबरनाथला निदर्शने
अंबरनाथ तालुक्यातील उंबार्ली या गावातील डॉ. प्रा. सुरेश मढवी यांनी ‘ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी केली, त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला होता. मढवी यांनी ‘आगरी समाज’ या विषयाचीच निवड का केली, ते जाणून घेऊया.
ज्येष्ठ नागरिक दत्तात्रेय चिंतामण उर्फ दादा हाडप गुरुजी (88) यांचे मंगळवार, दि. 24 ऑगस्ट रोजी अल्पकालीन आजाराने खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतू असा परिवार आहे. शिवकाळापासून प्रतापगडावरील तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पूजेचा मान हाडप कुटुंबीयांकडे असून, हाडप गुरुजी यांनी ही सेवा अनेक वर्षे केली.
कोरोनामुळे सगळीकडे हाहा:कार उडाला. अशा काळात गरजूंना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे आले. त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील भाजयुमोच्या महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी विभाग, सहसंयोजक पायल कबरे यांनीही कोरोच्या काळात विविध प्रकारचे मदतकार्य तर केलेच, शिवाय महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांना आत्मनिर्भर बनविण्याची योजना आखली, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची काळजीसुद्धा घेतली, त्याविषयीचा आढावा....
संपूर्ण मानवजातीवर आलेल्या महामारीच्या संकटात जात-पात-धर्म विसरून तन-मन-धन अर्पण करून सेवा देणारे अंबरनाथचे सर्जेराव माहूरकर. त्यांनी समाजाप्रति आपली जबाबदारी ओळखून गंभीर संकटाशी खंबीरपणे सामना करण्याचे ठरविले होते. तातडीने जनजागृती मोहीम त्यांनी सुरू केली. आरोग्याबद्दल नागरिकांना जागरूक करण्याची जबाबदारी पार पाडली. तेव्हा, त्यांनी केलेल्या या व्यापक सेवाकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
उल्हासनदीचे जलही पाठवले
धुंडिराज हे अंबरनाथ मधील ज्येष्ठ नागरिक संघ, ब्राह्मण सभा, सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन, नागरिक सेवा मंडळ, सूर्योदय को ऑप क्रेडिट सोसायटी आदी अनेक सामाजिक संस्थांशी निगडीत होते. मागील पाच वर्षे त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. युवकांमध्ये रक्तदानाचे महत्व कळावे, रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने ते आपला वाढदिवस रक्तदान शिबिर भरवून साजरा करीत असत.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर (कोविड-19) काही प्रमाणात नियंत्रण आणण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या गोळ्यांचा उपयोग होत आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता एका मराठी उद्योजकांने पुढे येत सरकारला १५ लाख गोळ्या मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील सुमंत पिळगावकर, यांच्या या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत केले जात आहे
लॉकडाऊनमुळे राहण्याची सोय नाही, सरकारने जेवणाची व्यवस्था केली मात्र, गर्दीमुळे पोटभर जेवण मिळण्याची शाश्वती नाही.
अंबरनाथला कम्युनिटी किचनला सुरुवात अंबरनाथ : कोरोनामुळे अनेकजणांवर उपासमारीची वेळ आली आहे. देशपातळीवरील असो किंवा स्थानिक पातळीवर सर्वच जण कोरोनाशी लढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अशातच अनेक ठिकाणी कम्युनिटी किचनची सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, कम्युनिटी किचन म्हणजे नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याबद्दल जाणून घेऊयात.
अंबरनाथ एमआयडीसीत असलेल्या रासायनिक कंपन्यांच्या पाण्याने वालधुनी नदीच्या पात्रात निर्माण झालेल्या 'नारंगी तवंगाने' खळबळ पसरवली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोणती कारवाई करते याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांना सलग दुसर्यांदा खासदार म्हणून मतदारांनी लोकसभेत पाठवले आहे. याशिवाय नगरपालिकेमध्ये गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे.
खरेच आहे, संतोष यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. अंबरनाथ येथे संतोष आदक यांना गुरुस्थानी मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या आयुष्याचा घेतलेला मागोवा...
काल रात्री महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांची एनडीआरएफकडून सुटका करण्यात आली. लोकलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाने रात्रीपासून मदतकार्य सुरु केले आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ मध्ये अंबरनाथ नगरपालिकेने राज्यात पाचवा तर देशात ३० वा क्रमांक पटकावला
जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त चार हजार विद्यार्थ्यांनी घातलेल्या पाच हजार सामुदायिक सूर्यनमस्काराच्या साक्षीने बदलापूरच्या आदर्श शिक्षण संस्थेचे पटांगण फुलून गेले होते. या निमित्ताने हिरक महोत्सवी वर्षाची शानदार सुरुवात करण्यात आली.
रामदास आठवलेंच्या राजकारणाचा उजवेपणा हा की, त्यांनी अशाप्रकारे एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध भडकविण्याचे काम कधीही केले नाही. जातीच्या नावाने कपाळी राख फासून आठवले वा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक सौहार्द बिघडवल्याचेही आढळत नाही. मात्र, रामदास आठवलेंसारखी व्यक्ती सत्तेची वाटेकरी झाल्याने ते काही लोकांना चांगलेच जाचते आहे.
मांगरुळ परिसरातील वृक्षांच्या जाळपोळीचे प्रकरण सध्या चांगले तापले आहे, एकीकडे वनाधिकार्यांवर राख फेकल्याप्रकरणी खा. श्रीकांत शिंदे यांच्या अडचणी वाढल्या असताना, आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकार्यांना दिले आहेत. कोणत्या मुद्द्यांच्या आधारे ही चौकशी करावी, याचे निर्देशही यावेळी मुनगंटीवारांनी अधिकार्यांना दिले.
अंबरनाथमधील मोरिवली येथे एमआयडीसीतील एका कंपनीत भीषण आग लागली आहे. एका केमिकल ड्रमच्या स्फोटामुळे ही आग लागली.
मुंबईतल्या डंपिंग ग्राऊंडसाठी अंबरनाथमध्ये जागा देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
बुधवारी ममतादीदी कोलकात्यात दाखल झाल्याही असतीलही. पण, केवळ विमानाच्या अनुपलब्धतेमुळे राज्याच्या प्रमुखाने अशी जबाबदारी झटकली. आणि मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास मुंबईकरांच्या लोकलकळाही निश्चितच कमी होतील.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या व्हाँलेंटियर नोंदणी अभियानांतर्गत अंबरनाथला १६० हून अधिक व्हाँलेंटियर्सची नोंदणी करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्या पायल कबरे यांनी दिली आहे
डापावमध्ये मृत पालीचे पिल्लू आढळून आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथच्या रेल्वे स्थानक परिसरात घडल्याने अंबरनाथवासियांचे धाबे दणाणले आहेत.
मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याकडेच असणे योग्य असल्याचे प्रतिपादन आ. किसन कथोरे यांनी व्यक्त केले.