परमार्थ साधनेला सुरुवात करायची, तर ती तरुणवयात करायला हवी. भगवंताला ओळखण्यासाठी, त्याच्या चिंतनात रममाण होण्यासाठी वयाचे ज्येष्ठत्व येईपर्यंत वाट पाहत थांबलो, तर साधारणतः साधनेला सुरुवात होत नाही आणि ती साध्य होणेे कठीण असते. भगवंत आणि परमार्थ साधना हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. याची जाणीव माणसाला तरुण वयातच व्हावी. ज्या भक्ताला अशी जाणीव होते, तो संयमाने, सदाचाराने आपले आयुष्य घालवतो. त्याच्या अंगी मनाची एकाग्रता, प्रसन्नता येते. त्याच्या अंगीविवेकनिष्ठा येते. असा हा ज्ञानीभक्त आनंदी असतो. अशा भक्त
Read More
‘सदा सर्वदा सन्नीध असणारा देव’ हे सारे पाहत असतो. संकटातून सुटण्यासाठी भक्ताने केलेला प्रयत्न हे एक प्रकारचे प्रशिक्षण असल्याने तसा सराव करुन घेणारे भगवंत कृपाळू, दयाळू नाही का? छोट्याशा संकटप्रसंगी माणूस कसा वागतो, यावरुन त्याचा भक्तिभाव समजतो. संकट ही एक शिकण्याची संधी मानून जो शांतचित्ताने पूर्ण श्रद्धेने विवेकपूर्ण विचाराने उपाययोजना करतो, त्याचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते.