मुंबई : अवैध मासेमारीला लगाम लावण्यासह राज्याची सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी दि. ९ जानेवारी रोजीपासून राज्यातील किनारपट्टीवर ( Coastal line ) ‘ड्रोन’द्वारे नजर ठेवली जाणार आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी तसे निर्देश दिले आहेत. राज्याला लाभलेल्या ७२० किमी किनारपट्टीवर ‘ड्रोन’द्वारे डिजिटल सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.
Read More
सागरी सुरक्षा हा महत्वाचा विषय असून गतीने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी. जरी ते चालक टेक्निकल असले तरी त्यांचे अधिकार असलेले प्रमुख हे सरकारी भाग असले तर सुरक्षेच्या दृष्टीने आणखी सोयीचे होईल, असे सांगत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सरकारचे लक्ष वेधले. आज सभागृहात आ. रमेश पाटील यांनी राज्य पोलीस दलात कंत्राटी कर्मचारी भरती रद्द करण्याचा निर्णय करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
महाराष्ट्र आणि भारताबाहेरील मराठी माणसांच्या गौरवाची व सांस्कृतिक देवाण घेवाणीसाठी दरवर्षी विश्व मराठी साहित्य संमेलन घेतले जाते. यवर्षे हे संमेलन दि. २६ नोव्हेम्बर रोजी लक्षद्वीप द्वीपकल्पांजवळील एका जहाजावर संपन्न होते आहे. यावर्षीच्या संमेलनाचे हे आकर्षण ठरणार आहे. शिवसंघ प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेले हे दहावे संमेलन आहे. 'भारतीय सागरी सुरक्षा आणि जलवाहतूक' असा या संमेलनाचा विषय ठरवण्यात आलेला आहे. तसेच जेष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे तर राष्ट्रपती पदक, शौर्यचक्र
'इंमल्टी-एजन्सी मेरीटाईम सिक्युरिटी ग्रुप’ची स्थापना नोव्हेंबर २०२१ मध्ये करण्यात आली. विविध सागरी सुरक्षा एजन्सी आणि देशातील मंत्रालयांमध्ये उत्तम समन्वय प्रस्थापित करणे, हा त्याचा उद्देश. २०२२ फेब्रुवारीत नौदलाचे माजी व्हाइस अॅडमिरल जी. अशोक कुमार यांची ‘मल्टी-एजन्सी मेरीटाईम सिक्युरिटी ग्रुप’चेसमन्वयक (first National Maritime Security Coordinator) म्हणून नियुक्ती करण्यात आली.
दि. १ फेब्रुवारीला तटरक्षक दलाचा वर्धापन दिवस साजरा झाला. यानिमित्ताने गेल्या वर्षभरात तटरक्षक दलाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे.
‘युएनएससी’ सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात मोठी संस्था असून त्याच्या खुल्या चर्चेच्या अध्यक्षपदावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेली सागरी सुरक्षेची पंचसूत्री व त्यातून चीनला दिलेला इशारा नक्कीच महत्त्वाचा मानला पाहिजे.
‘सी व्हिजिल २१’ युद्धसराव आणि आता त्या पाठोपाठ फक्त चार संरक्षण दलांचा सहभाग असलेला ‘टोपेक्स २१’ हा मुख्य युद्धसराव, याद्वारे देश, शांततेचा काळ अथवा युद्धकाळ यांत उभ्या राहू शकणार्या कोणत्याही सागरी आव्हानाला तोंड देण्यास सज्ज आहे, समर्थ आहे.
२६ नोव्हेंबरला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला ११ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेचे अवलोकन केले पाहिजे. गेल्या पाच वर्षांमध्ये सागरी सुरक्षेमध्ये काय सुधारणा झाल्या, सध्याची परिस्थिती कशी आहे आणि येणाऱ्या काळात अजून काय जास्त सुधारणा करणे गरजेचे आहे. या सगळ्या विषयावर चर्चा होणे जरुरी आहे.
पाकिस्तानी कमांडो किंवा दहशतवादी गुजरातच्या कच्छमार्गे भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती भारतीय गुप्तचर संघटनेच्या हाती लागली आहे. यामुळे गुजरातमधील सर्व बंदरांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष (निवृत्त) लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर
भारतीय धोरणकर्ते आणि सुरक्षा दले यांनी देशाच्या सागरी सुरक्षेस दीर्घकाळ उपेक्षित ठेवले. निरनिराळ्या अवैध सागरी कारवाया विचारात घेतलेल्या नाहीत. या अवैध कारवायांनी धोक्याची पातळी गाठल्यानंतर, केवळ त्याकडे दुर्लक्ष करता येत नसल्याने त्यांना तोंड देण्याची तयारी घाई घाईने करण्यात आली.
सागरी सुरक्षेकडील अनास्था नष्ट करणे, हे आपल्या सर्वांपुढील प्रमुख लक्ष्य आहे, असे प्रतिपादन जम्मू-काश्मिर अध्यासन केंद्राचे संचालक अरुण कुमार यांनी केले.
भारत आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये १५ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या