२०२५ सालासाठी हा मासा भारताचा सर्वात पहिला गुहेमध्ये अधिवास करणारा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओखळला जाईल (Neolissochilus pnar). 'स्पेलिओलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया'ने (एसएआय) यासंदर्भातील घोषणा केली आहे. (Neolissochilus pnar)
Read More
गेल्या आठवड्यात वन विभागाने कल्याणमध्ये वन्यजीव तस्करीमधून पकडलेल्या ओरॅंगुटॅनला (kalyan orangutan) मूळ देशात पाठवण्याचे आदेश वन्यजीव विभागाने दिले आहेत. सध्या या प्राण्याची रवानगी नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात करण्यात आली असून या प्राण्याला मूळ देशात पाठवण्याची तयारी वन विभाग करत आहे. (kalyan orangutan)
वन विभागाने कल्याणमधील पलावा सिटीमधील एका इमारतीमध्ये शनिवारी छापा टाकून विदेशी प्राण्यांची तस्करी उघडकीस आणली होती (kalyan exotic animal). या छाप्यामधून काही देशी प्राण्यांसह ओरॅंगोटॅनसारख्या विदेशी प्राणी ताब्यात घेतले होते (kalyan exotic animal). या घटनेतील आरोपी अजूनही फरार असून वन विभागाचे अधिकारी त्याच्या मागावर आहेत (kalyan exotic animal). मात्र, यानिमित्ताने कल्याण, ठाणे, मुंब्रा परिसरात चालणाऱ्या विदेशी प्राण्यांच्या बेकायदा खरेदी-विक्रीचे जाळे उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. (kalyan exotic animal
गुजरात पोलिसांनी वडोदरा येथील 'हुसेनी समोसा सेंटर' वर काही दिवसांपूर्वी छापा टाकला होता. गोमांस असलेले समोसे (Beef Samosa) विकल्याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ सहा आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान इम्रान युसूफ कुरेशी हा समोशासाठी त्यांना गोमांस पुरवत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी इम्रानला सोमवार, दि. ८ एप्रिल रोजी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. छापेमारीदरम्यान ताब्यात घेतलेल्या मालक युसूफ आणि नईम शेख यांच्यासह सहा जणांना शनिवारी अटक करण्यात आली होती.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने विदेशी पाळीव वन्यजीवांचा ताबा आणि त्यांच्या प्रजननासंबंधीचे नियम अधिसूचित केले आहेत (exotic pet). 'वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२'च्या कलम ४९ एम अंतर्गत हे नियम तयार करण्यात आले आहेत (exotic pet). त्यानुसार 'वन्यजीव संरक्षण कायद्या'च्या क्षेणी ४ मध्ये 'सायटीस'अंतर्गत संरक्षित करण्यात आलेले प्राणी जर तुम्ही पाळत असाल, तर त्यांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. (exotic pet)
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किनाऱ्यालगत 'किलर व्हेल' ( killer whale ) या सागरी सस्तन प्राण्याचे दर्शन घडत आहे. महाराष्ट्रातील वेंगुर्ला ते कर्नाटकपर्यंतच्या सागरी परिक्षेत्रामध्ये 'किलर व्हेल'चा ( killer whal ) गट (पाॅड) फिरत असल्याचे निरीक्षण मच्छीमारांनी नोंदवले आहे. सागरी जैवसाखळीतील सर्वात मोठा डाॅल्फिन आणि शिकारी सस्तन प्राणी म्हणून हा जीव ओळखला जातो. ( killer whale )
दक्षिण कोरियातील एका ६० वर्षांच्या व्यक्तीने हजारहून अधिक श्वानांची उपासमारीने हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण कोरियातील पोलीस या संदर्भातील अधिक तपास करत आहेत. भटक्या श्वानांना घरी घेऊन जाऊन त्यांना मरेपर्यंत उपाशी ठेवण्यात आले असल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली आहे. या संदर्भात प्राणी संरक्षक स्वयंसेवकाने प्रतिक्रीया दिली आहे Dogs Killed In South Korea.
license to keep a cat;मांजर पाळण्यासंदर्भात पुणे महापालिकेने नवीन नियम केला आहे. यापुढे पुणेकरांना मांजर पाळायचे असल्यास त्यासंदर्भात रीतसर परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली असून, पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी ऑन- लाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार मांजर, कुत्रा, घोडे अशा पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करून त्यासाठी रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र,आत्तापर्यंत केवळ कुत्रा आणि घोड
पशूबळी बंदी घालायची असेल तर ईदसह कुर्बानीवरही बंदी यायला हवी, असे स्पष्ट मत लेखिका शेफाली वैद्य यांनी व्यक्त केले आहे. 'अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया'तर्फे जाहीर केलेल्या एकाच्या आधारे त्यांनी हे ट्विट केले आहे. होला बोला काली मंदिरात दिल्या जाणाऱ्या प्राणी बळीप्रथेविरोधात बर्लीन चक्रवर्थींकडून तक्रार करण्यात आली होती. याबद्दल उत्तर देताना बोर्डाने यापूर्वी ही प्रथा थांबविण्याचे दिलेले आदेश रद्दबातल केले आहेत.
गायीस भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावे, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.
मुंबई महानगर प्रदेशाच्या किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अधिवास, त्यांचा विस्तार आणि गणना यांचा अभ्यास येत्या १८ महिन्यात करण्यात येणार आहे. यामध्ये इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पोरपॉइस या प्रजातींवर प्रामुख्याने काम केले जाईल अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
देशातून नामशेष होऊन सात दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर भारतच्या जंगलात पुन्हा चित्ता दिसणार आहे. भारतात 'आफ्रिकन चित्ता' आणण्यासाठी या वर्षी जून महिन्यात भारत आणि नामिबिया यांनी सामंजस्य करार केला. त्या अनुषंगाने हे चित्ते भारताच्या ७५व्या स्वंतंत्र्य दिनानिमित्त दि. १५ ऑगस्टच्या आधी मध्यप्रदेशच्या पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात येणार आहेत.
एकदा का वन्यजीव जायबंदी झाला की, त्याचे आयुष्य पिंजर्यातच जाते. अशा वातावरणात त्यांच्यावर मायेची सावली धरणारे प्राणीरक्षक मुकेश पुनमचंद मोरे यांच्याविषयी...
सांगली जिल्ह्यातील दंडोबा डोंगर भागातील एका रिकाम्या विहिरीतून एका जंगली मांजराची सुटका करण्यात आली आहे. शनिवारी दि. १८ रोजी पहाटे वनविभागाने या मांजरीची सुटका केली. पहाटेच्या वेळी ट्रेकिंगसाठी गेलेल्या काही मुलांना ही मांजर आढळून आली होती. त्यांनी लगेच वन विभागाला कळवले.
गेल्या दहा वर्षात रेल्वे गाड्यांच्या धडकेमुळे जवळपास 186 हत्तींचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे.अशातच आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नवीन उपाययोजनांचा शोध घेत आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये तुटपुंज्या उपाययोजना केल्या जात आहेत. अलीकडील काळात, महाराष्ट्रातही रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दि. ३ रोजी निर्देश दिले की राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांमध्ये संरक्षित जंगलाच्या सीमेपासून किमान एक किमीचा इको सेन्सिटिव्ह झोन असणे आवश्यक आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव, बीआर गवई आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
बौध्द पौर्णिमेनिमित्त दि. १६ मे रोजी कोल्हापूर वन्यजीव विभागामध्ये घेतलेल्या निसर्गानुभव कार्यक्रमातंर्गत वन्यजीव गणना करण्यात आली. या गणनेत एका बिबटसह ७५३ प्राण्यांची नोंद करण्यात आली. या उपक्रमात सहभागी मंडळींनी राधानगरी, दाजीपूर व सागरेश्वर वनपरिक्षेतील एकुण ३८ मचाणीवर रात्रभर बसून पाणवठयावर येणाऱ्या वन्य प्राण्यांचे निरीक्षण केले.
गोड असावे येणे-जाणे!
खोपोलीतील प्राणी मित्र रोहित कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आईपासून ताटातूट झालेल्या वासरांना आसरा दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट करण्याबरोबरच मुक्या प्राण्यांना जीवन देणारे खाकीतील ‘जीवनदूत’ ज्ञानेश्वर एकनाथ शिरसाठ या पोलीस कर्मचार्याविषयी...
पाळीव प्राणी म्हणजे त्या कुटुंबातील एक सदस्यच! तेव्हा अगदी घरातल्या हक्काच्या माणसाची जशी आपण काळजी घेतो, तशीच पाळीव प्राण्यांची काळजी वाहणारे प्राणिप्रेमीही बहुसंख्य! अशा या प्राणिप्रेमींना त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या संगोपनात मदत करणार्या ‘पॉसिबिलिटीज्’ या कल्पक अॅपचे निर्माते आयुष धूत. त्यांच्या स्टार्टअपचा प्रवास आणि नवउद्योजकांना त्यांनी केलेले हे बहुमूल्य मार्गदर्शन...
सहा ते सातवेळा प्राणघातक हल्ले आणि प्राण्यांच्या चाव्यांचे संपूर्ण शरीरावर ३३ टाके त्यांनी पचवले. जाणून घेऊया अशा या प्राणिप्रेमासाठी दुकान, सोनंनाणं आणि घरदार विकणाऱ्या अशोक लकडे यांच्या थरारक प्रवासाविषयी...
उंटांचे डोके आणि ओठ मोठे होण्यासाठी त्यांना ‘बोटॉक्स’चे इंजेक्शन दिले जात होते. हे सगळे का? उंटांच्या स्पर्धेतउंट सौंदर्यस्पर्धा जिंकावेत यासाठी. बिचारे उंट! ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये समावेश झालेल्या या स्पर्धेत जगभरातून उंट आणले जातात. काही मापदंडांनुसार उंटांचे सौंदर्य मोजले जाते. ज्यामध्ये चेहरेपट्टी, नाक ओठ, मान, कुबड, शारीरिक ठेवण पाहिली जाते. सजावट, वेशभूषा पाहिली जाते. या सगळ्यांमध्ये उंटांनी जिंकावे, यासाठी या मुक्या जनावरांवर औषधांचा प्रयोग करण्यात आला. मुक्या प्राण्यांच्या हक्कांचे काय?
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) माहिती दिली आहे की, आसाममधील गुवाहाटी सीमावर्ती भागात गुरांच्या तस्करीत पाच पटीने घट झाली आहे. बुधवारी (1 डिसेंबर, 2021) सुरक्षा दलाच्या ५७ व्या 'रॅगिंग डे' निमित्त, महानिरीक्षक संजय सिंह गेहलोत म्हणाले की, गेल्या एका वर्षात गोवंश तस्करीवर नियंत्रण ठेवण्यात खूप प्रभावी यश मिळाले आहे. विशेषतः बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या ईशान्येकडील आसाम राज्याच्या सीमेवर गुरांच्या तस्करीत मोठी घट झाली आहे. आसाम पोलिसांच्या मदतीने हे शक्य झाल्याचे बीएसएफने सांगितले.
विरारमधील न्यू व्हिवा महाविद्यालयाच्या परिसराला लागून असलेल्या पाणथळ जमिनीवर वन्यजीवांची शिकार करण्याच्या अनुषंगाने लावलेले सापळे आढळून आले आहेत. स्थानिक पक्षीनिरीक्षकांना पक्षी निरीक्षण करतेवळी हे सापळे दिसले. वन विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून तातडीने या परिसरात लावलेले सापळे काढून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
निसर्गातील दिव्यशक्ती प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी अहर्निश प्रयत्नशील आहेत. एका विशिष्ट नियमात राहून ही आपली कर्तव्ये बजावतात. याच्यामुळेच पर्यावरणाचे रक्षण होते आणि मानवासह पशू, पक्षी जीवजंतू, वनस्पती या सर्वांचे जगणे सुकर होते.
पावसाळा सुरू झाल्यानंतर समुद्राला आलेले उधाण सहन न करू शकलेले अशक्त आणि मृतप्राय सागरी जीव हे समुद्र किनार्यांवर वाहून येतात. यामध्ये काही जीव हे अशक्त मात्र जीवंत असतात, तर काही जीव मृत्युमुखी पडलेले असतात. अशा वाहून आलेल्या जीवंत जीवांना काही हौशी लोक हाताळतात. त्या जीवांसोबत छायाचित्र काढतात. त्यांना चुकीच्या पद्धतीने समुद्रात सोडतात. अशाने त्या जीवालाच एका अर्थाने ते संकटात टाकत असतात. एखादा समुद्री जीव किनार्यावर वाहून आलेला आढळल्यास सामान्य नागरिक, मच्छीमार आणि बचाव करणार्या स्वयंसेवकांनी नेमके काय
महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचा अजब अंदाज
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे आदेश
५० हजार वर्षांपूर्वीचे अवशेष
जाळ्या, दोरखंडाच्या माध्यमातून गवा नियंत्रणात आणायला निघालेल्यांची जितकी कीव करावी तितकी कमीच आहे. विज्ञानापेक्षा तडजोडीचे उपाय शोधायची सवय धोरणकर्त्यांना लागली की असे परिणाम होणारच. एका गव्याच्या हकनाक बळीमुळे या विषयाला तोंड फुटले. आता काही मार्ग निघावा, हीच केविलवाणी अपेक्षा.
'ओव्हरपास' वरुन वन्यजीवांचा वावर
वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'कडून निर्मिती
आपण मागच्या लेखात काही प्राण्यांनी भारताच्या बाहेर जगप्रवास केल्याचे दाखवून देणारी संशोधने पाहिली. त्याद्वारे भारतीय पूर्वजांचा सुद्धा तसाच प्रवास भारतातून बाहेर जगभरात झाल्याचे अनुमानाने लक्षात येते, हेही पाहिले. प्रामुख्याने उंदीर आणि बैल हे ते दोन प्राणी होत. शेतकर्यांच्या सोबतीने राहणे हा या प्राण्यांचा स्वभाव असल्याचे अतिशय जुने निरीक्षण आहे. अशाच पद्धतीने शेतकर्यांच्या सोबतीने राहणारा अजून एक प्राणी म्हणजे ‘कोंबडा’. आपले अंगण सोडून फारसे बाहेर सहसा कुठेही न जाणार्या या कोंबड्याने कसा बरे केला असेल
'आययूसीएन'ची माहिती
कोरोनाचे संकट हे खूप काही शिकवणार असून यातून वेळोवेळी खूप काही बदल होणार आहे. जसे आपण स्वतःचे जीवन वाचवण्यासाठी वाट्टेल ती तडजोड करतो, त्याचप्रमाणे आपल्या सभोवतालचा निसर्ग अबाधित राहण्यासाठी आपण नेहमी तत्पर असले पाहिजे.
या विषाणूचा प्रसार नक्की कशाप्रकारे होतो, याची निश्चित माहिती जरी उपलब्ध नसली तरी या लक्षणांचे स्वरुप पाहता शिंकणे, खोकणे यामार्फत या विषाणूचा प्रसार होत असावा, असा एक प्राथमिक अंदाज आहे. यालाच 'Droplet infection' असेही म्हटले जाते. या विषाणूकरिता कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे कोणीही जर कोरोनाची लस देत असल्यास ती फसवेगिरी आहे, हे लक्षात ठेवावे. कोरोना विषाणू हा प्राणिजन्य आजार आहे. नवीन जनुकीय रचना असलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार नक्की कुठल्या प्राण्यापासून होतो, याची निश्चित अशी माहिती अद्याप उपलब्ध झाल
मालकाकडून कोरोनाचे संक्रमण
‘भूतदया जोपासा’ असे सांगणारे आणि ती दैनंदिन जीवनात पदोपदी जगणारे यांमध्ये तसे बरेच अंतर. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईच्या भांडुप उपनगरातील प्राणीमात्रांची संरक्षणकर्ती निशा कुंजू...
दिल्ली उच्च न्यायालयात एका हत्तीच्या निमित्ताने आगळावेगळा खटला चालवला गेला. त्यात न्यायालयाने जो निर्णय दिला, त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. मात्र, मानव व प्राणी यांच्या अधिकारसंघर्षावर मात्र न्यायालय नेमके उत्तर शोधू शकलेले नाही. 'अवनी'सारख्या प्रकरणात टोकाच्या भूमिका घेतल्या जात असल्यामुळे दोघांच्याही अधिकारांचा तराजू समतोल राखणे देशाच्या संविधानिकतेची जबाबदारी आहे.
जुनागडच्या साखरबाग प्राणीसंग्रहालायातून सिंहाच्या दोन जोड्या आणल्या जाणार असून या बदल्यात पालिका दोन इस्रायली झेब्राच्या जोड्या त्यांना देणार आहे.
सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जैवविविधतेत भारत जगामध्ये पाचव्या स्थानावर आहे. भारतात सरपटणाऱ्या प्रजातींची संख्या ६८९ आहे.
फक्त प्राण्यांचं औषध मिळणारं हे मुंबईतील एकमेव औषध दुकान. आश्चर्याचा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा कळतं 'हे' दुकान एका मराठमोळ्या माणसाचं आहे. त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ पाटील.
राज्याच्या किनाऱ्यावर प्रथमच अत्यंत दुर्मीळ अशा 'कुवियर्स बीकड् व्हेल'चे दर्शन घडले आहे.
नॅशनल पार्कमध्ये विशेष कार्यशाळेचे आयोजन ; डाॅ. गिरी यांचे मार्गदर्शन
दक्षिण भारतातून आणलेल्या कोल्ह्यांच्या जोडीला आणखी काही साथीदार मिळावेत म्हणून सुरतेहून कोल्ह्यांची अजून एक जोडी राणीबागेत दाखल करण्यात आली आहे. याशिवाय एका मादी अस्वलाचे आगमनही झाले आहे.
गोरेगावच्या आरे वसाहतीमध्ये 'बाॅल पायथन' हा पाळला जाणारा आफ्रिकन अजगर मृतावस्थेत आढळून आला आहे. मानवी वस्तीतून बचावण्यात आलेले किंवा पाळलेले परदेशी ( एक्झाॅटिक) साप आणि अजगर सांभाळता न आल्याने त्यांना आरे वसाहतीत मोठ्या संख्येने अवैध्यरित्या सोडले जाते.
जलीय परिसंस्थेचे (Aquatic ecosystem) मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक म्हणजे समुद्री परिसंस्था (Marine Ecosystem) आणि दुसरी गोड्या पाण्यातील परिसंस्था (Freshwater Ecoystem). यामध्ये नदी, तळी, तलाव, इ. चा समावेश होतो.
मुक्या प्राण्यांच्या अव्यक्त भावना जाणून घेत त्यांच्या डोळ्यांना होणाऱ्या त्रासातून त्यांना मुक्त करणाऱ्या पशुनेत्रचिकित्सक डॉ. कस्तुरी भडसावळे यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊयात आजच्या या लेखातून...
आपण पृथ्वीच्या इतिहासातील विविध कालखंडांची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. पृथ्वीच्या जन्मापासून सुरुवात करून आपण जवळजवळ ३.८ अब्ज वर्षे वर्तमानकाळाकडे आलो होतो व सुमारे ५५० दशलक्ष वर्षांवर येऊन थांबलो होतो. या सगळ्या काळाला ‘प्रीकँब्रियन इऑन’ असे म्हणतात हेही आपण पाहिले. या लेखात आपण ‘प्रीकँब्रियन इऑन’च्या शेवटापासून आत्ताच्या क्षणापर्यंतचा इतिहास बघू. मागच्याच लेखात म्हटल्याप्रमाणे आपण काही ठराविक कालखंडच निवडणार आहोत.