रायगड किल्ल्यावर जाणे आता अधिक सुलभ होणार आहे. रायगडावर जाण्यासाठी सध्या सुरु असलेल्या रोपवेच्या ( Raigad Ropeway ) प्रवासी क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. आता रोपवेच्या एका फेरी मध्ये एकाच वेळी २४ प्रवासी गडावर जाऊ शकणार आहेत. नुकतेच या नविन रोपवेच्या ट्रॉलींची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. येत्या २३ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या दिवशी या नविन ट्रॉलींचा लोकार्पण सोहळासुद्धा पार पडणार आहे.
Read More