स्वातंत्र्यसमरात सहभागी झाल्याबद्दल इंग्रजांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप केला. त्यांना पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांची रवानगी हैदराबाद सिंध येथील तुरुंगात करण्यात आली. अशा या स्वातंत्र्यासाठी प्रचंड हालअपेष्टा भोगलेल्या
Read More
कृष्णाजी गोपाळ खरे अतिशय हुशार, नेहमीच पहिल्या वर्गात पास होणारे, अभ्यासू वृत्तीचे असा त्यांचा लौकिक होता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकर, हरिभाऊ भागवत, नगरचे वेदमणी असे सगळे विचारवंत एकत्र होते. त्याचवेळी सावरकरांनी सेनापती बापट यांच्याकडून मिळवलेली बॉम्बची पुस्तिका हिंदुस्थानात धाडली होती. खरेंनी आपल्या शिक्षणाचा उपयोग सुरू केला.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी १८९८ साली ‘अभिनव भारत’ ही गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे, हा या संघटनेचा मुख्य हेतू होता. दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, याचाच अर्थ ‘अभिनव भारत’च्या स्थापनेमागचा हेतू सफल झाला. म्हणूनच दि. १० मे, १९५२ या दिवशी ‘अभिनव भारत’ सांगता समारंभ पुण्यात मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला. सलग तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या रूपाने हा समारंभ संपन्न झाला. सांगता समारंभस्थळी तोपर्यंतच्या क्रांतिकारकांच्या स्मृत्यर्थ एक स्मृतिस्तंभ
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नाशिकनगरी यांचे एक दृढ नाते आहे. नाशिक नगरी हे तीर्थक्षेत्र आहे, प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेली अशी ही भूमी आहे. तपोवन, रामकुंड, पंचवटी परिसर त्याचप्रमाणे अनेक मंदिरांनी हे शहर गजबजलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य हे नाशिकमध्येच खर्या अर्थाने सुरू झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
वामन जोशींना राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. सावरकर बंधू आणि स्वातंत्र्यसेनानी वामन नारायण उर्फ दाजी जोशी अंदमानाच्या काळकोठडीत स्वातंत्र्यासाठी त्यागाची परिसीमा गाठत अक्षरशः नरकयातना भोगत होते. या देशनिष्ठांचा त्याग अतुलनीय आहे. मातृभूमीप्रती त्यांचे प्रेम शब्दातीत आहे. वामन जोशी यांच्या देशकार्यासंबंधी माहिती देणारा हा लेख...
तो काळच असा होता, जेव्हा प्रत्येक क्रांतिकरकाला असे वाटे की, या जन्मीचे कार्य पूर्ण करून मरण आले तरी बेहत्तर, परत जन्म याच जन्मभूमीत घेऊया आणि आपला स्वातंत्र्य लढा असाच पुढे चालवूया जन्मभूमी पारतंत्र्यातून मुक्त होईस्तोवर. अशा सर्वोच्च बलिदानाचे मूर्तिमंत रूप हुतात्मा विनायक नारायण देशपांडे.
दि. २१ डिसेंबर १९०९... नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये एका १८ वर्षांच्या कोवळ्या मुलाने एका जिल्हाधिकार्याचा वध केला. १८ वर्षे हे वय आहे का हो वध करण्याचे? पण, स्वातंत्र्यलक्ष्मीसाठी बलिदान देणारे लोक जन्माला येतात, तेच मुळी आपले स्वतःचे वेगळेपण घेऊनच! अनंत कान्हेरे आणि त्याचे साथीदार त्याच पठडीतले म्हणायला हवे. आजच्याच दिवशी १९१० रोजी त्यांना फाशी झाली. हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतीला वंदन...
सावरकर हे एक संयमी, दूरदर्शी आणि मानवतावादी विचारवंत होते. त्यामुळे देश पारतंत्र्यात असताना आपल्याला गुलामगिरीत जखडणार्या परराष्ट्राविरूद्ध अपरिहार्य म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केलेला असला, तरी त्याच सावरकरांनी भारत स्वतंत्र होताच आपल्या ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारक संघटनेचे विसर्जन करून आता स्वतंत्र भारतात आपण सर्वांनी हिंसक वृत्तीचा त्याग करून लोकशाही नि अहिंसक मार्गांचा उपयोग करून सत्तापरिवर्तन करण्यासाठी स्वतंत्र भारताच्या संविधानाने दिलेल्या 'मतदान' या अधिकाराचाच केवळ उपयोग करावा, असे बज
भगूरपुत्र स्वा. सावरकर समूह, स्वा. सावरकर समूह महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम
आ. देवयानी फरांदे यांनी मंगळवारी पर्यटन मंत्र्यांकडे विकास आराखडा सादर केला
स्वा. सावरकरांच्या बाबतीत विशेष न्यायालयाच्या निकालाविरुद्ध, ज्यात न्यायालयाने सावरकरांना ‘दोषमुक्त’ म्हटले होते, त्याविरोधात सरकारने कधीही अपिल केले नाही, त्यामुळे कपूर आयोगाचा सावरकरांविषयीचा निष्कर्ष निरर्थक ठरतो.