जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी निरपराध हिंदूंची ज्याप्रकारे हत्या केली, त्याने जगभरात दहशतवादाविरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे. दहशतवाद आणि त्याच्या समर्थकांना कठोर शिक्षा देण्याची मागणी ठिकठिकाणाहून होत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या लोकांनीही दहशतवादाविरोधात संघटित होऊन शिकागो येथील पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने केली. Protest Outside Pakistan Embassy in USA
Read More
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीबाबत राजकारण शिगेला पोहोचले असताना डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन सध्या चर्चेचा विषय बनले आहे. शिकागो येथे झालेल्या तीन दिवसीय डेमोक्रॅटिक राष्ट्रीय अधिवेशनाचा तिसरा दिवस खास होता, कारण त्याची सुरुवात राकेश भट्ट या हिंदू पुजाऱ्याने वैदिक मंत्रांनी केली. संपूर्ण सभागृहात वैदिक मंत्रांसह ‘ओम शांती शांती’चे स्वर निनादले. DNC 2024 Hindu Prayer
अमेरिकेतील शिकागोमध्ये गुरुवार, दि. २ मे पासून एक भारतीय विद्यार्थी (Indian Student in USA) बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, रूपेश चंद्र चिंताकिंडीशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात असून ते पोलीस आणि भारतीय डायस्पोरा यांच्या संपर्कात आहेत. शिकागो पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार रूपेश हा एन शेरीडन रोडच्या ४३०० ब्लॉकमधून बेपत्ता झाला होता. तरी तो सापडल्यास पोलिसांना त्वरीत कळवावे, असे आवाहनदेखील पोलिसांनी लोकांकडे केले आहे.
अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी शिकागो परिसरात स्थायिक झालेल्या भारतीयांनी आषाढी एकादशी वारीचे आयोजन करून जणू पंढरपूर वारीचा अनुभव घेतला. महाराष्ट्र मंडळ शिकागो आपली संस्कृती, रूढी आणि परंपरा जपण्याच्या उद्देशाने दरवर्षी अनेक उपक्रम आयोजित करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून आषाढी एकादशीनिमित्त वारीचे आयोजन करण्याची संकल्पना मंडळाच्या विश्वस्त उल्का नगरकर यांनी मांडली. ती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अथणीकर आणि कार्यकारिणीच्या सदस्यांनी प्रत्यक्षात उतरवली. या वारीला स्थानिक लोकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. यात मोठ्या संख
कालचा दिवस हा शिकागोमधील विठ्ठलभक्तांसाठी एक पर्वणीचा होता. अमेरिकेत प्रथमच विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना झाली. हा सोहळा शिकागो परिसरातील मोठ्या संख्येने आलेल्या अबालवृद्धांच्या उपस्थितीत भक्तीभावात पार पाडला. शिकागोच्या कालिबारी मंदिरात महाराष्ट्राचे आद्यदैवत, वारकरी संप्रदायाचे कुलदैवत आणि अवघ्या विश्वाची माऊली असलेल्या विठूमाऊलींची पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा झाली.
शिकागो शहरात कायमस्वरूपी व तात्पुरता स्थायिक असलेल्या मराठी भाषिकांचे मराठी मंडळ आहे. या मंडळाद्वारे अनेक कार्यक्रम नियमितपणे राबवले जातात. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास कार्यक्रम राबवण्यात आला आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कलाकार व लेखक डॉ. रामदास फुटाणे उपस्थित आहेत.
विविध राज्यांतील आणि विविध पक्षांच्या नऊ खासदारांचा समावेश असलेले एक शिष्टमंडळ ऊर्जा आणि पर्यावरण या विषयावरील ज्ञान विनिमय कार्यक्रमासाठी शिकागो विद्यापीठातील अभ्यासक, धोरणकर्ते आणि नेत्यांना भेट देत आहे.
हिंदुत्वाची मोडतोड करण्यासाठी परिसंवाद घेणे सोप्पे, पण ते करायचे झाले तर काय ताकद लागेल यांची डाव्यांना कल्पना नाही. जिथे जगज्जेते थकले आणि मातीस मिळाले, तिथे या फसलेल्या लोकांचे काय!
अमेरिकेच्या काही शहरांमध्ये, प्रांतांमध्ये भारतविरोधी तत्त्वे मोठ्या प्रमाणात आपले डोके बाहेर काढत आहेत. भारताप्रमाणे अमेरिकेतल्या शहरांमध्ये नगरविकास/नगराचा नगरकारभार बघण्याकरिता नगर परिषद किंवा महानगरपालिका काम करतात. गेल्या काही महिन्यांपासून शिकागो शहरामध्ये एक मोठी घटना घडत आहे, याकडे भारताच्या मीडियाचे फारसे लक्ष नाही.
आज, १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती, अर्थात ‘राष्ट्रीय युवा दिवस.’ स्वामी विवेकानंद म्हणजे ऊर्जा, चैतन्य, विचार यांचे तेजस्वी प्रकटीकरण. राष्ट्राच्या शोधासाठी घराबाहेर पडले, निरीक्षण, संवाद, अभ्यास, चिंतन करत करत देश पालथा घातला आणि सरतेशेवटी भारताच्या दक्षिणतम टोकावर जाऊन त्यांनी सर्व अनुभवांचे मनन केले, तेव्हा त्यातून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याचे उद्दिष्ट गवसले आणि स्वामी विवेकानंद जगदवंद्य झाले.
वयाच्या ५३व्या वर्षी ५७ मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केलेल्या शिकागोच्या मार्क बसियाकचे वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या ४०व्या वर्षी त्याचे हृदय निकामी झाले. त्यानंतर शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्याच्या हृदयात गाईच्या हृदयाच्या झडपा बसविण्यात आल्या. त्यामुळे त्याच्या हृदयाची क्षमता वाढली. आज तो दररोज दहा किमी पळतो. शिवाय त्याला रक्तदानाचीही आवड आहे. त्याने आजपर्यंत सहा गॅलन म्हणजे २० लीटर रक्तदान केले आहे. वैद्यकशास्त्रात येणारा काळ हा ‘स्टेम सेल’ संशोधनाचा आहे. त्यादृष्टीने वरील घटना महत्त्वाची ठरणार आहे.
‘हिंदू’ शब्द अस्पृश्य ठरविण्याचा प्रयत्न : नायडू
‘विश्व हिंदू काँग्रेस’ची गरज का निर्माण झाली? आणि ‘विश्व हिंदू काँग्रेस’ यशस्वी होणे का आवश्यक आहे? याची काही कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख पाच पुढीलप्रमाणे-