चीनच्या शून्य कोविड धोरणाचा अँपल कंपनीला जोरात फटका बसणार आहे. जगातील सर्वात मोठे अँपल फोन निर्मितीचा कारखाना असलेल्या झेंगझाऊ शहरात कडक टाळेबंदी सुरु झाली आहे. या टाळेबंदीमुळे याआधीच या कारखान्यातून १ लाख कर्मचारी पळून गेले आहेत. त्यामुळे हा कारखाना आणि येथील उत्पादन डोही चांगलेच संकटात सापडले आहेत. चीनमध्ये ठीकठिकाणी सध्या पुन्हा कडक टाळेबंदी सुरु करण्यात आली आहे. चीनने आपले शून्य कोविड धोरण कडकपणे राबवण्याच्या निर्णयाने जय ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत तिथे थेट टाळेबंदीच लागू करण्याचा निर्णय चीनमधी
Read More
दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक व्हाट्सअँप वरून अचानक मेसेजेस जाणे बंद झाले, हळूहळू फक्त मुंबईतूनच नाही तर संपूर्ण देशातून व्हाट्सअँप बंद असल्याच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली. कोणीच कोणाला मेसेज पाठवू शकत होते ना मेसेजेस येऊ शकत होते. सगळं कामच ठप्प झालं. बघता बघता ३० हजार व्हाट्सअँप युजर्सनी व्हाट्सअँप बंद असल्याची तक्रार नोंदवली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास बंद पडलेले व्हाट्सअँप सुरु होण्यास तब्बल दीड तास लागले आणि २ वाजून ६ मिनिटांनी व्हाट्सअँप परत सुरु झालं. पण तोपर्यंत संपूर्ण जगातील २ अब्ज य
बायजूने ( Byju's ) आपल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी अजून एक मोठा उपाय योजला आहे. आपल्या सर्व गुंतवणूकदारांकडून तब्बल २ हजार कोटींहून भांडवल उभे करण्यात बायजूला यश आले आहे. सध्या बायजू सामना करत असलेल्या आर्थिक संकटात हा मोठा दिलासा मानला जात आहे. याचा उपयोग आपल्या भांडवली गुंतवणुकीसाठी केला जाईल आणि त्याचा कंपनीच्या प्रगतीसाठी नक्कीच फायदा होईल असे कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. या गुंतवणुकीचे चांगले परिणाम येणाऱ्या वर्षात दिसतील आणि २०२३ हे वर्ष बायजू साठी चांगले असेल अशी अपेक्षा बायजू कडून व्यक्त कर
भारत मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब ही ओळख मिळवण्यासाठी दमदार पावले टाकत आहे. फक्त सप्टेंबर महिन्यात भारताने एक बिलियन डॉलर म्हणजे ८,२०० कोटी रुपयांच्या किंमतीच्या मोबाइल फोन्सची निर्यात केली आहे. भारताने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४.२ बिलियन डॉलर्स किंमतीचे मोबाईल फोन्स भारताने आतापर्यंत निर्यात केले आहेत. जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपन्या असलेल्या सॅमसंग आणि अँपल या कंपन्यांच्या मोबाईलची निर्मिती भारतात होते. २०१६ पासून भारतात मोबाईलचे उत्पादन सातत्याने वाढत आहे. जागतिक मोबाईल उत्प
अँप आधारीत शिक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या बायजू ( byju's) कंपनी सध्या प्रचंड आर्थिक तोट्याचा सामना करत आहे. या तोट्यावर बायजूने कर्मचारी कपातीची शक्कल लढवली आहे. २०२३ पर्यंत बायजू कंपनीच्या २५०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. ही कर्मचारी कपात करून बायजू आपला तोटा कमी करणार आहे. सध्या बायजू कंपनी ४ हजार कोटींहून अधिकच्या तोट्याचा सामना करत आहे. अँप आधारित शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या ऑनलाईन प्लँटफॉर्म्समध्ये बायजूने गेल्या काही वर्षात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. सुरुवातीला फक्त श
सेकेंड हॅन्ड गोष्टी आपल्याला काही नवीन नाहीत. आपल्या घरगुती वापराच्या वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पर्यंत आपल्याला सर्वच प्रकारच्या गोष्टींच्या सेकण्ड हॅन्ड वस्तूंची सवय आहे. यात आत भर पडली आहे ती आयफोनची. आपल्याला खोटे वाटले तरी ही गोष्ट खरी आहे की आता आयफोन सुद्धा सेकेंड हॅन्ड खरेदी करता येणार आहे
इस्रायलच्या कंपनी एनएसओ ग्रुपने तयार केलेले सॉफ्टवेअर पेगासस हे भारतातील कथित फोन-टॅपिंग घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहे.माध्यमांच्या प्रकाशनाच्या जागतिक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार दोन सेवा देणारे केंद्रीय मंत्री, तीन विरोधी पक्ष नेते, एक घटनात्मक प्राधिकरण, सध्याचे आणि माजी सुरक्षा संघटनांचे प्रमुख, प्रशासक आणि ४० ज्येष्ठ पत्रकार आणि कार्यकर्ते यांचे फोन पेगाससचा वापर करून बग केले गेले होते
भारत सरकारकडून चीनच्या ११८ अॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
कोरोनाच्या या संकटाच्या काळात एकमेकांप्रती असणारी काळजी व्यक्त करण्यासाठी हे इमोजी फेसबुकने प्रदर्शित केले आहे.
जागतिक बँकेनेही या अँपचे कौतूक करत भारत सरकार कोरोनाशी लढण्यासाठी योग्य पाऊले उचलत असल्याचे म्हणले आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात घरोघरी आणि सार्वजनिक स्वरूपातही साजरा केला जाणाऱ्या गणेशोत्सवात वातावरण गणपती बाप्पा मोरया च्या गजराने भक्तिमय , चैतन्यमय झालेलं असतं .
लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून राज्यात विविध कारवायांमध्ये आतापर्यंत १०४ कोटी १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने दिली